AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी या 3 गोष्टी दुधात मिक्स करून खा आणि निरोगी आयुष्य जगा!

दुधामध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. जी शरीरातील पौष्टिक कमतरता भरून काढतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे नक्कीच फायदेशीर आहेत. पण अधिक फायदे मिळवण्यासाठी तुम्ही दुधात तीन गोष्टी मिसळू शकता. हे रक्तातील साखरेचे प्रमाण सहज नियंत्रित करू शकते.

Health | मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी या 3 गोष्टी दुधात मिक्स करून खा आणि निरोगी आयुष्य जगा!
| Updated on: Jun 19, 2022 | 6:30 AM
Share

मुंबई : भारतातील मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढतो. टाईप 2 मधुमेहामध्ये, इन्सुलिन कमी तयार होते किंवा ते तयार केले तरीही ते योग्यरित्या कार्य करत नाही. परिणामी रक्तातील साखरेची पातळी वाढते. आणि म्हणूनच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित (Controlled) ठेवणे महत्त्वाचे आहे. दुसरीकडे, टाइप-1 मधुमेहाच्या बाबतीत, शरीरात इन्सुलिन हा हार्मोन तयार होत नाही. कारण एकदा मधुमेहा झाल्यावर आपले शरीर अनेक रोगांचे घर होऊन बसते. यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य खाण्याच्या सवयी पाळणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी तुम्ही दूध (Milk) पिऊ शकता. युनिव्हर्सिटी ऑफ ग्युल्फ आणि टोरंटो विद्यापीठात केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी दररोज नाश्त्यामध्ये दूध पिणे फायदेशीर ठरते.

ओट्स

नाश्त्यात ओट्स आणि कॉर्नफ्लेक्स सारख्या पदार्थात दूध मिसळून खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते. संशोधकांच्या मते, लठ्ठपणामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. त्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्हाला प्रथिनयुक्त पदार्थ नाश्त्यामध्ये खायचे असतील तर दूध हा एक चांगला पर्याय आहे.

जीवनसत्त्वे

दुधामध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. जी शरीरातील पौष्टिक कमतरता भरून काढतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे नक्कीच फायदेशीर आहेत. पण अधिक फायदे मिळवण्यासाठी तुम्ही दुधात तीन गोष्टी मिसळू शकता. हे रक्तातील साखरेचे प्रमाण सहज नियंत्रित करू शकते.

हिंग

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी दालचिनी आणि हिंग सर्वात फायदेशीर आहे. दालचिनी हा एक असा मसाला आहे ज्यामध्ये हजारो औषधी गुणधर्म आहेत. यातील जीवनसत्त्वे, पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडंट्स मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. तसेच हिंगमुळे आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास देखील मदत होते.

Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...