AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहो…ग्रीन टी आणि ब्लॅक टी सोडा आणि इकडे पाहा मेथीचा चहाचे जबरदस्त फायदे…!

वजन कमी करण्यासाठी मेथी फायदेशीर आहे. मेथीच्या दाण्यांमध्ये विद्रव्य फायबर आणि ग्लूकोमोनास फायबर असते. ते आतड्यांमधून ग्लूकोज शोषून घेण्यास मदत करते. , मेथीमधील अल्कॉइड्समुळे शरीरात इन्सुलिनचे प्रमाण सुधारते आणि ग्लाइसेमिक पातळी कमी होते. यामुळे मधुमेहाचा धोका देखील कमी होतो. ज्यांना वजन कमी करायचे आहे.

अहो...ग्रीन टी आणि ब्लॅक टी सोडा आणि इकडे पाहा मेथीचा चहाचे जबरदस्त फायदे...!
Image Credit source: krishijagran.com
| Edited By: | Updated on: Jun 01, 2022 | 9:23 AM
Share

मुंबई : आपल्यापैकी अनेकांची सकाळ एक कप चहाने (Tea) होते. काहींना तर बेड टीचीच सवय असते. आपल्याकडे जास्त करून दूधाचा चहा पिला जातो. मात्र, जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, ते ग्रीन टीचे अधिक सेवन करतात. ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, ग्रीन टी (Green tea) पेक्षाही वजन कमी करण्यासाठी मेथीचा चहा फायदेशीर ठरतो. मेथीमध्ये अँटासिड्स असतात, जे शरीरात ऍसिड रिफ्लेक्ससारखे काम करतात. मेथीचा चहा पिल्याने बैली फॅटही कमी होतात. फक्त मेथीची चहा वजन कमी करण्यासाठीच नाहीतर तो आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर (Beneficial) ठरतो. मेथीचा चहा तयार करण्यासाठीही सोपा आहे. याचे रिकाम्या पोटी सेवन केल्याने वजन कमी होण्यासोबतच अनेक आरोग्य फायदे देखील मिळतात. चला तर मग जाणून घेऊयात मेथीचा चहा पिण्याचे आरोग्य फायदे.

मेथीचे फायदे

वजन कमी करण्यासाठी मेथी फायदेशीर आहे. मेथीच्या दाण्यांमध्ये विद्रव्य फायबर आणि ग्लूकोमोनास फायबर असते. ते आतड्यांमधून ग्लूकोज शोषून घेण्यास मदत करते. , मेथीमधील अल्कॉइड्समुळे शरीरात इन्सुलिनचे प्रमाण सुधारते आणि ग्लाइसेमिक पातळी कमी होते. यामुळे मधुमेहाचा धोका देखील कमी होतो. ज्यांना वजन कमी करायचे आहे, अशांनी आपल्या आहारामध्ये जास्तीत-जास्त मेथीचा समावेश करायला हवा.

मेथीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. साखरेची पातळी राखण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. हे तुमच्या शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढण्यापासून रोखते. तुम्ही सकाळी जो चहा घेता त्यामध्ये थोडी मेथी मिक्स करा. यामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. मात्र, मेथीचे प्रमाण अगोदरच ठरवून घेतलेले फायदेशीर ठरते. बैली फॅट कमी करण्यासाठी आपण मेथीचे दाणे काही वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवून ते खाऊ शकतो. यामुळे फायदा होता.

मेथीचा चहा

मेथीचा चहा बनवणे सोप्पे आहे. रात्री मेथी पाण्यामध्ये भिजत ठेवा. त्यानंतर कोमट पाण्यामध्ये या मेथी घाला आणि गरम होईद्या. चहा कोमट झाली की, त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा. हा चहा उपाशी पोटी आणि गरमा-गरम प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. जर आपल्याला हवी असेल तर आपण या चहामध्ये एक चमचा ग्रीन टी देखील घालू शकता. याशिवाय कोमट लिंबू पाण्यात थोडी मेथी आणि एक चमचा मध मिसळून दिवसातून दोनदा प्या.

Follow Us
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन