आता थेट लसीकरण, नोंदणीची गरज नाही; वाचा नवे नियम काय सांगतात

आता 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लस घेण्यासाठी नोंदणी करण्याची गरज नाही. थेट लसीकरण केंद्रावर जाऊन या गटातील व्यक्तिंना लस घेता येणार आहे. (For 18-44 age, On-Site Registration Allowed At Government Vaccine Centres)

आता थेट लसीकरण, नोंदणीची गरज नाही; वाचा नवे नियम काय सांगतात
Vaccine

नवी दिल्ली: आता 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लस घेण्यासाठी नोंदणी करण्याची गरज नाही. थेट लसीकरण केंद्रावर जाऊन या गटातील व्यक्तिंना लस घेता येणार आहे. त्यामुळे कोविन अॅपवर नाव नोंदणी करून अपॉईंटमेट घेण्याच्या कटकटीतून सुटका होणार आहे. केंद्र सरकारने नवे नियम जारी केले असून त्यात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (For 18-44 age, On-Site Registration Allowed At Government Vaccine Centres)

18 ते 44 वयोगटातील व्यक्तिंना लसीकरणासाठी ऑनसाईट रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. आता 18 ते 44 वयोगटातील व्यक्ती थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. दरम्यान, त्यांना Cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.

लस वाया जाऊ नये म्हणून

रोज लस देण्याची वेळ संपेल आणि शेवटी ज्या लस उपलब्ध राहतील त्या ऑनसाईट व्यवस्थेनुसार लोकांना दिल्या जातील. त्यामुळे लस वाया जाणार नाहीत. त्याचा उल्लेख कोविन प्लॅटफॉर्मवर केला जाणार आहे. ही नवीन सुविधा केवळ व्हॅक्सिनेशन सेंटरवरच असेल. अनेकदा व्हॅक्सिनचा स्लॉट बुक केल्यानंतरही अनेक लोक व्हॅक्सिन घेण्यासाठी सेंटरवर येत नाही. त्यामुळे लस वाया जात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

एका दिवसात 4400 हून अधिक मृत्यू

दरम्यान, भारतात एका दिवसात एका दिवसात 4400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 18 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 2 लाख 22 हजार 315 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मोठ्या कालावधीनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या सव्वादोन लाखांच्या खाली आली आहे. कालच्या दिवसात 4 हजार 454 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटले असले, तरी कोरोनाबळींच्या संख्येत वाढ झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 67 लाख 52 हजार 447 वर गेला आहे. देशात 2 कोटी 37 लाख 28 हजार 11 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 3 हजार 720 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 27 लाख 20 हजार 716 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 19 कोटी 60 लाख 51 हजार 962 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (For 18-44 age, On-Site Registration Allowed At Government Vaccine Centres)

 

संबंधित बातम्या:

बापरे! कोरोना नसतानाही ब्लॅक फंगस होतो?; वाचा तज्ज्ञ काय म्हणतात

ब्लॅक फंगसचं रौद्ररुप, आतापर्यंत 7000 रुग्णांचा मृत्यू, AIIMS च्या संचालकांकडून अहवाल सादर

देशात शहरातील एक तृतीयांश लोक बाधित, पुण्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह; सीरो सर्व्हेचा दावा

(For 18-44 age, On-Site Registration Allowed At Government Vaccine Centres)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI