तुमच्या नखांमध्ये ‘हे’ 5 बदल दिसले तर बाळगा सावधगिरी, असू शकतात यकृताच्या आजाराची लक्षणे
आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे लोकांमध्ये अनेक प्रकारचे आजारांच्या समस्या वाढत आहेत. त्यापैकी एक म्हणजे फॅटी लिव्हरची समस्या. हा आजार लिव्हरमध्ये जास्त फॅट जमा झाल्यामुळे होतो, ज्याची सुरुवातीची लक्षणे नखांमध्ये दिसून येतात. तर आजच्या लेखात तुमच्या नखांमध्ये 'हे' 5 बदल दिसले तर दुर्लक्ष न करता कोणती सावधगिरी बाळगावी हे जाणून घेऊयात...

आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांच्या खाण्याच्या सवयी खूप बदलेल्या आहेत. असे म्हटले जाते की जर आपण निरोगी आहार घेतला तर शरीराला अनेक गंभीर आजारांपासून वाचवता येते. खरं तर जेव्हा आपण निरोगी अन्नपदार्थ खातो तेव्हा शरीराला संपूर्ण पोषण मिळते. मात्र आजच्या काळात लोकांसाठी हे शक्य नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. वेळेचा अभाव ही एक सामान्य गोष्ट आहे.
यामुळे लोकं जास्त प्रमाणात बाहेरील पदार्थांचे सेवन करू लागले आहेत. पण हे पदार्थ मात्र तुमच्या शरीराचे गंभीर नुकसान करत आहे. यामुळे बहुतेक लोकांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या दिसून येते. फॅटी लिव्हर तेव्हा होते जेव्हा लिव्हरमध्ये सामान्यपेक्षा जास्त फॅट जमा होऊ लागते. जर हा आजार वेळेवर ओळखला गेला तर उपचार शक्य आहेत.
जेव्हा तुम्हाला कोणताही आजार होतो तेव्हा तुमचे शरीर आधीच काही संकेत देऊ लागते. ते ओळखणे खूप महत्वाचे आहे. खरं तर नखांमध्ये काही बदल लिव्हरशी संबंधित आजारांकडे देखील संकेत देत असतात. आजच्या लेखात आपण तुम्हाला नखांमध्ये दिसणाऱ्या काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत ज्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये. चला सविस्तर जाणून घेऊया-
नखांचा रंग बदलणे
जेव्हा तुम्हाला लिव्हरचे आजार होतात तेव्हा तुमच्या नखांचा रंग बदलू लागतो . कधीकधी तुमच्या नखांचा रंग फिकट किंवा पिवळा दिसू लागतो. जर तुम्हाला ही लक्षणे दिसली तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पिवळ्या किंवा लाल रेषांची दिसणे
कधीकधी लिव्हरशी संबंधित आजारांमुळे आपल्या नखांवर लाल किंवा पिवळ्या रेषा दिसू लागतात. जर तुम्हाला या रेषा बराच काळ दिसत असतील तर लिव्हरची तपासणी नक्की करा. त्याकडे दुर्लक्ष केल्याने आजार वाढू शकतात.
पांढरे डाग दिसतात
जर तुम्हाला तुमच्या नखांवर लहान पांढरे डाग दिसले तर समजून घ्या की लिव्हरची समस्या असू शकते . हे प्रथिनांच्या कमतरतेमुळे किंवा यकृत योग्यरित्या कार्य करत नसल्यामुळे देखील असू शकते. जर ही लक्षणे बराच काळ टिकून राहिली तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरकडे जावे.
वारंवार नखे तुटणे
कधीकधी जेव्हा तुम्हाला लिव्हरचा आजार असतो तेव्हा तुम्हाला तुमच्या नखांमध्ये बदल दिसू लागतात. यामुळे तुमचे नखे पातळ होतात आणि कमकुवत झाल्याने वारंवार नखे तुटतात. नखांचा आकार बदलत राहतो.
लिव्हरशी संबंधित कोणत्याही आजारात नखांच्या आकारात बदल दिसून येतात. नखांचा पुढचा भाग उंचावलेला किंवा खाली वाकलेला दिसतो.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)