गावरान तूप खाल्ल्याने खरच वजन वाढते?, जाणून घ्या तूप खाल्ल्याचे फायदे

गावरान तुपामध्ये फॅटचे प्रमाण अतिशय कमी असते. तसेच गावरान तुपाचा आहारात समावेश केल्यास अन्न पचायला देखील मदत होते. एवढेच नाही तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिनची कमी असेल तर तुपामुळे ती पूर्ण होण्यास मदत होते.

गावरान तूप खाल्ल्याने खरच वजन वाढते?, जाणून घ्या तूप खाल्ल्याचे फायदे
तूप

Health Benefits of Desi Ghee : सामान्यपणे जे लोक आपल्या फिटनेसबाबत अधिक जागृक असतात असे लोक गावरान तुपाचा (Desi Ghee) वापर आपल्या आहारामध्ये करत नाहीत. मात्र वास्तव यापेक्षा वेगळे आहे. गावरान तुप खाल्ल्यास तुमचे वजन वाढत नाही. तसेच चरबीमध्ये देखील वाढ होत नाही. याऊलट गावरान तुप खान्याचे अनेक फायदे आहेत. आयुर्वेदामध्ये देखील गावरान तुपाला एक औषध म्हणून अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. मात्र तरी देखील काही लोक वजन वाढीच्या भीतीने गावरान तुपाऐवजी आहारात रिफाईंड तेलाचा वापर करतात. असे करणे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आज आपन गावराने तुपाचे असेच काही फायदे जाणून घेणार आहोत. कॉमेडियन भारती ही अनेक दिवसांपासून आपले वजन कमी करण्याच्या मागे लागली आहे. तीने एका मुलाखतीत माहिती देताना सांगितेले की, मी जेव्हा डायटवर होते, तेव्हा आहारामध्ये गावरान तुपाचा समावेश करायचे. मात्र त्यामुळे माझ्या वजनात कधीही फारसा फरक पडला नाही. सत्य हे आहे की गावरान तुपामध्ये फॅटचे प्रमाण अतिशय कमी असते. तसेच गावरान तुपाचा आहारात समावेश केल्यास अन्न पचायला देखील मदत होते. एवढेच नाही तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिनची कमी असेल तर तुपामुळे ती पूर्ण होण्यास मदत होते. त्यामुळे खान्यात तुपाचा समावेश आवश्य करावा.

कोलेस्ट्रॉल वाढीसाठी उपयुक्त

ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, अशा लोकांना गावरान तुपापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो, मात्र तुम्हाला जर कोलेस्ट्रॉल वाढवायचे असेल तर गावरान तूप उपयुक्त आहे. केलेस्ट्रॉल तुमच्या शरीराला आतून हील बनवते.

चेहऱ्यावरील ग्लोसाठी

आयुर्वेदामध्ये गावरान तुपाचे अनेक फायदे सांगितले आहेत. तुपामध्ये असे अनेक पोषक तत्त्वे असतात की, ज्याचा तुमच्या शरीराला विविध अंगांनी फायदा होतो. गावरान तुपाच्या नियमित सेवनाने चेहऱ्यावर ग्लो येतो. तुम्ही रात्री झोपन्यापूर्वी चेहऱ्याला गावरान तूप लावून झोपू शकता. त्यामुळे तुमचा चेहरा उजळण्यास मदत होईल.

तुपाचा आहारात किती समावेश करावा?

गावरान तूप खाल्ल्याने वजन वाढत नाही, तसेच तुपाचे अनेक फायदे असल्याने तूप खावे मात्र ते किती खावे यासाठी एक निश्चित मात्रा असावी. तसेच ज्यांना ह्यदयाशी संबंधित काही आजार असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने तुपाचे सेवन करावे.

टीप : ही माहिती पूर्णपणे सामान्य ज्ञानावर आधारीत आहे, यातील कोणताही प्रयोग करून पाहण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला आवश्य घ्यावा. वरील कोणत्याही उपयांबाबत टीव्ही 9 प्रामाणिकरण करत नाही.

 

संबंधित बातम्या

जाबांची पाने आहेत एक उत्तम आयुर्वेदिक औषध; जाणून घ्या फायदे

Corona updates: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत कोरोनाचा विस्फोट, औरंगाबाद, लातूर, नांदेडमध्ये काय स्थिती?

Video : कोरोना बाधित लोखंडी बॉक्सेसमध्ये क्वारंटाईन, कोट्यवधी नागरिक घरात कैदेत, झिरो कोविड धोरणामुळं चीनमध्ये काय घडतंय?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI