अंकुरलेल्या लसणाचे आरोग्यदायी फायदे, शरीरतील हे गंभीर आजारही मुळापासून होतील नष्ट

ज्याप्रमाणे फायटोकेमिकल्स कर्करोगाच्या घटकांना विरोध करतात त्याचप्रमाणे ते एन्झाईम्सदेखील वाढवतात. त्यामुळे हार्ट ब्लॉकेज टाळण्यास मदत होते. लसूणचे नियमित केलेल्या सेवनामुळे हृदयविकार आणि हृदयविकारापासून वाचण्यासाठी मदत होते.

अंकुरलेल्या लसणाचे आरोग्यदायी फायदे, शरीरतील हे गंभीर आजारही मुळापासून होतील नष्ट
GarlicImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 10:17 PM

मुंबईः अंकुरलेल्या भाज्या (Vegetables) आणि फळे (Fruits) आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे अनेकांचे मत आहे, तर अनेक जण असेही मानतात की, अंकुरलेली फळे आणि भाज्यांमध्ये विषारी रसायने निर्माण होतात. कदाचित काही फळे आणि भाज्यांमध्ये हा बदल होऊ शकतो, मात्र लसूण (Garlic) ही एकमेव अशी गोष्ट आहे की, कोंब आल्यानंतरही त्याचे सेवन केल्यास कोणताही तोटा अथवा नुकसान होत नाही. तर कोंब आलेली लसूण ही नक्कीच फायदेशीर असते. ज्याप्रमाणे साधा लसूण आरोग्यासाठी फायदेशीरच असतो, मात्र त्यापेक्षा अंकुरलेली लसूण कित्येक पटीने तुम्हाली ती उपयुक्त आहे.

अंकुरलेली लसूण शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून हृदयविकार, कर्करोग, त्वचा संक्रमण यांसारख्या गंभीर आजारांपासून तुम्हाला वाचवू शकते. एवढेच नाही तर सर्दी, नाक बंद होणे यासारखे किरकोळ समस्या असतील तर त्याच्यावरही लसूण उत्तम उपाय आहे. अंकुरलेली लसूण हृदयाच्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे.

हृदयविकारापासूनही सुटका

जर्नल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्री यामधून प्रकाशित केलेल्या माहितीनुसार नियमित लसणापेक्षा अंकुरलेल्या लसूणचे अधिक फायदे आहेत. ज्याप्रमाणे लसणाच्या सामान्य सेवनाने पचनक्रिया सुधारण्यास, सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो, कोलेस्टेरॉल कमी करण्यास आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते, त्याचप्रमाणे अंकुरलेली लसूणचे सेवन केल्यास कर्करोग, पक्षाघातासारख्या समस्या बऱ्या होतात, आणि हृदयविकारापासून सुटकाही होते.

फायदेशीर लसूण

लसणाची उगवण होत असताना त्यामध्ये फायटोकेमिकल्सचे प्रमाण वाढते. यामुळेच शरीरातील कर्करोगाच्या पेशी आणि कर्करोग निर्माण करणाऱ्या घटकांना रोखण्यात मदत होते. लसणातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म कर्करोगाच्या मुख्य कारणांपैकी एक असलेल्या मुक्त ऑक्सिजन रॅडिकल्सला काढून टाकण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

ज्याप्रमाणे फायटोकेमिकल्स कर्करोगाच्या घटकांना विरोध करतात त्याचप्रमाणे ते एन्झाईम्सदेखील वाढवतात. त्यामुळे हार्ट ब्लॉकेज टाळण्यास मदत होते. लसूणचे नियमित केलेल्या सेवनामुळे हृदयविकार आणि हृदयविकारापासून वाचण्यासाठी मदत होते.

पक्षाघाताचा धोका कमी होतो

अंकुरलेले लसूणमुळे शरीरात आयन वाढते. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होत नाहीत, त्याला लसूण प्रतिबंध करते. तसेच लसूणमध्ये नायट्रेट्सदेखील असतात, जे धमन्या पसरवण्यास (किंवा रुंद) करण्यास मदत करतात, अशा प्रकारे स्ट्रोक आणि रक्ताच्या गुठळ्या शरीरात निर्माण होत नाहीत.

अकाली वृद्धत्व येऊ देणार नाही

अंकुरित लसूणमुळे शरीरातील अँटिऑक्सिडंट्स व मुक्त रॅडिकल्स काढून अकाली वृद्धत्व येत असल्यास ते लसूणमुळे टाळण्यास मदत होते. जर्नल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, पाच दिवस उगवलेल्या लसणाच्या शेंगांमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे अकाली वृद्धत्वाकडे वाटचाल करत असाल तर आजपासूनच अंकुरित लसूण खाण्यास सुरुवात करा.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त

जर तुम्हाला वारंवार सर्दी-खोकला किंवा संसर्ग होत असेल तर अंकुरित लसणाचे सेवन करा. ते शरीरात अँटिऑक्सिडंट्स भरून रोगप्रतिकारक शक्ती तयार करते. अंकुरित लसूण सर्दी, खोकला, सर्दी आणि ताप यांसारख्या फ्लूच्या लक्षणांपासून आराम देण्यासाठी प्रभावी असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

संबंधित बातम्या

तुम्हाला तुमचे लटकलेले पोट कमी करायचे असेल तर रोज सकाळी हे पेय घ्या; सुटका तर नक्कीच मिळेल

Health : रिकाम्या पोटी तूप खाण्याचा आयुर्वेदाचा सल्ला! चला जाणून घेऊयात फायदेच फायदे!

Blood Sugar: तुमच्या रक्तात साखर असली तरीही तुम्ही अंडी खाऊ शकता, फक्त या 5 पद्धती जाणून घ्या

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.