AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : तुमच्या या सवयीमुळे इच्छा असूनही तुम्ही होत नाही बारीक ! शरीरासाठी सर्वात महत्वाचे काय आहे ते समजून घ्या..

झोपेचा आपले तणाव हार्मोन्स आणि रोगप्रतिकारक शक्तीवर खूप जास्त परिणाम होतो. झोपेच्या कमतरतेमुळे वजन वाढण्याशिवाय आरोग्याशी निगडीत इतर आजार होण्याचा धोकाही वाढतो. झोपेचा वजनावर कसा परिणाम होतो, जाणून घेऊया.

Weight Loss : तुमच्या या सवयीमुळे इच्छा असूनही तुम्ही होत नाही बारीक ! शरीरासाठी सर्वात महत्वाचे काय आहे ते समजून घ्या..
Image Credit source: Freepik
| Updated on: Mar 07, 2023 | 3:44 PM
Share

नवी दिल्ली : जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपण आपल्या नीट, पुरेशी झोप (sleep) घेण्याकडे कमी लक्ष देतो. आपण आपल्या शरीरासाठी सर्वोत्तम आणि निरोगी असलेल्या (झोप या घटकाकडे) आपण दुर्लक्ष करतो. झोपेचा आपल्या तणावाच्या संप्रेरकांवर (stress hormones) आणि रोगप्रतिकारक शक्तीवर (immunity) मोठा प्रभाव पडतो. झोपेच्या कमतरतेमुळे वजन वाढण्याशिवाय (weight gain) आरोग्याशी निगडीत इतर आजार होण्याचा धोकाही वाढतो. झोपेचा वजनावर कसा परिणाम होतो, जाणून घेऊया.

वजन कमी करण्यासाठी आपण अनेक वेळा लाखो व्यायाम करतो पण वजन कमी होत नाही. तर याचे कारण झोप न येण्याची ही सवय देखील असू शकते. वजन कमी करायचे असेल तर कोणत्या सवयी बदलल्या पाहिजेत, ते जाणून घेऊया.

झोपेचा शरीरावर कसा परिणाम होतो ?

झोपेचा शरीरावर चांगला परिणाम होतो असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. नियमितपणे रात्री सात तासांपेक्षा कमी झोप घेणे हे तरूणांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे वजन वाढणे, बॉडी मास इंडेक्स 30 किंवा त्यापेक्षा जास्त असणे, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, पक्षाघात असे आजार असू शकतात.

चांगली विश्रांती घेणारे लोक कमी कॅलरी वापरतात

एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक नीट झोप घेतात ते त्यांच्यापेक्षा निरोगी असतात. मात्र जे लोक कमी झोप घेतात त्यांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. जास्त वजन असलेल्यांनी पुरेशी झोप घेतली पाहिजे. काही निष्कर्ष सूचित करतात की एकूण झोपेचा कालावधी सुधारणे आणि (कायम) राखणे यामुळे वजन कमी होऊ शकते. लठ्ठपणाला प्रतिबंध करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी चांगली झोप महत्त्वाची आहे.

कमी झोप तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करणार नाही

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर जेवढे लक्ष तुम्ही तुमच्या आहारावर आणि व्यायामाकडे देता तेवढेच तुमच्या झोपेकडेही लक्ष द्या. खराब झोपेचे नमुने आणि वजन कमी होणे यांच्यात एक संबंध आढळला आहे. जास्त वजन असलेले लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात, पण जर ते नीट झोपले नाहीत तर ते वजन कमी करण्यात यशस्वी होऊ शकत नाहीत. 2019 च्या संशोधनात 1986 विषयांचा अभ्यास करण्यात आला, त्यापैकी 47% महिला होत्या.

झोपेच्या कमतरतेचा वजन कमी करण्याच्या प्रयत्नावर होतो परिणाम

एखाद्या व्यक्तीने किमान 8 तास झोपले पाहिजे. कमी प्रमाणात झोपल्याने सुरुवातीला कोणताही धोका उद्भवू शकत नाही किंवा असे वाटू शकते परंतु त्यामुळे दीर्घकाळापर्यंत शरीराचे नुकसान होते. झोपेची कमतरता हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जोखीम आणि इतर जीवघेण्या आजारांशी देखील संबंधित आहे. झोपेची कमतरता आणि वजन यांच्यातील संबंध एक इशारा किंवा चेतावणी आहे कारण लठ्ठपणा हे खतरनाक रोगांचे प्रमुख कारण आहे.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.