AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Glowing Skin | तुम्हालाही हवीय का ग्लोंईंग स्कीन? मग आजच बदला स्वतःच्या खानपानाच्या ‘या’ सवयी

Glowing Skin | चांगली त्वचा अर्थात ग्लोईंग स्कीन राखायची असेल तर, आजपासूनच खाण्याच्या काही सवयी बदलने गरेजेचे आहे. काय खावे आणि काय नाही, या बाबत तज्ज्ञ न्यूट्रिशनिस्टने सांगितल्या आहेत काही साध्या टिप्स्‌

Glowing Skin | तुम्हालाही हवीय का ग्लोंईंग स्कीन? मग आजच बदला स्वतःच्या खानपानाच्या ‘या’ सवयी
ग्लोविंग स्कीनचे रहस्यImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 28, 2022 | 2:11 PM
Share

Glowing Skin | जेव्हा सौंदर्याचा विचार केला जातो तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची त्वचा आणि सौदर्यं परिभाषीत (Ladies defined) करण्यात जी भूमिका बजावते ती म्हणजे त्वचेचे स्वरूप. यामुळेच लोक आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी भरपूर पैसा खर्च करतात. यातील काही रक्कम क्रीम्सवर, तर काही सौंदर्य उपचारांवर (On beauty treatments) खर्च केली जाते. मात्र, अंतिम सत्य असे आहे की, जोपर्यंत आहाराच्या सवयी बदलणार नाहीत, तोपर्यंत निर्दोष त्वचेचे स्वप्न साकार होणे कठीण आहे. न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी यांनी याच्याशी संबंधित एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी ग्लोइंग स्किनसाठी काय खावे आणि काय खाऊ नये हे शेअर केले आहे. यासोबतच त्यांनी आणखी काही गोष्टींचा उल्लेख केला आहे. अंजली मुखर्जी यांनी रोज एक ग्लास भाज्यांचा रस पिण्याचा सल्ला दिला आहे. पोषणतज्ञांनी लोकांना धूम्रपान सोडण्याचा सल्ला दिला आहे. या डाएट टिप्स (Diet tips) अशा आहेत की आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवणे फार कठीण नाही. त्वचेची दररोज काळजी घेणे आवश्यक आहे

त्वचेची रोज काळजी घ्या

आपल्या पोस्टमध्ये, आहारतज्ज्ञांनी लिहिले की, ‘आपल्या त्वचेमध्ये स्वतःला पुन्हा टवटवीत करण्याची शक्ती आहे. वाढत्या वयात त्वचेवर सुरकुत्या आणि डाग दिसू लागतात. दिसण्याबरोबरच त्वचेचा पोतही बदलू लागतो. कालांतराने, त्वचेची स्वतःची दुरुस्ती करण्याची क्षमता देखील कमी होऊ लागते. म्हणूनच आपण दररोज आपल्या त्वचेची थोडी अधिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

भाजीपाला व रसाचे चमत्कारी लाभ

अंजली मुखर्जी यांनी रोज एक ग्लास भाज्यांचा रस पिण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितले की, गाजर, टोमॅटो आणि बीटरूटचा रस त्वचा आणि यकृतातील विषारी पदार्थ साफ करतो. वनस्पती-आधारित आहार शरीराला व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई आणि सेलेनियम प्रदान करतो, जे वृद्धत्व कमी करते तसेच नवीन पेशींना चालना देतात.

या गोष्टी चुकूनही करू नका

पोषणतज्ञांनी लोकांना धूम्रपान सोडण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितले की, यामुळे त्वचेचे खूप नुकसान होते. यासोबतच तळलेले आणि जास्त तिखट पदार्थ न खाण्याचा सल्लाही त्यांनी दिला. ते त्वचेसाठी विषारी ठरणाऱ्या द्रावणाची पातळी खूप वाढवितात, जे शरीर आणि त्वचेसाठी चांगले नाही. आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी भरपूर पैसा खर्च करतात.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन