हिवाळ्यातील आरोग्य : बंद नाकाच्या समस्येबाबत अशी घ्या काळजी…

हिवाळ्यातील बंद नाक किंवा नाक चोंदण्याची समस्या ही नाकाच्या पोकळीशी संबंधित आहे, ज्यामुळे नाकातील आतील पोकळीत काहीशी सूज निर्माण होउन हवेचा प्रवाह कमी होउन श्‍वास घेण्यास अडचण होते. नाक चोंदणे किंवा नाक बंद होण्याची समस्या निर्माण होत

हिवाळ्यातील आरोग्य : बंद नाकाच्या समस्येबाबत अशी घ्या काळजी...
सर्दी

हिवाळ्यातील संधीसाधू आजार हे अगदी सामान्य आहे. सध्याच्या साथीच्या परिस्थितीत, याबाबत अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे सोबत आपल्या शारीरिक व्याधी तसेच शरीर समजून घेतले पाहिजे. हिवाळ्यातील आजारांमधील एक म्हणजे नाक चोंदणे किंवा बंद पडणे. हैदराबादेतील केअर हॉस्पिटलमधील ईएनटी सर्जन डॉ रणबीर सिंग यांच्या मते ऍलर्जीमुळे वाहणारे किंवा बंद नाक, घसा खाज सुटणे, डोळ्यात पाणी येणे, खोकला, घसा खवखवणे, ताप आदी हिवाळ्यातील व्याधींची लक्षणे आहे.

नाक चोंदणे म्हणजे काय?

ही नाकाच्या पोकळीतील अस्तरांची जळजळ आहे, ज्यामुळे नाकातील आतील पोकळीचा भाग सुजून श्‍वास घेताना हवेचा प्रवाह कमी होतो आणि श्वास घेणे कठीण होते. यामुळे तुम्हाला नाक भरलेले वाटू लागते, म्हणूनच याला ‘स्टफी नाक’ असेही म्हणतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार एखाद्या व्यक्तीला रक्तसंचय आणि सामान्य सर्दी आणि खोकल्यासह नाक भरलेले वाटू शकते.
डॉ. सिंग यांच्या मते, आपण बंद नाक मोकळे करण्यासाठी नाक मोकळे करण्यासाठीचे फवारणी यंत्र करु शकतात. बंद नाकाच्या समस्येवर सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे नियमित नाक धुणे होय. हे केवळ नाकाची प्रतिकारशक्ती वाढवत नाही तर यातून नाकाची कार्यक्षमता देखील सुधारते. शिवाय, बंद नाक मोकळे करण्यासाठी असलेल्या विविध फवारणी यंत्राची ऍलर्जी असलेल्या लोकांसाठी नियमित औषधोपचारांसोबत नाक साफ करण्याचा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जातो.

अशा पध्दतीने नाक स्वच्छ ठेवा

हिवाळ्यात नाकाची प्रभावी स्वच्छता महत्त्वाची असते. नाकात धूळ, बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशी जमा होत असते आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार नाकातील असे वातावरण त्यांच्या वाढीसाठी पोषक ठरते. नाकातील या रोगांपासून बचाव करण्यासाठी नाकाची नियमित स्वच्छता महत्वाची आहे. नाकाची कार्यक्षमता कायम राखण्यासाठी नाकाची पोकळी स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. नाकाच्या पोकळीचा दाब कमी करण्यासाठी आणि चांगला श्वास घेण्यास नाक स्वच्छ धुणे खूप प्रभावी आहे ठरते.

संबंधित बातम्या : 
Tea | नको जिम, नको डाएट, आठ प्रकारचे चहा पिऊन पोटावरची चरबी कमी करा

Relationship tips: नात्यामध्ये दुरावा आलाय?, तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी, नातेसंबंध होतील अधिक मजबूत

Published On - 8:53 am, Tue, 11 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI