AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

40 शी नंतर प्लान करताय प्रेग्नन्सी ? आधी या गोष्टी घ्या जाणून

अनेक वेळा काही स्त्रिया विशिष्ट वेळेपर्यंत आई (Pregnancy After 40 ) होण्यासाठी मानसिक, शारीरिक किंवा आर्थिकदृष्ट्या तयार नसतात.

40 शी नंतर प्लान करताय प्रेग्नन्सी  ? आधी या गोष्टी घ्या जाणून
| Updated on: Nov 02, 2023 | 2:58 PM
Share

Pregnancy After 40 : आज प्रत्येक स्त्रीला स्वावलंबी होऊन स्वतंत्रपणे जगायचे आहे. महिलांचे विचार पूर्वीपेक्षा आता अधिक खुले, मोकळे आणि प्रगल्भ झाले आहेत. प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्यायचे आहेत. कारण स्वत:साठी काय योग्य आहे, काय अयोग्य आणि मुळात आवश्यक काय आहे हे त्यांना चांगले ठाऊक आहे. त्यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात महिल उत्तम काम करताना दिसतात. त्या सतत आपले कौशल्य सिद्ध करतात. कदाचित या कारणांमुळे त्यांचे लग्न, मुले आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांवर काही प्रमाणात परिणाम होत असेल.

प्रत्येक स्त्रीसाठी तिच्या कुटुंबासोबतच तिचं करिअरही महत्त्वाचं असतं. त्यामुळे करिअर सुधारण्यासाठी महिला एकतर लवकर लग्न करत नाहीत आणि लग्न केलेच तर लगेच आई होण्याचा निर्णय घेत नाहीत. कारण त्यांना प्रथम स्वावलंबी आणि यशस्वी व्हायचे असते, ज्यामुळे त्यांच्या मुलाच्या संगोपनात कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये. अनेक वेळा काही स्त्रिया विशिष्ट वेळेपर्यंत आई (Pregnancy After 40 ) होण्यासाठी मानसिक, शारीरिक किंवा आर्थिकदृष्ट्या तयार नसतात.  त्या योग्य वेळेची वाट पाहत असतात.

वाढत्या वयानुसार होणारे बदल आणि परिणाम

पण ही गोष्टही तितकीच खरी आहे की जसजसं स्त्रीचं वय वाढतं तसतशी तिची प्रजनन क्षमता कमकुवत होते आणि गर्भधारणेची शक्यता कमी होते. पण आपल्या आहार आणि आरोग्याकडे योग्य लक्ष दिल्यास आणि उपचार घेतल्यानंतर या सर्व समस्यांवर मात करून गर्भधारणा होऊ शकते. याशिवाय, वैद्यकीय शास्त्रातील विकासामुळे आज असे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने अगदी मोठ्या वयातील स्त्रीही सहज गर्भधारणा करू शकते.

वयाच्या 40 नंतर गर्भधारणा होण्याची शक्यता किती ?

काही संशोधनात असे समोर आले आहे की, स्त्रीचे वय जसजसे वाढते तसतशी गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते. वयाच्या 40 व्या वर्षानंतर महिलांना गर्भधारणेत अनेक गुंतागुंत आणि समस्यांना सामोरे जावे लागू शकते. संशोधनात असेही समोर आले आहे की 40 वर्षांवरील महिलांपैकी फक्त 5 ते 15 टक्के महिलांनाच गर्भधारणा होण्याची शक्यता असते.

पण 30 वर्षांच्या महिलांमध्ये गर्भधारणेची 75 टक्के शक्यता असते. वाढत्या वयाबरोबर स्त्रीमध्ये अंड्यांची संख्या कमी होत जाते. तारुण्यकाळात स्त्रीच्या शरीरामध्ये सुमारे 3 ते 4 लाख अंडी तयार होतात. परंतु दुसरीकडे, वय वाढत गेल्यावर, 40 वर्षांच्या स्त्री च्या शरीरात 15 ते 25 हजार अंडी तयार होतात. वाढत्या वयामुळे अंड्यांचे प्रमाण कमी होते आणि गुणवत्ताही ढासळते, असे संशोधनातून समोर आले आहे.

खराब गुणवत्तेचाही होतो परिणाम

अंड्यांच्या खराब गुणवत्तेमुळे, फलन योग्यरित्या होत नाही, ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते आणि गर्भपात होण्याचा धोका वाढतो. 40 व्या वर्षी गर्भधारणा झाल्यास गर्भपात होण्याचा 35% धोका असतो. तर वयाच्या 45 व्या वर्षी गर्भधारणा झाल्यास, गर्भपात होण्याचा धोका 50 टक्क्यांपर्यंत पर्यंत वाढतो. याशिवाय इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात.

तुमचा गर्भपात झाला असला तरी तुम्हाला घाबरण्याची गरज नाही कारण गर्भपातानंतर तुम्ही सहज गर्भधारणा करू शकता. परंतु तुम्ही घाबरण्याची गरज नाही कारण आज वैद्यकीय शास्त्राच्या जगात झालेल्या विकासामुळे असे अनेक उपाय उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने गर्भधारणा अगदी सहज करता येते. मग ती वयाच्या 40 व्या वर्षी असो किंवा 50 व्या वर्षी. यामध्ये असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (ARR) आणि इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) यांचा समावेश आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने महिला आता वयाच्या ४० व्या वर्षीही गर्भधारणा करू शकतात आणि मुलाला जन्म देऊ शकतात. याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधू शकता.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता.
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी.
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?.
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ.
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!.