AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Black Fungus: बापरे! डोक्यात ब्लॅक फंगस घुसला, कोणतीही लक्षणं नसताना तरुणाचा मृत्यू; सूरतमध्ये खळबळ

कोरोनानंतर आता गुजरातमध्ये ब्लॅक फंगसच्या केसेसही वाढताना दिसत आहेत. सूरतमध्ये तर ब्लॅक फंगसची एक विचित्रं केस पाहायला मिळाली आहे. (Black Fungal virus shocking case in gujarat)

Black Fungus: बापरे! डोक्यात ब्लॅक फंगस घुसला, कोणतीही लक्षणं नसताना तरुणाचा मृत्यू; सूरतमध्ये खळबळ
प्रतिकात्मक फोटो
| Updated on: May 22, 2021 | 6:47 PM
Share

सूरत: कोरोनानंतर आता गुजरातमध्ये ब्लॅक फंगसच्या केसेसही वाढताना दिसत आहेत. सूरतमध्ये तर ब्लॅक फंगसची एक विचित्रं केस पाहायला मिळाली आहे. एका 28 वर्षाच्या तरुणाला कोणतीही लक्षणं नसताना त्याच्या डोक्यात ब्लॅक फंगस आढळून आला आहे. त्यामुळे अॅटॅक आल्याने या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विचित्रं घटनेमुळे सूरतमधील आरोग्य यंत्रणेच्या तोंडचे पाणी पळाले आहे. (Black Fungal virus shocking case in gujarat)

सूरतमधील कोसम्बा येथे हा 23 वर्षीय तरुण राहत होता. या तरुणाला कोरोनाची लागण झाल्याने त्याला 28 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 4 मे रोजी त्याला डिस्चार्जही देण्यात आला होता. मात्र, 8 मे रोजी तो बेशुद्ध पडल्याने त्याच अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला सूरतच्या सिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

डोक्यात सूज

प्राथमिक तपासणीनंतर त्याच्या डोक्यात सूज असल्याचं आढळून आलं. त्यामुळे त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर बायोप्सीसाठी लॅबला सँपल पाठवण्यात आलं. त्यावेळी त्याच्या डोक्यात ब्लॅक फंगस असल्याचं आढळून आलं. त्याला ब्लॅक फंगस असेल असं आम्हाला तोपर्यंत वाटलं नव्हतं. कारण त्याला तशी कोणतीही लक्षणे दिसत नव्हती, असं डॉक्टर मौलिक पटेल यांनी सांगितलं.

तिसऱ्या स्टेजला फंगसचा डोक्यात शिरकाव

साधारणपणे तिसऱ्या स्टेजला फंगस डोक्यात जातो. मात्र या रुग्णाला कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसली नाहीत. तरीही त्याच्या डोक्यात फंगस गेला. देशात आतापर्यंत अशाप्रकारची घटना पाहायला मिळाली नाही, असंही डॉक्टरांनी सांगितलं. आता या बाबतचा एक अहवाल तयार करण्यात येणार असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.

मेडिकल सायन्ससमोर आव्हान?

राज्यात ब्लॅक फंगसच्या केसेस वाढत असतानाच आता हा नवा आणि विचित्र प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ब्लॅक फंगसला अनेक राज्यांनी महामारी घोषित केलं आहे. तसेच या आजाराला रोखण्यासाठी या राज्यांनी तयारीही सुरू केली आहे. मात्र, सूरतमधील या नव्या केसमुळे हा आजार अधिकच घातक असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मेडिकल सायन्ससमोर आव्हान निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. (Black Fungal virus shocking case in gujarat)

संबंधित बातम्या:

Black Fungus : ब्लॅक फंगसला प्रतिबंध करण्यासाठी फोलो करा या 3 सोप्या टिप्स

बापरे! लहान मुलांनाही ब्लॅक फंगसची लागण; अहमदाबादमध्ये 13 वर्षाच्या मुलावर शस्त्रक्रिया

Covid 19: रुग्णाला एकाचवेळी कोरोना आणि म्युकरमायकोसिसची लागण होऊ शकते का?

(Black Fungal virus shocking case in gujarat)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.