नेहमी थकल्यासारखं वाटतं? या वाईट सवयींमुळे बिघडते आरोग्य

आपल्या जीवनशैलीचा (Lifestyle) आपल्या आरोग्यावर मोठा प्रभाव पडत असतो. आपण काय खातो, सकाळी केव्हा उठतो, रात्री केव्हा झोपतो, किती वेळ व्यायाम करतो, या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.

नेहमी थकल्यासारखं वाटतं? या वाईट सवयींमुळे बिघडते आरोग्य
आरोग्य
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 1:16 PM

आपल्या जीवनशैलीचा (Lifestyle) आपल्या आरोग्यावर मोठा प्रभाव पडत असतो. आपण काय खातो, सकाळी केव्हा उठतो, रात्री केव्हा झोपतो, किती वेळ व्यायाम करतो, या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. सवयी चांगल्या असतील तर शरीर तंदुरुस्त राहते. परंतु वाईट सवयी असतील तर याचा परिणाम आपल्या आरोग्यासह, व्यक्तीमत्वावर (Personality) होत असतो. आपल्या अनेकदा असे लक्षात येते, की नेहमी थकवा (Feeling tired) जाणवतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की अशा नेहमी थकवा का वाटतो? यामागे अनेक कारणे आहेत. तुमच्या खाण्यापिण्यापासून ते चुकीच्या राहणीमानापर्यंत, तुमच्या थकव्याचे सर्वात मोठे कारण आहे. ‘मिरर’मधील एका अहवालानुसार, यूकेमध्ये पाचपैकी एका व्यक्तीला नेहमी थकल्यासारखे वाटते. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा समावेश असतो. त्यामुळे नेहमी थकवा का जाणवतो, याची काही कारणे समोर आली आहेत.

चुकीचा आहार

नेहमी थकल्यासारखे वाटण्याचे कारण म्हणजे चुकीचा आहार… एका रिपोर्टनुसार, जर तुम्ही पोषक तत्वांनी परिपूर्ण आहार घेतला नाही, तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बहुतेक लोक ऊर्जेसाठी जास्त साखरयुक्त पदार्थ खातात. या व्यतिरिक्त, बरेच लोक कामाच्या धावपळीत नाश्तादेखील करीत नाहीत, अनेकदा जेवणाऐवजी फास्टफूडला प्राधान्य देण्यात येत असते. त्यामुळे यातून शरीराला अनेक नुकसान होत असतात. त्यामुळे बाहेरील अन्न नेहमी टाळावे.

व्यायामाचा अभाव

अनेक लोकांमध्ये व्यायामाचा अभाव दिसून येत असतो. व्यायाम न केल्यामुळे शारीरिक हालचाली कमी होतात. याचा परिणाम आपल्या शरीरावर जाणवत असतो. टीव्ही, मोबाईल फोन आदींमुळे मुलांसह आपण सगळेच क्रीडांगणांपासून दूर होत चाललो आहोत, तासंतास टीव्ही तसेच मोबाईलसमोर बसून राहिल्यामुळे शारीरिक क्रियाकलाप कमी झाले आहेत. त्यामुळे लठ्ठपणा आला आहे. यामुळेच आपणास अनेक वेळा मानसिक थकवा जाणवतो.

कॅफिनचा अतिरेक

जास्त प्रमाणात कॅफिन घेतल्याने तुम्हाला थकवा जाणवण्याची शक्यता असते. आजकाल, बहुतेक लोक थकल्यावर मोठ्या प्रमाणात कॉफी किंवा चहाचे सेवन करीत असतात. परंतु याने शरीरावर अनेक दुष्परिणाम जाणवत असतात. त्यामुळे कॅफिनचे मर्यादित प्रमाणात सेवन करण्याचा प्रयत्न करा.

Feeling tired all the time due to these bad habits

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.