AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नको तो चमचा, हाताने खा! फायदे वाचाल तर हातानेच खाल

हाताने अन्न खाण्याचा जास्तीत जास्त फायदा तेव्हाच होतो जेव्हा तुमचे हात स्वच्छ असतील. यासाठी प्रत्येकवेळी जेवताना आपले हात चांगले धुवा, अन्यथा रोग पसरवणारे जंतू पोटात जातील आणि मग फूड पॉयझनिंगसारख्या समस्या उद्भवू शकतात.

नको तो चमचा, हाताने खा! फायदे वाचाल तर हातानेच खाल
eating with hands
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Aug 24, 2023 | 9:16 PM
Share

मुंबई: हाताने अन्न खाणे ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे. पण बदलत्या काळात चमच्याने खाण्याची क्रेझ वाढली आहे, विशेषत: तरुण वयोगटातील लोकांना हे करायला आवडते, घरातील मोठ्यांनी कितीही समजावून सांगितले तरी ते त्यांना पटत नाही. आरोग्यतज्ञांच्या मते चमच्याऐवजी हाताने खाणे चांगले कारण यामुळे आरोग्यास अनेक फायदे होऊ शकतात.

हाताने खाण्याचे फायदे

  1. हाताच्या साहाय्याने खाल्ल्यास स्नायूंचा व्यायाम होईल, कारण अशा प्रकारे खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि हातांचे सर्व सांधे मजबूत होतात. विशेषत: स्नायूंच्या लवचिकतेसाठी ही पद्धत चांगली आहे.
  2. आयुर्वेदानुसार जेव्हा आपल्या हाताची बोटे तोंडाच्या वरच्या भागाला स्पर्श करतात तेव्हा पचनशक्ती सुधारते, याशिवाय चांगले बॅक्टेरिया हातांद्वारे पोटात जातात, ज्यामुळे आतड्यांना फायदा होतो.
  3. मधुमेहाचा धोका कमी होतो : घाईगडबडीत खाल्ल्याने टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढतो, हे अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे. सामान्यत: जे लोक चमच्याने खातात त्यांचा वेग हाताने खाणाऱ्यांपेक्षा जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.
  4. तुमचा हात एका उत्तम तापमान सेन्सरप्रमाणे काम करतो. जेव्हा आपण चमच्याच्या किंवा काट्याच्या साहाय्याने अन्न खातो तेव्हा ते किती गरम आहे हे आपल्याला सुरुवातीला माहित नसते. जेव्हा आपण अन्नाला स्पर्श करता तेव्हा आपल्या बोटांना माहित असते की आत्ता अन्न खाणे सुरक्षित आहे की नाही.
  5. हाताने अन्न खाण्याचा जास्तीत जास्त फायदा तेव्हाच होतो जेव्हा तुमचे हात स्वच्छ असतील. यासाठी प्रत्येकवेळी जेवताना आपले हात चांगले धुवा, अन्यथा रोग पसरवणारे जंतू पोटात जातील आणि मग फूड पॉयझनिंगसारख्या समस्या उद्भवू शकतात.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

Follow Us
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना..
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना आणखी उशिर
मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
Lalbag Cha Raja : मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...