AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health: स्त्रियांमध्ये हार्ट अटॅक येण्याआधी जाणवतात ही लक्षणे, चुकूनही करू नये दुर्लक्ष

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं वेगळी असतात. आतासेच जोखीमही काही मरामनात वेगळी असते.

Health: स्त्रियांमध्ये हार्ट अटॅक येण्याआधी जाणवतात ही लक्षणे, चुकूनही करू नये दुर्लक्ष
हार्ट अटॅकची लक्षणं Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 02, 2022 | 11:41 AM
Share

मुंबई, बदलत्या जीवनशालीचा आरोग्यावर होत असलेला प्रभाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यापैकी हृदयविकार हा अनेकांना मृत्यूच्या कवेत घेत आहे. अगदी तारुण्यातदेखील याचे बळी ठरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हृदयविकाराचा (heart attack) झटका कोणाहीसाठी धोकादायक असतो. पण पुरूषांच्या (men) तुलनेत स्त्रियांना (Women) हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्या मृत्यूची  शक्यता जास्त असल्याचे अध्ययनात समोर आले आहे. पुरूषांच्या तुलनेत महिलांना वर्षाच्या आत दुसरा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते असे संशोधन सांगते.

स्त्रियांच्या शरीराची कार्यप्रणाली पुरूषांच्या तुलनेत वेगळी असते. तसेच जोखीम आणि रोगनिदानही वेगवेगळे असते. अनेक स्त्रियांना आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय असते त्यामुळे त्या वैद्यकीय मदत घेण्याची शक्यता कमी असते. हार्ट अटॅक येण्याआधी स्त्रियांमध्ये कोणती लक्षणं जाणवतात पाहूया.

अटॅक येण्याआधी जाणवतात ही लक्षणे

  1. लक्षणे सौम्य असल्याने स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा झटका ओळखणे कठीण असू शकते. काहीवेळा नुसती एसिडिटी झाल्याचे दिसू शकते.
  2. महिलांमध्ये छातीत दुखणे किंवा अस्वस्थता ही लक्षणे कमी दिसून येतात. श्वास लागणे, ओटीपोटात अस्वस्थता, चक्कर येणे, पाठीच्या वरच्या भागात दाब, खूप थकवा येणे यासारखी लक्षणे पुरूषांच्या तुलनेत जास्त वेळा जाणवू शकतात. हा फरक दोघांच्या शरीरातील रक्तवाहिन्यांच्या फरकामुळे निर्माण होतो.
  3. पुरूषांमध्ये मुख्य धमनीत ब्लॉक निर्माण होतो. तर स्त्रियांमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या लहान रक्तवाहिन्यांना जास्त धोका पोहोचून त्या प्रभावीत होतात.

अशी घ्या काळजी

जोखीम जास्त असलेल्या महिलांनी नियमित वैद्यकीय तपासणी करणे, जीवनशैलीत बदल करणे फार गरजेचे आहे. त्यामुळे हृदयविकाराचा धोका आणि मृत्यूची शक्यता कमी होऊ शकतो. जीवनशैलीतील काही महत्वाच्या बदलांमध्ये आहाराद्वारे वजनावर नियंत्रण ठेवणे आणि रोज 30 मिनिटे व्यायाम करणे महत्वाचे आहे.

आहारात भाज्या आणि फळे, कार्बोहायड्रेट्स आणि मासे किंवा बिया यांसारख्या ओमेगा-3-फॅटी ऍसिडमध्ये समृद्ध अन्नाचा समावेश असावा.

मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.