खासगी रुग्णालयात 250 रुपयात कोरोना लस, महाराष्ट्रातील 775 हॉस्पिटलची संपूर्ण यादी

कोरोना लसीकरणाला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारनं 10 हजार खासगी रुग्णालयांची निवड केली आहे. private hospitals worked as Corona Vaccination center

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:17 PM, 28 Feb 2021
खासगी रुग्णालयात 250 रुपयात कोरोना लस, महाराष्ट्रातील 775 हॉस्पिटलची संपूर्ण यादी
कोरोना लसीकरण

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं 16 जानेवारीला कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरु केला होता. 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. कोरोना लसीकरणाला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारनं 10 हजार खासगी रुग्णालयांची निवड केली आहे. केंद्र सरकारनं आयुष्यमान भारत योजनेत महाराष्ट्रातील 659 तर केंद्र सरकार आरोग्य योजनेअंतर्गत 116 खासगी रुग्णालयांना कोरोना लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. खासगी रुग्णालयात कोरोना लसीकरणासाठी एका डोससाठी 250 रुपये खर्च येणार आहे. (Health Ministry informs ten thousand private hospitals worked as Corona Vaccination center 250 charge for per person dose know list in maharashtra private hospitals)

कोरोना लसीकरणासाठी 250 रुपये खर्च

केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार खासगी रुग्णालयं कोरोना लसीकरण केंद्र म्हणून काम करणार आहेत. इथ कोरोना लसीकरणासाठी प्रत्येक व्यक्तीला 250 रुपये खर्च येणार आहे. कोविन अ‌ॅपद्वारे ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या लसीसाठी रुग्णालयांना 250 रुपये दर आकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यातील 150 रुपये रुग्णालयांना शासनाकडे भरावे लागणार आहेत. पंतप्रधान आयुष्मान भारत जनआरोग्य योजना, महात्मा फुले आरोग्य योजना अशा शासकीय योजनांचे लाभ देणाऱ्या रुग्णालयांमध्येच ही लस उपलब्ध होणार आहे.

कोरोना लसीकरणासाठी दहा हजार खासगी रुग्णालयांची यादी जाहीर

कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअतंर्गत 10 हजार रुग्णालयांचा तर राज्य सरकारच्या आरोग्य योजनेद्वारे 600 रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. तर, आयुष्यमान भारत योजनेतील महाराष्ट्रातील 659 खासगी रुग्णालयांची कोरोना लसीकरण केंद्रासाठी निवड करण्यात आली आहे. तर, केंद्र आरोग्य योजनेत 116 खासगी रुग्णालयात कोरोना लसीकरण होणार आहे.

महाराष्ट्रातील 775 खासगी रुग्णालयांना परवानगी

केंद्र सरकारच्या कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालायांचा समावेश करुन घेण्याचा निर्णय आरोग्य मंत्रालयानं घेतली आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 659 तर केंद्र सरकार आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 116 खासगी रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. मुंबईतील 31, नागपूर मधील 45 तर पुणे मधील 40 रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे.

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयांची यादी

जिल्हा रुग्णालय संख्या
अहमदनगर 35
अकोला 13
अमरावती 11
औरंगाबाद34
बीड20
भंडारा07
बुलडाणा 15
चंद्रपूर 08
धुळे15
गडचिरोली 02
गोंदिया06
हिंगोली 05
जळगाव28
जालना 14
कोल्हापूर39
लातूर13
मुंबई, मुंबई उपनगर34
नागपूर 30
नांदेड 17
नंदुरबार 04
नाशिक 40
उस्मानाबाद 09
परभणी 04
पुणे 55
रायगड14
रत्नागिरी 06
सांगली 27
सातारा 22
सिंधुदुर्ग07
सोलापूर 36
ठाणे 62
वर्धा 03
वाशिम 10
यवतमाळ 15

केंद्र सरकार आरोग्य योजनेतील महाराष्ट्रातील कोरोना लसीकरण खासगी रुग्णालय यादी
मुंबई 31,
नागपूर 45
पुणे 40

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयांची यादी

केंद्र सरकार आरोग्य योजनेतील महाराष्ट्रातील कोरोना लसीकरण खासगी रुग्णालय यादी

संबंधित बातम्या :

पुण्यात खासगी रुग्णालयातही कोरोना लस, किती रुपये दर आकारणार?

कोरोना लस घ्यायची आहे, पण इंजेक्शनला घाबरताय? काळजी नको, आता कोविड-19 टॅब्लेटवर रिसर्च सुरु

(Health Ministry informs ten thousand private hospitals worked as Corona Vaccination center 250 charge for per person dose know list in maharashtra private hospitals)