AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यूरोडायव्हर्जंट मुलांच्या दातांची काळजी कशी घ्यावी, डॉ. विवेक जोगाणी यांनी सुचवले उपाय

ऑटिझम किंवा संवेदनशीलतेच्या समस्या असलेल्या न्यूरोडायव्हर्जंट मुलांसाठी त्यांच्या मौखिक आरोग्याची काळजी घेणे हे पालकांच्या दृष्टीने मोठा टास्क असतो. याबाबत Preventive Dentist आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. विवेक जोगाणी यांच्या केलेली बातचित वाचकांसाठी...

न्यूरोडायव्हर्जंट मुलांच्या दातांची काळजी कशी घ्यावी, डॉ. विवेक जोगाणी यांनी सुचवले उपाय
Dr. Vivek Jogani
| Updated on: Oct 06, 2026 | 5:23 PM
Share

मुंबईतील Kids n Teens Dental Clinic चे बालरोग तज्ज्ञ आणि प्रिव्हेंटिव्ह डेंटिस्ट (Preventive Dentist) डॉ. विवेक जोगाणी यांच्या मते न्यूरोडायव्हर्जंट मुलांसाठी दातांची आणि तोंडाच्या आरोग्याची काळजी घेताना एकच पद्धत सर्वांसाठी लागू होत नाही. त्यासाठी संयम, सहानुभूती आणि प्रत्येक मुलाच्या गरजेनुसार वैयक्तिक दृष्टिकोन आवश्यक असतो. डॉ. विवेक जोगाणी यांनी न्युरोडायव्हर्जंट मुलांच्या दातांची कशी काळजी घ्यावी असे या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

1. ऑटिझम आणि संवेदनशीलतेच्या समस्या असलेल्या न्यूरोडायव्हर्जंट मुलांसाठी दात घासणे आव्हानात्मक का ठरते?

बहुतेक न्यूरोडायव्हर्जंट मुले दात घासत नाहीत याचा अर्थ त्यांना स्वच्छ दात नको असतात असा नाही, असे डॉ. विवेक जोगाणी सांगतात. ऑटिझम, ADHD, डाऊन सिंड्रोम आणि इतर विकासात्मक स्थिती असलेल्या मुलांना संवेदनांशी संबंधित माहिती वेगळ्या पद्धतीने अनुभवास येतात. उदाहरणार्थ, काही मुले आनंदाने इडली खातील, पण त्याच पिठापासून बनलेला डोसा खाण्यास नकार देतील, कारण त्याचा पोत (texture) त्यांना वेगळा वाटतो.मौखिक स्वच्छतेबाबतही हेच लागू होते. जेव्हा पालक या संवेदनात्मक फरकांना समजून घेतात, तेव्हा दात घासणे ही केवळ एक सवय लादण्याची गोष्ट राहत नाही, तर मुलाला आरामदायी वाटेल अशी प्रक्रिया बनते. त्यामुळे दंतचिकित्सा आणि दैनंदिन मौखिक स्वच्छता अधिक सुलभ होऊ शकते.

2. न्यूरोडायव्हर्जंट मुलांच्या गरजेनुसार दिनचर्या बदलणे का महत्त्वाचे आहे?

डॉ. विवेक जोगाणी यांच्या मते, काही विशेष उत्पादने अशा मुलांना काही प्रमाणात मदत करू शकतात, परंतु सर्वप्रथम मुलाला समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक न्यूरोडायव्हर्जंट मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते. त्याच्या संवेदनात्मक आवडी-निवडी, संवाद करण्याची पद्धत आणि आरामदायी वाटणाऱ्या गोष्टी वेगळ्या असतात. एका मुलासाठी योग्य असलेली गोष्ट दुसऱ्यासाठी योग्य असेलच असे नाही असेही डॉ.विवेक जोगाणी सांगितात.म्हणूनच दिनचर्येला मुलांशी जुळवून घेणे आवश्यक आहे; सर्व मुलांनी एकाच पद्धतीशी जुळवून घ्यावे अशी अपेक्षा ठेवू नये. हाच दृष्टिकोन समावेशक मौखिक आरोग्यसेवेचा खरा पाया असल्याचे डॉ. विवेक जोगाणी सांगतात. यातून सुलभ आणि सर्वसमावेशक दंतसेवेची गरजही अधोरेखित होते, जिथे प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार मौखिक आरोग्याच्या सवयी विकसित केल्या जातात असेही ते म्हणाले.

3. न्यूरोडायव्हर्जंट मुलांसाठी दंतस्वच्छतेची साधने कशी निवडावी ?

डॉ. विवेक जोगाणी यांच्या मते, योग्य साधनांची निवड मोठा फरक घडवू शकते.लांब हँडल आणि लहान ब्रश हेड असलेला टूथब्रश अनेकदा अधिक आरामदायी आणि नियंत्रित वापरासाठी उपयुक्त ठरतो.अनेक मुलांना थुंकण्याची सवय विकसित होण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे चुकून गिळले गेले तरी सुरक्षित असलेली सौम्य चवीची टूथपेस्ट उपयुक्त ठरते.काही परिस्थितींमध्ये, जसे की आजारपणात किंवा प्रवासादरम्यान, नियमित ब्रश करणे शक्य नसते. अशावेळी मऊ मलमलच्या कापडाने किंवा विशेष तयार केलेल्या ओरल वाइप्सने दात हलक्या हाताने स्वच्छ करता येतात.

मात्र, हे पर्याय तात्पुरतेच वापरावेत आणि नियमित ब्रशिंगची जागा घेऊ नयेत.मुलांच्या संवेदनात्मक आवडीनुसार योग्य मौखिक आरोग्य उत्पादने निवडल्यास दंतस्वच्छता सुधारण्यास मदत होते आणि कुटुंबीय तसेच काळजीवाहकांसाठी दैनंदिन दिनक्रम अधिक सोपा बनतो.

4. न्यूरोडायव्हर्जंट मुलांमध्ये दंतस्वच्छतेच्या सवयी विकसित होण्यासाठी तुम्ही कोणता सल्ला द्याल?

डॉ. विवेक जोगाणी यांच्या मते समावेशक दंतसेवा ही केवळ निरोगी दातांपुरती मर्यादित नसते. प्रत्येक मुलाचे जग पाहण्याचे आणि समजून घेण्याचे दृष्टिकोन वेगळे असतात, हे मान्य करणे आणि त्यांच्यावर लावलेली लेबले दूर करणे हा पहिला टप्पा आहे. पालक आणि काळजीवाहकांसाठी नियमित प्रतिबंधात्मक मौखिक आरोग्यसेवा, संयम आणि समजूतदारपणा हे आयुष्यभर टिकणाऱ्या दंतस्वच्छतेच्या सवयी निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

दिव्यांग व्यक्तींच्या मौखिक आरोग्याकडेही इतर आरोग्यविषयक गरजांइतक्याच गांभीर्याने पाहिले पाहिजे. जेव्हा कुटुंबे, शाळा आणि आरोग्यसेवा व्यावसायिक अपेक्षांपेक्षा सहानुभूतीला प्राधान्य देतात, तेव्हा मौखिक आरोग्यसेवा ही प्रत्येक मुलाला सुरक्षित, सन्मानित आणि आत्मविश्वासपूर्ण वाटण्यासाठी एक संधी बनते,ज्यामुळे ते मनमोकळेपणाने हसू शकतात असेही त्यांनी सांगितले.

Follow Us
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?
आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; कौलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
Shivsena : आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; शिंदे गटाचे वकील नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
Video : 1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल
दिल्लीतील आंदोलन, काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल!
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ, विरोधकांच्या मोर्चामुळे राजधानीत वातावरण तापलं!
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा...
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा गंभीर आरोप
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय घडलं?
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय काय घडलं?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?