हाडांच्या दुखण्याकडे नका करू दुर्लक्ष… पाय अडकून पडल्यानेही होऊ शकतात हाडे फ्रॅक्चर.. जाणून घ्या, ‘ऑस्टियोपोरोसिस’ ही हाडांच्या गंभीर समस्येबाबत सविस्तर माहिती!

ऑस्टियोपोरोसिस सारख्या हाडांच्या समस्यांना काही दशकांपूर्वी पर्यंत वयानुसार उद्भवणारी समस्या म्हणून दुर्लक्षीत केले जात होते, मात्र, बिघडलेली जीवनशैली आणि आहारातील पोषणाच्या अभावामुळे अशा समस्या आता तरुण वयातही आढळून येत आहेत.

हाडांच्या दुखण्याकडे नका करू दुर्लक्ष… पाय अडकून पडल्यानेही होऊ शकतात हाडे फ्रॅक्चर.. जाणून घ्या, ‘ऑस्टियोपोरोसिस’ ही हाडांच्या गंभीर समस्येबाबत सविस्तर माहिती!
bone pain
Image Credit source: google
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Jun 18, 2022 | 6:26 PM

ऑस्टियोपोरोसिस (Osteoporosis) ही हाडांच्या गंभीर समस्येपैकी एक आहे. ज्यामुळे रुग्णांना चालणे किंवा उभे राहणे देखील कठीण होते. हाडांची घनता कमी झाल्यामुळे प्रामुख्याने ही समस्या उद्भवते. या स्थितीत, आपले शरीर हाडांच्या ऊतींचे उत्पादन कमी करते, ज्यामुळे हाडे नैसर्गिकरित्या कमकुवत होऊ लागतात. अशा अवस्थेत हाडे पातळ आणि ठिसूळ होतात, त्यांना थोडासाही धक्का बसला तरी हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका (Risk of bone fractures) वाढतो. क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार, ऑस्टियोपोरोसिसची समस्या हळूहळू विकसित होते, अनेक लोकांना हे समजत नाही की ते ऑस्टियोपोरोसिस आजाराला बळी पडले आहेत. इतकेच नाही तर, कालांतराने हाडे इतकी कमकुवत होतात की, सांध्यात थोडस्‌ अडखळणे, शिंक किंवा खोकल्याने देखील हाडे मोडण्याचा धोका असतो. चाळीशीनंतर अशा संभाव्य रुग्णांनी आदी जोखीम ओळखुन प्रतिबंधात्मक उपाय (Preventive measures) करत रहावे.

ऑस्टियोपोरोसिस का होतो?

ऑस्टियोपोरोसिस अनेक कारणांमुळे होऊ शकतो. काही परिस्थितींमध्ये, ते टाळणे देखील शक्य नाही. डॉक्टरर्स-आरोग्य तज्ञांच्या मते, आपले शरीर सतत जुन्या हाडांच्या ऊतींचे(सेल्स्‌) शोषण करते आणि नवीन सेल्स्‌ तयार करते, ज्यामुळे हाडांची घनता, ताकद आणि संरचनात्मक स्थिरता राखली जाते. वय आणि जिवनशैलीचे अनेक घटक नवीन हाडांच्या ऊतींच्या उत्पादनावर परिणाम करतात, ज्यामुळे जुने ऊतक शोषले जाते परंतु, शरीरात नव्या उतकांची निर्मीती मंदावली की, अशा समस्यांचा धोका वाढतो.

ऑस्टियोपोरोसिसची जोखीम समजून घ्या

ऑस्टियोपोरोसिस स्त्री आणि पुरुष दोघांनाही प्रभावित करते. रजोनिवृत्तीनंतरच्या स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन हार्मोन अचानक कमी झाल्यामुळे धोका वाढतो. इस्ट्रोजेन हा हार्मोन आहे जो सामान्यतः स्त्रियांना ऑस्टियोपोरोसिसपासून वाचवतो. ज्या लोकांच्या कुटुंबात ऑस्टिओपोरोसिसचा इतिहास आहे त्यांना या आजाराचा अनुवांशिक धोका वाढतो. तुमची उंची आणि वय देखील या समस्येत भर घालू शकते.

लक्षणे दिसताच व्हा सावध

ऑस्टिओपोरोसिसची लक्षणे ओळखून त्यावर वेळीच उपचार सुरू केले तर त्याची गुंतागुंत कमी होऊ शकते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तथापि, सुरुवातीच्या टप्प्यात, बऱयाच लोकांना कोणतीही लक्षणे किंवा चिन्हे दिसत नाहीत, ज्यामुळे निदान करणे कठीण होऊ शकते. बहुतेक प्रकरणांमध्ये, फ्रॅक्चर होईपर्यंत ही समस्या शोधली जात नाही. तथापि, लोकांनी काही लक्षणांबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे.

ही आहेत, आजाराची प्रमुख लक्षणे

– पकड शक्ती कमी होणे. – नखे सहज तुटतात. – अगदी हलक्या दुखापतीनंतरही हाडांचे दुखणे अधिक तीव्र असते.

– ऑस्टिओपोरोसिस कसा टाळायचा?

हाडे निरोगी ठेवण्यासाठी उपाय म्हणुन ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी केला जाऊ शकतो. यासाठी आहारात पोषक तत्वांनी युक्त गोष्टींचा समावेश करणे गरजेचे आहे. हाडे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे सेवन आवश्यक आहे. हाडांच्या आरोग्यास प्रोत्साहन देणारे इतर पोषक घटक प्रथिने, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन के आणि झिंक(जस्त) यांचा समावेश होतो. आहारासोबतच योग्य शारीरिक हालचाली व नियमित व्यायामाची सवय लावा.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें