AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Is It Safe To Use Mobile Phone In Pregnancy : गरोदर महिलांसाठी मोबाईलचा अतिवापर घातक ? तज्ज्ञ काय सांगतात ?

गर्भारपण हे प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा, खास क्षण असतो. या काळात आईने मोबाईलचा जास्त वापर केला तर बाळावर परिणाम होऊ शकतो.

Is It Safe To Use Mobile Phone In Pregnancy : गरोदर महिलांसाठी मोबाईलचा अतिवापर घातक ? तज्ज्ञ काय सांगतात ?
Image Credit source: freepik
| Updated on: Jul 14, 2023 | 6:50 PM
Share

Is It Safe To Use Mobile Phone In Pregnancy : आई होणं, नव्या जीवाला जन्म देणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो. हा प्रवास जरी कठीण असला तरी बाळासाठी आई सर्व काही सहन करते. गर्भारपणात (Pregnancy) स्त्रीला आरोग्याची जास्त काळजी (care) घ्यावी लागते. कारण जरासही दुर्लक्ष झालं किंवा बेजबाबदारपणा झाल्यास आई व बाळ दोघांच्याही आरोग्याचे, आयुष्याचे नुकसान होऊ शकते. किंवा त्यांच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

योग्य आहार, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांकडे नियमित फॉलोअप, तपासणी करणे महत्वाचे ठरते. यासोबतच गरोदर महिलांनीही फोनपासून दूर राहावे. गर्भारपणात मोबाईलच्या अतीवापरामुळे न जन्मलेल्या बाळाच्या विकासावर वाईट परिणाम होतो. याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात, ते जाणून घेऊया.

एका संशोधनात असे आढळून आले आहे की जर गरोदर महिला या जास्त वेळ मोबाईल रेडिएशनच्या संपर्कात आल्या तर जन्मानंतर बाळाला आयुष्यभर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. एवढेच नव्हे तर गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या मानसिक विकासावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. मुल लहानपणापासूनच खूप हायपरॲक्टिव्ह होऊ शकतात. इतर मुलांच्या तुलनेत ती जास्त चिडचिड करू शकतात. हे विशेषतः गर्भधारणेच्या 2 ते 18 आठवड्यांच्या दरम्यान हानिकारक आहे

मोबाईलमधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन निघतात, या व्हेव्ज शरीराच्या डीएनएचे नुकसान करू शकतात. हे भविष्यात मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. गरोदर स्त्रिया दीर्घकाळ रेडिएशनच्या संपर्कात राहिल्यास त्यांच्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. झोपेवर परिणाम होऊन ती विस्कळीत होऊ शकते. पुरेशा झोपेच्या अभावामुळे थकवा येणे, चिंता यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. तसेच त्याचा स्मरणशक्तीवरही परिणाम होतो.

डेन्मार्कमधील एका अभ्यासात असेही समोर आले आहे की ज्या महिला प्रसूतीपूर्वी आणि प्रसूतीनंतर स्मार्टफोनचा अधिक वापर करतात त्यांच्या मुलामध्ये हायपरॲक्टिव्हिटी आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

गरोदर महिलांनी फोनपासून कसे दूर रहावे ?

  1. मोबाईलवर जास्त बोलण्याऐवजी मेसेजच्या माध्यमातून संवाद साधावा.
  2. गरोदरपणात सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे, स्क्रोलिंग करणे टाळावे.
  3. फोनवर बोलायचे असेल तर हेडफोन्स घालून बोलावे, त्यामुळे फोनच्या रेडिएशन शरीराच्या जास्त जवळ येणार नाहीत.
  4. टाइमपास करण्यासाठी मोबाईलचा वापर करण्याऐवजी एखादा छंद जोपासावेत, गाणी ऐकावीत किंवा पुस्तक वाचावे.
  5. फोन सतत तुमच्याजवळ ठेऊ नका.
  6. एखादी मालिका किंवा चित्रपट मोबाईलवर पाहण्याऐवजी टीव्हीवर पहावा.
  7. रात्री झोपताना फोन उशीखाली ठेवून झोपू नका. तो शरीरापासून लांब, टेबलवर ठेवावा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल..
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल...
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं.
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?.
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात..
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात...
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा.
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.