Health Tips: सकाळी उठल्यानंतरही बऱ्याचवेळा राहते सुस्ती? या उपायांनी वाटेल दिवसभर फ्रेश

नितीश गाडगे,  Tv9 मराठी

|

Updated on: Oct 14, 2022 | 2:37 PM

तुम्हाला देखील सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटत नाही? दिवसभर सुस्ती राहते? काम कारण्याची इच्छा नसते? तर मग या टिप्स फॉलो करा.

Health Tips:  सकाळी उठल्यानंतरही बऱ्याचवेळा राहते सुस्ती? या उपायांनी वाटेल दिवसभर फ्रेश
सुस्ती
Image Credit source: Social Media

मुंबई,  सकाळी उठल्यानंतरही बहुतेकांना फ्रेश वाटत नाही. (Not feeling fresh) रात्री 7 ते 8 तास झोप मिळत असली तरी दिवसभर लोकांना झोप येत नाही. असे बरेच लोकं आहेत जे रात्री लवकर झोपतात, परंतु त्यांना सकाळी उठण्यासाठी खूप वेळ लागतो आणि उठल्यानंतरही त्यांना फ्रेश वाटत नाही. दिवसभर ताजेतवाने वाटण्यासाठी आणि सुस्ती (lethargy) घालविण्यासाठी  अनेकजण  चहा, कॉफी आणि सिगारेटचे भरपूर सेवन करतात ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जर तुम्हालाही सकाळी उठल्यानंतर या सर्व समस्यांना सामोरे जावे लागत असेल, तर यासाठी काही उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे दररोज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटेल आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहील.

ताजेतवाने उठण्यासाठी चांगली झोप आवश्यक

जर तुम्हाला सकाळी लवकर आणि ताजेतवाने उठायचे असेल तर रात्री चांगली झोप घेणे आवश्यक आहे. याचा अर्थ दिवसा अन्न खाल्ल्यानंतर कॅफिनचे सेवन करू नका. याशिवाय अल्कोहोल आणि स्क्रीनपासून दूर राहा. तसेच, झोपण्याची एक निश्चित वेळ निश्चित करा आणि त्याच वेळी झोपण्याचा प्रयत्न करा.

हे सुद्धा वाचा

वीकेंडलाही लवकर उठणे

जर तुम्हाला रोज सकाळी लवकर उठायचे असेल, तर त्यासाठी तुम्ही तुमची झोप आणि जागण्याचे चक्र निश्चित करणे महत्त्वाचे आहे. बहुतेक लोक वीकेंडला खूप उशिरा झोपतात आणि उशिरा उठतात. वीकेंडला असे केल्याने पुढील दिवसांचे झोपेचे चक्र बिघडते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटत नाही, विशेषत: वीकेंडनंतर ऑफिसला गेल्यावर, बहुतेकदा ही समस्या उद्भवते. अशा परिस्थितीत वीकेंडलाही तुम्ही तुमचे झोपेचे चक्र कायम राखणे महत्त्वाचे आहे.

अलार्म वाजण्यापूर्वी उठणे

अनेकदा लोक रात्री झोपण्यापूर्वी सकाळचा अलार्म लावतात, पण सकाळी अलार्म वाजल्यानंतरही ते झोपतात किंवा सतत अलार्म बंद करत राहतात. असे केल्याने तुमची झोप तर खुलते पण आळसामुळे तुम्ही अंथरुणावरून उठत नाही, त्यामुळे तुम्हाला खूप थकवा जाणवतो. अशा परिस्थितीत, सकाळी अलार्म वाजल्याबरोबर लगेच उठणे महत्वाचे आहे.

सकाळी उठल्याबरोबर पाणी प्या

रात्री झोपताना आणि श्वास घेतल्याने तुमच्या शरीरातून भरपूर द्रव बाहेर पडतात, ज्यामुळे तुमचे शरीर सकाळपर्यंत निर्जलित होते. यामुळे तुम्हाला सुस्ती आणि झोप येते. अशा स्थितीत सकाळची सुरुवात पाण्याने करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला सकाळी उठून ताजेतवाने वाटायचे असेल तर पाणी हा एक निश्चित उपाय आहे. सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

व्यायाम

सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही व्यायाम किंवा प्राणायाम केलात तर तुमच्या शरीराला खूप ताजेतवाने वाटते आणि तुम्हाला सुस्ती आणि आळस येत नाही.

न्याहारीसाठी आरोग्यदायी गोष्टी खा

तुम्ही सकाळी काय खाता यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून असतो. अशा परिस्थितीत, सकाळी उठणे आणि निरोगी नाश्ता घेणे महत्वाचे आहे. तुम्ही सकाळी बिया, नट, फळे किंवा पोहे, ओट्स इत्यादींचे सेवन करू शकता. यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI