सलग 2 दिवस येतोय ताप, वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या 4 टेस्ट

राज्यामध्ये डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, चिकनगुनिया आणि व्हायरल तापाच्या रुग्णांची संख्येत वाढ, सलग 2 दिवस येतोय ताप, वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी सांगितल्या आहेत महत्त्वाच्या चाचण्या...

सलग 2 दिवस येतोय ताप, वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या 4 टेस्ट
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 1:58 PM

पावसाळ्यात अनेक आजार डोकंवर काढतात. त्यामुळे ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असते. सध्या देशातील काही राज्यांमध्ये डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, चिकनगुनिया आणि व्हायरल ताप… असणाऱ्या रुग्णांची संख्या समोर येत आहे. गेल्या आठवडाभरात तापाने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत जवळपास 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या सर्व रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. यापैकी काही जणांना व्हायरल ताप तर काहींना डेंग्यू, मलेरिया आणि स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार वेळेत घेणं अत्यंत गरजेचं आहे. शिवाय काही टेस्ट करणं देखील अत्यंत गरजेचं आहे.

ताप येत असेल आणि ताप दोन दिवसांपेक्षा अधिक काळ राहात असेल तर, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार काही टेस्ट करुन घेणं गरजेचं आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार डेंग्यू, मलेरिया, व्हायरल फिव्हर आणि स्वाइन फ्लूची अनेक लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे कोणत्या आजाराचं संक्रमण झालं आहे… याची खात्री करुन घेणं फार महत्त्वाचं आहे.

दिल्लीच्या आरएमएल हॉस्पिटलमधील मेडिसिन विभागातील डॉ. सुभाष गिरी सांगतात की, सप्टेंबरच्या सुरुवातीपासून डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहेत. याच दरम्यान, मलेरियाचे रुग्णही समोर येत आहेत. हे दोन्ही आजार डास चावल्यामुळे होतात आणि वेळेवर उपचार न केल्यास ते धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे कोणत्या टेस्ट महत्त्वाच्या आहेत जाणून घेऊ…

डेंग्यूची चाचणी करण्यासाठी एनएस 1 एलिसा चाचणी केली जाते. ही चाचणी ताप आल्यापासून 0 ते सात दिवसांच्या आत करावी. जर ही चाचणी पॉझिटिव्ह आली तर याचा अर्थ त्या व्यक्तीला डेंग्यू झाला आहे. याशिवाय डेंग्यूचं निदान करण्यासाठी पीसीआर चाचणी देखील केली जाते. या चाचणीद्वारे शरीरात डेंग्यूचा विषाणू ओळखला जातो. या दोन्ही चाचण्यांचे निकाल एका दिवसात येतात.

मलेरिया झाला आहे की नाही, जाणून घेण्यासाठी मलेरिया एंटीजन टेस्ट केली जाते. यामध्ये मलेरियाचा विषाणू शरीरात ओळखला जातो. याशिवाय ब्लड स्मीअर मायक्रोस्कोपिक चाचणी केली जाते. या चाचणीद्वारे रुग्णाच्या शरीरातून रक्ताचा छोटा नमुना घेतला जातो. हा नमुना सूक्ष्मदर्शकाने तपासला जातो. यामध्ये रक्तात मलेरियाचे विषाणू आहे की नाही हे कळतं.

डेंग्यू आणि मलेरियाच्या तुलनेत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी असतं. पण या वातावरणात स्वाइन फ्लूची देखील चाचणी केली जाते. ताप, खोकला, सर्दी, डोकेदुखी आणि स्नायू दुखणे ही देखील त्याची लक्षणं आहेत. स्वाइन फ्लूची तपासणी करण्यासाठी, नाकातून किंवा घशातून स्वॅब घेतला जातो. त्यानंतर RTPCR द्वारे चाचणी केली जाते.

व्हायरल तापासाठी देखील चाचणी केली जाते. यासाठी व्हायरल मार्कर टेस्ट केली जाते. ज्यामुळे शरीरातील व्हायरल तापाची लेवल कळतं. लेवलच्या आधारावर रुग्णावर उपचार केले जातात.

म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.