AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Food For Piles: मूळव्याधामुळे असाल त्रस्त तर आहारात करा ‘या’ भाज्यांचा करा समावेश, लगेच दिसेल फरक

जर तुम्ही मूळव्याधाच्या समस्येने त्रस्त असाल तर आहारात सर्व प्रकारचे फायबर आणि द्रव पदार्थांचा समावेश करावा. जास्तीत जास्त फळं, भाज्या, डाळी खाल्याने तुम्हाला बराच आरामा मिळेल व पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होईल.

Food For Piles: मूळव्याधामुळे असाल त्रस्त तर आहारात करा 'या' भाज्यांचा करा समावेश, लगेच दिसेल फरक
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 10, 2023 | 5:49 PM
Share

नवी दिल्ली – मूळव्याधाला इंग्रजीमध्ये पाइल्स (Piles) असे म्हटले जाते. आपल्या चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे ही समस्या उद्भवते. या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला मलाशय आणि गुदद्वारात सूज येते व वेदना होतात. दीर्घकालीन बद्धकोष्ठता (constipation), सिगारेट किंवा मद्यपान, शौचास बराच वेळ बसून राहणे, मलविसर्जन करताना ताण येणे, वजन वाढणे, जड वस्तू उचलणे, गर्भधारणा इत्यादी कारणांमुळे मूळव्याध (piles problem) होऊ शकतो.

प्राथमिक अवस्थेत असेल तर मूळव्याध ऑपरेशन न करताही बरा होऊ शकतो. मूळव्याधाची समस्या असेल तर आपल्या आहारात फळं, भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणे फार महत्वाचे ठरते. मूळव्याधाची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींचा आहारात समावेश करू शकता, हे जाणून घेऊया.

आहारात घ्या हे पदार्थ

संपूर्ण धान्य

संपूर्ण धान्यांमध्ये भरपूर फायबर असते. यामुळे पचनसंस्थेचे काम चांगले होण्यास मदत होते व आतडे सहज साफ करते. तसेच हे चांगले बॅक्टेरिया निरोगी ठेवण्यास देखील मदत करते. त्यामुळे मूळव्याधाची समस्या असल्यास ओट्स, ब्राऊन राइस आणि गहू इत्यादींचा आहारात नक्कीच समावेश करा. मसूराचे सेवन देखील फायदेशीर ठरते.

पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे 

पोटाच्या बहुतांश समस्यांवर पाणी हे औषध असते. जर तुम्हाला मूळव्याधाचा त्रास होत असेल तर तुम्ही दिवसभरात पुरेसे पाणी प्यायले पाहिजे. असे केल्याने शरीर हायड्रेटेड तर राहतेच तसेच पचनक्रिया चांगली होते, बद्धकोष्ठता होत नाही आणि पोट साफ होते.

खूप फळं खावीत

फळांमध्ये केळी, सफरचंद, द्राक्षे, टरबूज, नासपत, बेरी आणि संत्रं इत्यादींचा समावेश करा. या फळांमध्ये जीवनसत्त्वांशिवाय फायबर्स आढळतात, जे मूळव्याधासाठी फायदेशीर असतात.

हिरव्या पालेभाज्या खाव्यात

हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने मूळव्याधच्या समस्येपासून आराम मिळतो. यामध्ये अनेक प्रकारचे अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे मूळव्याधाची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. यासाठी पालक, कोबी आणि ब्रोकोली इत्यादींचे सेवन करावे.

सिमला मिरचीही फायदेशीर

सिमला मिरचीमध्ये पाणी आणि फायबर यांचे एक अनोखे कॉम्बिनेशन असते. या भाजीमुळे पोट साफ होण्यास आणि मूळव्याधची समस्या दूर होण्यास खूप मदत होते.

कंदमुळं

बटाटा, रताळं, बीट, गाजर इत्यादी जमिनीखाली उगवलेल्या भाज्यांमध्ये असे ततू असतात, ज्यामुळे आपलं आतडं निरोगी राहते. तुम्ही या भाज्या भाजून, उकडून खाऊ शकता. फक्त त्या सालांसकट आवर्जून खाव्यात.

हे पदार्थ खाणे टाळावे

मूळव्याधाचा त्रास असेल तर अनेक गोष्टी खाणे टाळणे आवश्यक आहे. दुग्धजन्य पदार्थ, मैदा, लाल मांस, प्रक्रिया केलेले मांस, तळलेले पदार्थ, अधिक खारट पदार्थ, मसालेदार पदार्थ, कॅफिनयुक्त पदार्थ, मद्यपान करणे, हे टाळावे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच