AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रतिकारशक्ती वाढवण्याचे 6 मार्ग तुम्हाला माहिती आहेत का, एक रुपयाही खर्च होणार नाही…!

प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काही मार्ग आहेत, ज्यामध्ये तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी अशाच काही प्रभावी नैसर्गिक पद्धतींबद्दल जाणून घेऊया.

प्रतिकारशक्ती वाढवण्याचे 6 मार्ग तुम्हाला माहिती आहेत का, एक रुपयाही खर्च होणार नाही...!
HEALTH
| Edited By: | Updated on: Jan 11, 2022 | 1:29 PM
Share

मुंबईः कोरोना व्हायरसने भारतासह जगभरात हाहाकार माजवला आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ३०० दशलक्ष ओलांडली आहे. असे सांगितले जात आहे, की नवीन प्राणघातक प्रकार ओमिक्रॉनच्या आगमनानंतर, देशात कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये २१ % वाढ झाली आहे. दररोज नवीन रुग्णांची संख्या दीड लाखांच्या जवळपास पोहोचणार आहे. दिल्लीत तपासणी करणाऱ्या प्रत्येक चौथ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणे यासारख्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. याशिवाय व्हायरसचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यावरही भर दिला जात आहे. कोरोनासह कोणत्याही प्रकारे व्हायरसचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असली पाहिजे, असेही तज्ज्ञांचे मत आहे.

नैसर्गिक पद्धती…

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी अनेक व्यायाम आणि खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. शिवाय, काही महागडे ‘सप्लिमेंट्स’ देखील आहेत, ज्यांच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा दावा केला जातो. साहजिकच या गोष्टींमध्ये पैसा आणि वेळ दोन्ही आवश्यक आहेत. तथापि, प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काही मार्ग आहेत, ज्यामध्ये तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी अशाच काही प्रभावी नैसर्गिक पद्धतींबद्दल जाणून घेऊया.

पुरेशी झोप घ्या

झोप आणि प्रतिकारशक्ती यांच्यात जवळचा संबंध आहे. अपुरी किंवा कमी झोपेमुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. एका अभ्यासानुसार, जे लोक सहा तासांपेक्षा कमी झोपतात त्यांना सर्दी होण्याचा धोका जास्त असतो. पुरेशी विश्रांती घेऊन रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या वाढवता येते. प्रौढांना प्रत्येक रात्री ७ किंवा त्याहून अधिक तासांची झोप मिळायला हवी, तर पौगंडावस्थेत ८ ते १० तासांची झोप आवश्‍यक आहे. लहान मुलांनी १४ तासांपर्यंत झोप घेतली पाहिजे.

साखरेचे प्रमाण हवे नियंत्रित

आपल्या आरोग्यात साखर अनेक गंभीर गुंतागुंत निर्माण करते. त्यामुळे वजन वाढण्याचा किंवा लठ्ठ होण्याचा धोका जास्त असतो. साहजिकच लठ्ठपणामुळे आरोग्यात बिघाड होण्याचा धोकाही वाढू शकतो. एका अभ्यासानुसार, लठ्ठपणा असलेल्या लोकांना ‘फ्लू’चा धोका जास्त असतो. साखरेचे सेवन न केल्याने शरीरातील जळजळ कमी होते, वजन कमी होण्यास मदत होते आणि मधुमेहदेखील टाळता येतो.

मध्यम व्यायाम करा

अतिरिक्त व्यायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते, तर मध्यम व्यायामामुळे ती मजबूत होते. एका सर्वेक्षणानुसार, ज्यांनी मध्यम व्यायाम केला आहे, त्यांच्यामध्ये लसींची प्रभावीता वाढू शकते. यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होऊ शकते. मध्यम व्यायामामध्ये वेगवान चालणे, सायकलिंग, जॉगिंग, पोहणे आणि हलके हायकिंग यांचा समावेश होतो. तुम्ही दर आठवड्याला किमान १५० मिनिटे मध्यम व्यायाम केला पाहिजे.

पुरेसे पाणी प्या

रोज पुरेशा प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी निर्जलीकरण टाळणे महत्वाचे आहे. शरीरातील पाणी कमी झाल्यास डोकदुखीसह इतर समस्या निर्माण होउ शकताता. परिणामी आपला मूड, पचन आणि हृदय आणि मूत्रपिंड आदींवर याचा परिणाम होउ शकतो.

तणावापासून दूर रहा

तणाव आणि चिंता दूर करणे हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा सर्वोत्तम आणि सोपा मार्ग आहे. एका अभ्यासानुसार, दीर्घकाळापर्यंत तणाव राहिल्यास रोगप्रतिकारक पेशींच्या कार्यामध्ये असंतुलन वाढते. दीर्घकाळापर्यंत मानसिक ताण मुलांमधील रोगप्रतिकारक प्रक्रिया कमी करु शकते. तणाव टाळण्यासाठी ध्यान, व्यायाम, योग आदींचा अवलंब करू शकता.

व्हिटॅमिन डी

‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. कोरोनासारख्या विषाणूंशी लढण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक असल्याचा दावा अनेक अभ्यासांनी केला आहे. शरीरात जीवनसत्त्वे कमी झाल्यामुळे हाडांचे आजार, कर्करोग, तणाव आणि स्नायू कमकुवत होऊ शकतात. ‘व्हिटॅमिन डी’चा सर्वोत्तम स्त्रोत म्हणजे सूर्यप्रकाश, ज्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे खर्च करण्याची गरज नाही. यासाठी सकाळी आणि संध्याकाळी उन्हात बसावे.

इतर बातम्याः

नाशिक महापालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक आघाडी, भुजबळांचे संकेत, शिवसेना अन् काँग्रेस राजी होणार का?

Thief’s letter:‘सॉरी मला माफ करा’ म्हणत चोरट्याचे अफलातून पत्र, पुढे जे काही झाले ते वाचून व्हाल थक्क!

Nashik Train| नाशिककरांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवणाऱ्या भुसावळ-इगतपुरी मेमूचा आज श्रीगणेशा; 18 रद्द गाड्याही आजपासून पूर्ववत

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.