Healthy Fruits :रंगीबेरंगी फळे, भाज्यांच्या सेवनामुळे महिलांचे आरोग्य वाढते! तुम्हीही खाता की नाही?

रोजच्या आहारात रंगीबेरंगी भाज्या आणि फळांचा समावेश केल्याने महिलांचे आरोग्य वाढते. तसेच त्यांच्या सेवनामुळे दृष्टी कमी होण्याचा धोका कमी होतो, अशी माहिती नव्या अभ्यासातून समोर आली आहे.

Healthy Fruits :रंगीबेरंगी फळे, भाज्यांच्या सेवनामुळे महिलांचे आरोग्य वाढते! तुम्हीही खाता की नाही?
रंगीबेरंगी फळांचा फायदा...
Image Credit source: Twitter
सिद्धेश सावंत

|

Jul 16, 2022 | 12:49 PM

सामान्यत: पुरुषांपेक्षा महिलांचे आयुष्य (live longer) जास्त असते. पण त्या आजारी पडण्याचे प्रमाणही (higher rates of illness)पुरुषांपेक्षा अधिक असते. रोजच्या कामाच्या व्यापात त्यांचे स्वत:कडे, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते आणि त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. मात्र आता एका नव्या अभ्यासातून अशी माहिती समोर आली आहे की योग्य, समतोल आणि चौरस आहाराने हे आजारी पडण्याचे प्रमाण कमी करता येते. ज्या भाज्या आणि फळांमध्ये ‘कॅरोटेनॉइड्स’चे प्रमाण जास्त असते अशी रंगीबेरंगी फळं आणि भाज्या यांचे सेवन आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. यॅम्स, केल, पालक, कलिंगड, बेल पेपर, टोमॅटो, संत्री आणि गाजर अशा रंगीबेरंगी भाज्या व फळांचा आहारात नियमित समावेश करावा. ते डोळ्यांच्या समस्या तसेच संज्ञानात्मक नुकसान (visual and cognitive loss) रोखण्यात महत्वपूर्ण ठरतात. जॉर्जिया युनिव्हर्सिटीत यासंदर्भातील अभ्यास करून निष्कर्ष छापण्यात आला आहे.

‘मॅक्युलर कॅरोटेनॉइड्सचा महिलांचे डोळे आणि मेदूंच्या आरोग्यावर होणारा परिणाम’ (The influence of the macular carotenoids on women’s eye and brain health) नावाने हा निष्कर्ष न्युट्रीशनल न्युरोसायन्समध्ये पब्लिश करण्यात आला. पुरुषांना असे अनेक आजार होतात, ज्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो.

मात्र महिलांमध्ये ते आजार होण्याचे प्रमाण कमी असते किंवा ते खूप उशीरा होतात, पण त्यामुळे त्या दुर्बल बनू शकतात’, असे युजीएच्या फ्रॅंकलिन कॉलेज ऑफ आर्ट्स ॲंड सायन्स डिपार्टमेंट ऑफ सायकॉलॉजी विभागातील, प्राध्यापक बिली. आर. हॅमॉंड यांनी सांगितले.

उदाहरणार्थ, जगभरात मॅ क्युलर डिजनरेशन किंवा डिम्नेशिया या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये महिलांची संख्या दोन तृतीयांश आहे, असे ते म्हणाले. या निष्कर्षासाठी गेल्या काही वर्षांत करण्यात आलेल्या अभ्यासातील माहितीचाही उपयोग करण्यात आला. मात्र फळे व भाज्यांच्या सेवनामुळे त्यांना पोषक घटक मिळतात.

हे सुद्धा वाचा

काय आहेत अभ्यासातील महत्वाचे मुद्दे

  1. रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश केल्यामुळे महिलांचे डोळे आणि मेंदूच्या आजारापासून संरक्षण होते.
  2. ‘कॅरोटेनॉइड्स’ चा मोठा स्त्रोत असलेल्या यॅम्स, केल, पालक, कलिंगड, बेल पेपर, टोमॅटो, संत्री आणि गाजर अशी रंगीबेरंगी भाज्या व फळांचे सेवन केल्यामुळे डोळ्यांच्या समस्या तसेच संज्ञानात्मक नुकसान (visual and cognitive loss) रोखण्यात महत्वपूर्ण ठरतात.
  3. चौरस आहार, फळे, भाज्या रोज खाल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच पण तुमचे डोळे आणि मेंदूची कार्यक्षमताही वाढते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें