देशात शहरातील एक तृतीयांश लोक बाधित, पुण्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह; सीरो सर्व्हेचा दावा

देशातील 12 शहरातील डिसेंबर 2020पर्यंतचा सीरो सर्व्हे जाहीर झाला आहे. (one third of urban Indians Covid positive by December 2020: Sero Survey)

देशात शहरातील एक तृतीयांश लोक बाधित, पुण्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह; सीरो सर्व्हेचा दावा
coronavirus
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 7:40 PM

हैदराबाद: देशातील 12 शहरातील डिसेंबर 2020पर्यंतचा सीरो सर्व्हे जाहीर झाला आहे. त्यात 31 टक्के लोक कोरोना व्हायरस अँटीबॉडीसाठी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्व्हेनुसार, शहरी लोकसंख्येचा एक तृतीयांश भाग कोरोना संक्रमित असल्याचं आढळून आलं आहे. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सीरो पॉझिटिव्हीटी दर 31 टक्क्याहून असू शकतो, अशी शक्यताही या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आली आहे. (one third of urban Indians Covid positive by December 2020: Sero Survey)

या सीरो सर्व्हेसाठी 4.4 लाख सँपल अभ्यासासाठी घेण्यात आले होते. एका खासगी लॅबच्याद्वारे हे सँपल गोळा करण्यात आले होते. कॅनडाच्या टोरँटो विद्यापीठाच्या सेंटर फॉर ग्लोबल हेल्थ रिसर्चचे संशोधक ए. वेलुमनी आणि थायरोकेअर लॅब्सचे के. सी. निकम यांनी या अभ्यासातून अंतिम निष्कर्ष काढला आहे. देशातील 2200 कलेक्शन्स पॉइंटवरून करण्यात येणाऱ्या टेस्टमधून 31 टक्के लोकांमध्ये कोविड अँटीबॉडी मिळाली आहे.

पुण्यात सर्वाधिक सीरो पॉझिटीव्हीटी

या सर्व्हेतून अनेक महत्त्वाच्या गोष्टी उजेडात आल्या आहेत. सर्व वर्गातील महिलांमध्ये सीरो पॉझिटिव्हीटी दर 35 टक्के असून पुरुषांमध्ये हा दर 30 टक्के आहे. ज्या ठिकाणी लहानपणी देवी आजाराच्या लसी देण्यात आल्या होत्या, त्या ठिकाणी सीरो पॉझिटिव्हीटी दर कमी दिसून आला आहे. पुण्यात सर्वाधिक 69 सीरो पॉझिटिव्हीटी पाहायला मिळाली आहे. ज्या 12 शहरांचा अभ्यास करण्यात आला, त्या ठिकाणी देशातील एक तृतीयांश कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये दुसऱ्या लाटेतील रुग्णांचाही समावेश केल्यास व्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या 31 टक्के होईल, असं इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजीव जयदेवन यांनी सांगितलं.

दोन खोल्यांच्या घरात सोशल डिस्टन्सिंग अशक्य

भारतात केवळ 77 टक्के लोक दोन खोल्यांच्या घरात राहतात. अशा लोकांकडून सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणं शक्य नाही. व्हायरस अधिक वेगवान झाल्यास दोन खोल्यांच्या घरात राहणाऱ्या लोकांना कोरोनाची लागण होण्याची 90 टक्के शक्यता आहे, असं जयदेवन यांनी स्पष्ट केलं. प्रत्येक शहरात कोरोना वाढीचा वेग वेगवेगळ्या वेळी पाहायला मिळाला आहे. गेल्यावर्षी जून आणि डिसेंबरमध्ये दिल्लीत कोरोनाचा संसर्ग वाढला होता. चेन्नईत जुलैमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला होता. पुण्यात सप्टेंबरमध्ये कोरोनाचा कहर होता. संपूर्ण देशाचा विचार केला तर सप्टेंबरच्या मध्यात कोरोनाचा संक्रमण वाढलेला पाहायला मिळाला होता, असंही त्यांनी सांगितलं. (one third of urban Indians Covid positive by December 2020: Sero Survey)

संबंधित बातम्या:

आंध्रप्रदेशमध्ये कोरोनाच्या आयुर्वेदिक औषधासाठी अनेक राज्यांमधून तुफान गर्दी, ICMR तपासणी करणार

‘कोरोनाची लसचं नव्या व्हेरियंट्सना कारणीभूत’, नोबेल विजेत्या फ्रेंच प्रोफेसरचा धक्कादायक दावा

बापरे! डोक्यात ब्लॅक फंगस घुसला, कोणतीही लक्षणं नसताना तरुणाचा मृत्यू; सूरतमध्ये खळबळ

(one third of urban Indians Covid positive by December 2020: Sero Survey)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.