AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Death | मृत्यू दारात असताना शरीरात नेमके कोणते बदल होतात, वाचा मृत्यू होण्याच्या अगोदरची प्रमुख लक्षणे!

द कन्व्हर्सेशनच्या लेखात मरण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलण्यात आले, ते म्हणाले की मला वाटते, कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी मृत्यूची प्रक्रिया सुरू होते. या काळात लोकांची तब्येत अधिकच खराब होऊ लागते. त्यांना चालायला आणि झोपायलाही त्रास होऊ लागतो.

Death | मृत्यू दारात असताना शरीरात नेमके कोणते बदल होतात, वाचा मृत्यू होण्याच्या अगोदरची प्रमुख लक्षणे!
Image Credit source: unsplash.com
| Updated on: Jun 19, 2022 | 2:37 PM
Share

मुंबई : जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू (Death) होणारच आहे. जगामध्ये कोणीही अमर नाहीये. प्रत्येकालाच आज ना उद्या मरायचेच आहे. मात्र मृत्यू होताना कसे वाटते?, त्यावेळेच्या भावना नेमक्या काय असतील, याबद्दल कदाचित कोणीही उत्तर देऊ शकत नाही. फक्त ज्याने मृत्यू अनुभवला आहे तोच या विषयावर सांगू शकेल. नुकताच एका तज्ज्ञ (Expert) डाॅक्टरांनी सांगितले की, मृत्यूपूर्वी काय होते आणि कसे वाटते? द एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, आपल्या आयुष्यात अनेकांना मरताना पाहिलेल्या डॉक्टरने मृत्यूपूर्वी मानवी शरीरात काय बदल घडतात हे सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊयात मृत्यूच्या अगोदर मानवी शरीरामध्ये (Body) नेमके काय बदल होतात.

मरणाच्या आठ दिवस अगोदर पाणीही पिऊ वाटत नाही

Themirror च्या अहवालामध्ये म्हटंले गेले आहे की, नैसर्गिक घटनांवर फार कमी अभ्यास करता येतो. मृत्यूपूर्वी कसे वाटते याबद्दल बोलताना, एक डॉक्टर म्हणतात की मृत्यूची प्रक्रिया सामान्यतः हृदयाची धडधड थांबण्याच्या सुमारे दोन आठवड्यांपूर्वी सुरू होते. द कन्व्हर्सेशनच्या लेखात मरण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलण्यात आले, ते म्हणाले की मला वाटते, कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी मृत्यूची प्रक्रिया सुरू होते. या काळात लोकांची तब्येत अधिकच खराब होऊ लागते. त्यांना चालायला आणि झोपायलाही त्रास होऊ लागतो. आयुष्याच्या शेवटचा टप्पा म्हणजे यादरम्यान अजिबातच अन्न खाणे किंवा पाणीही पिऊ वाटत नाही. ज्यांचा मृत्यू आठ दिवसांवर आला आहे, असे लोक तर गोळ्या देखील खात नाहीत.

मेंदूमधून एंडोर्फिनसह अनेक रसायने बाहेर पडतात

मृत्यूच्या वेळी शरीरात नेमके काय होते हे अध्याप कळू शकले नाहीये. परंतु काही संशोधनानुसार मृत्यूच्या वेळी मेंदूमधून एंडोर्फिनसह अनेक रसायने बाहेर पडतात. परंतु आतापर्यंतच्या संशोधनानुसार, लोक जसजसे मृत्यूच्या जवळ येतात, तसतसे शरीरातील तणाव रसायने वाढतात. मात्र, जर एखाद्या व्यक्तीला काही आजार वगैरे असतील तर कदाचित त्यांची लक्षणे देखील वेगळी असू शकतात. मरण्याच्या प्रक्रियेत लोकांच्या वेदना कमी होतात, परंतु असे का होते हे सांगणे थोडे कठिणच आहे. मानवाच्या मृत्यूसंदर्भात अनेक संशोधने करण्यात आलीयेत, मात्र मृत्यूच्या वेळी नेमके काय होते आणि त्या व्यक्तीच्या नेमक्या काय भावना असतात, हे सांगणे थोडे कठिणच आहे. यासंदर्भात आजतकने सविस्तर रिपोर्ट दिला आहे.

Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...