AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढत्या वयात हाडं झाली कमकुवत ? अशी मजबूत ठेवा तुमची हाडं, या टिप्स बिलकूल विसरू नका

हाड मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी खूप महत्वाचे आहे. वाढत्या वयाबरोबर शरीरात व्हिटॅमिन डीसुद्धा कमी होऊ लागते.

वाढत्या वयात हाडं झाली कमकुवत ? अशी मजबूत ठेवा तुमची हाडं, या टिप्स बिलकूल विसरू नका
Image Credit source: freepik
| Updated on: Jun 16, 2023 | 6:07 PM
Share

Bones Diseases : वाढत्या वयाबरोबर शरीराला अनेक आजार ग्रासतात. वयानुसार हाडही (Bones) कमकुवत होऊ लागतात. वृद्धापकाळात हाडं कमकुवत होऊ लागल्याने असे होते. यामुळे हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. संधिवात, ऑस्टिओपोरोसिस यांसारख्या आजारांना लोक बळी पडतात, परंतु काही पद्धतींचा अवलंब करून हाडे मजबूत ठेवता येतात.

म्हातारपणात हाडे मजबूत ठेवण्यासाठी काही टिप्सचा आवर्जून अवलंब करा.

जास्त कॅल्शिअमयुक्त आहार घ्या

हाडे मजबूत ठेवण्यासाठी आहारात घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशावेळी रोजच्या आहारात कॅल्शियमयुक्त अन्नाचा समावेश करा. यासाठी दही, दूध, चीज, केळी, ब्रोकोली यांचे सेवन करता येते. 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी त्यांच्या आहारात दररोज 1,000 ते 1,200 मिलीग्राम कॅल्शियम घेणे आवश्यक आहे.

व्हिटॅमिन डी चे सेवन

हाडे मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी खूप महत्वाचे आहे. वाढत्या वयाबरोबर शरीरात व्हिटॅमिन डीही कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत दररोज सूर्यप्रकाश घेणे आवश्यक आहे. यासाठी आहाराचीही काळजी घ्या. अंड्यातील पिवळ बलक आणि दुग्धजन्य पदार्थ वापरून व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढता येते. तरीही शरीरात या जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

धूम्रपान व मद्यपान सोडा

जर तुम्ही जास्त दारू पीत असाल आणि धूम्रपान करत असाल तर ते हाडांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. धूम्रपानामुळे हाडांची घनता कमी होते. अती मद्यपान केल्याने कॅल्शिअम कमी होते आणि हाडांचे फॉर्मेशन घटू लागते. अशा परिस्थितीत धूम्रपान आणि दारूचे व्यसन सोडण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

या चाचण्या आवर्जून करा

डॉक्टर स्पष्ट करतात की हाडांची घनता चाचणी, ड्युअल एनर्जी एक्स-रे ऍब्सॉप्टोमेट्री (डीएक्सए) स्कॅन, हे हाडांची तपासणी करण्यासाठी केले जाऊ शकते. वैद्यकीय इतिहासानुसार आणि तुमच्या वयानुसार तुम्ही हाडांची घनता चाचणी करून घेऊ शकता. याशिवाय, तुम्ही दररोज व्यायाम देखील करणे महत्त्वाचे आहे.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ