Health tips : तुम्ही वारंवार होणाऱ्या सर्दीमुळे त्रस्त आहात? ‘हे’ आयुर्वेदिक उपाय करा

| Updated on: Jan 11, 2022 | 9:21 PM

सध्या हिवाळा (Winters) चालू आहे, वातावरणात थंडी देखील वाढली आहे. थंडीमुळे सर्दी, पडसे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. अनेकांना सर्दी झाल्यावर वारंवार शिंका (Sneezing) येतात. सर्दीचा त्रास टाळण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय देखील करू शकतात. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Health tips : तुम्ही वारंवार होणाऱ्या सर्दीमुळे त्रस्त आहात? हे आयुर्वेदिक उपाय करा
Follow us on

Health tips : सध्या हिवाळा (Winters) चालू आहे, वातावरणात थंडी देखील वाढली आहे. थंडीमुळे सर्दी, पडसे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. अनेकांना सर्दी झाल्यावर वारंवार शिंका (Sneezing) येतात. शिंका वाढल्यामुळे कामात व्यत्यय येतो. तसेच डोकेदुखीची समस्या देखील भेडसावू शकते. सर्दीमुळे तुमचे दिवसभराचे रुटीन बिघडू शकते. सध्या कोरोनाची साथ चालू आहे या पार्श्वभूमीवर देखील सर्दी सारख्या आजारांची विशेष काळजे घेणे गरजेचे आहे. अनेक लोक सर्दी झाल्यास डॉक्टरांची भेट घेतात. त्यांनी दिलेल्या गोळ्यांचे नियमितपणे सेवन करतात. त्यातून त्यांना आराम मिळतो. मात्र हा आराम काही दिवसांपूर्ताच असतो. त्यानंतर पुन्हा सर्दीचा त्रास होतो. मात्र असे देखील काही सोपे घरगुती उपाय आहेत. जे नियमीत पणे केल्यास तुम्हाला सर्दीपासून कायमची सुटका मिळू शकते. वारंवार डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता राहणार नाही. आज आपन अशाच काही घरगुती उपयांबद्दल जाणून घेणार आहोत.

मिठाचे पाणी

ज्यांना वारंवार सर्दीचा त्रास होतो, अशा रुग्णांनी काळे मिठ खाल्ले पाहिजे. काळ्या मिठामुळे सर्दीचा त्रास कमी होतो. तसेच काळे मीठ कोमट पाण्यात टाकून त्याच्या गुळण्या कराव्यात त्याने देखील सर्दीला आराम मिळतो.

गरम पाणी

ज्यांना सर्दीचा वारंवार त्रास होतो, त्यांच्यासाठी गरम पाणी हे खूप फायद्याचे असते. थंडीच्या दिवसात पाणी उकळून ठेवावे. ते थंड झाले की कायम स्वरुपी पिण्यासाठी त्या पाण्याचा उपयोग करावा. गरम पाणी पिल्याने सर्दीचा त्रास तर होत नाही. शिवाय पोटाशी संबंधित इतर समस्या देखील गरम पाणी पिल्यामुळे कमी होतात. तसेच इतर व्हायर इन्फेक्शनपासून देखील तुमचे संरक्षण होते.

काळी मिरी

काळी मिरी हे उष्ण असतात, त्यामुळे ज्यांना वारंवार सर्दी होते त्याच्यांसाठी ते फायद्याचे ठरू शकतात. काळी मिऱ्याची पावडर आणि तुळसीची पाने सोबत खावीत यामुळे सर्दीचा त्रास कमी होतो. तसेच चहामध्ये देखील तुम्ही तुळसीच्या पानाचा आणि काळ्या मिऱ्याचा उपयोग करू शकतात.

वाफ घ्या

सर्दी झाल्यास तुम्ही गरम पाण्याची वाफ देखील घेऊ शकता. गरम पाण्याची वाफ घेताना त्यामध्ये थोड्याशाप्रमाणात व्हिक्स मिसळला. त्यानंतर व्हिक्स मिश्रीत पाण्याची वाफ घ्या. तुम्हाला आराम मिळेल.

टीप : वरीलपैकी कोणत्याही उपयांच्या प्रमाणिकरणाबद्दल टीव्ही 9 खात्री देत नाही. हा लेख रोज येणाऱ्या अनुभवावर आधारीत आहे. यापैकी कोणताही उपया करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

संबंधित बातम्या

रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही या 5 पैकी एकतरी गोष्ट करत असाल, तर वेळीच सावध व्हा! अन्यथा होऊ शकते नुकसान

प्रतिकारशक्ती वाढवण्याचे 6 मार्ग तुम्हाला माहिती आहेत का, एक रुपयाही खर्च होणार नाही…!