हार्ट अटँक आल्यावर पहिल्या 15 मिनिटात करा या 5 गोष्टी, वाचू शकतात प्राण

हार्ट अटँक आल्यावर पहिल्या 15 मिनिटात करा या 5 गोष्टी, वाचू शकतात प्राण
हृदय आणि हृदयविकाराशी संबंधित महत्त्वाचं माहिती..

हार्ट अटँक आल्यानंतर पहिले 15 मिनिटे ही एक इमरजन्सी मेडिकल कंडीशन आहे. यामध्ये रूग्णाला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेणे आवश्यक आहे. अन्यथा जीवाला धोका पोचू शकतो. त्यामुळे तज्ज्ञ हार्ट अटँकपूर्वी येणाऱ्या लहानमोठ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला देतात. तरीही या पाच गोष्टी तुमचे प्राण वाचवू शकतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 27, 2022 | 10:23 PM

से म्हणतात की, हार्ट अटँक (Heart Attack)आल्यानंतर पहिल्या 15 मिनिटात मेडिकल (Medical) मदत मिळाली तर रूग्णाचे प्राण वाचवता येतात. सर्वप्रथम पहिले हार्ट अटँकच्या लक्षणांना समजून घेणे आवश्यक आहे. पण प्रत्येकाचे लक्षण वेगळे असू शकते. हे पण लक्षात घ्या की ह्रदयविकाराचा झटका अचानक छातीत दुखल्याने सुरू होत नाही. थोड्या वेदना आणि बैचेनीने लक्षणाची सुरुवात होते. तुम्ही आराम करत असाल किंवा सक्रिय असाल तेव्हाही हा त्रास होऊ शकतो. तुमचे वय, लिंग आणि चिकित्सेवर या लक्षणाचे गांभीर्य अवलंबून आहे. हार्ट अटँकच्या सर्वसामान्य लक्षणांमध्ये छातीवर दबाव वाटतो. हा त्रास काही वेळ वाटतो. नंतर त्रास कमी होतो. नंतर पुन्हा त्रास सुरू होतो. वेदना आणि बैचेनी छातीच्या वरच्या म्हणजे शरीराच्या अन्य भागापर्यंत पोचते. तुमचा एक हात किंवा दोन्ही हात, पाठ, मान, दात आणि जबड्यापर्यंत वेदना होतात. याशिवाय रूग्णाला घाम,उलटी, चक्कर, चिंता, अपचन, थकवा अशी लक्षणे दिसून येतात. पुरूषांच्या तुलनेत महिलांना मान, खांदे, पाठीच्या वरच्या भागात किंवा पोटात दुखते अशा समस्या होऊ शकतात.

मेयो क्लिनिकनुसार 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ छातीत दुखल्याने हार्ट अटँक येतो. काही लोकांना छातीत हलके दुखत. काही लोकांना मात्र छातीत गंभीर वेदना होतात. बैचेनीला दबाव किंवा छातीवर दबाव याच्याशी जोडले जाते. वास्तविक काही जणांना छातीत दुखत नाही किंवा ताण येत नाही. काही लोकांच्या छातीत अचानक दुखत. कधी कधी खूप अगोदरच धोक्याची घंटा काही तास किंवा एका दिवसा अगोदर लक्षणे दिसू शकतात. हार्ट अटँक आल्यानंतर काही उपाय मात्र आवर्जून करा.

इमर्जन्सी नंबरवर फोन करा:

तुम्हाला हार्ट अटँक आला सर्वात पहिले मेडिकल इमर्जन्सी नंबरवर फोन करा. तरीही जर अँम्ब्युलन्स किंवा आपात्कालीन वाहन मिळत नसेल तर मित्र किंवा शेजार्याची मदत घ्या आणि जवळचे हॉस्पिटल गाठा. स्वतः गाडी चालवू नका. तुमची परिस्थिती अजून खराब होऊ शकते.त्यामुळे गाडी चालवण्याचा प्रयत्न करू नका.

अँस्पिरिन घ्या:

जोपर्यंत आवश्यक मेडिकल मदत मिळत नाही तोपर्यंत अँस्पिरिन चघळा आणि गिळून घ्या. एस्पिरिन रक्ताच्या गाठोळ्या होण्यापासून रोखतात. हार्ट अटँक आल्यावर ह्रदयाला नुकसान पोचू देत नाही. जर तुम्हाला अँलर्जी आहे किंवा डॉक्टरांनी एस्पिरिन घेण्यास मनाई केली असेल तर एस्पिरिन घेऊ नका.

नाइट्रोग्लिसरीन घ्या :

जर डॉक्टरांनी नाइट्रोग्लिसरीन घेण्याचे सांगितले असेल तर नाइट्रोग्लिसरीन जरूर घ्या. जर तुम्हाला हार्ट अटँक आला असेल आणि तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला नाइट्रोग्लिसरीन अगोदरच सांगितली असेल तर ती डॉक्टरांच्या निगराणीतच घ्या.

डिफाइब्रिलेटरचा वापर आवश्यक :

जर रूग्ण बेशुद्ध आहे आणि तुमच्याकडे अॉटोमेटेड एक्सटर्नल डीफिब्रिलेटर उपलब्ध असेल. डिवाइसच्या उपयोग दिलेल्या निर्देशानुसार करा. ह्रदयाची गती कमी किंवा जास्त झाली असेल तेव्हा होतो. कार्डियाक अरेस्ट किंवा हार्ट अटँकमध्ये याचा उपयोग होतो.

सीपीआर द्या:

जर रूग्ण बेशुद्ध असेल तर त्याला सीपीआर द्या. जर व्यक्तीला श्वास घेत नसेल आणि तुम्हाला नाडी सापडत नाही. अशावेळी आपातकालीन चिकित्सा सहायतेसाठी मदत मागितल्यावर सीपीआर सुरू करा. हे करण्यासाठी त्या व्यक्तीच्या छातीवर जोरजोराने आणि वेगाने धक्का द्या. 1 मिनिटात 100 ते 120 वेळा असे करा.

सर्दी, खोकला अन् तापही असताना कोरोना टेस्ट केली नाही? नव्या सर्वेक्षणांतून तीन महत्त्वाची कारणं उघड

Mask Vs Respirator : संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी मास्क चांगला आहे की रेस्पिरेटर जाणून घ्या आत्ताच !!

इथल्या हवेत काहीतरी खास आहे… ‘यामुळे’ लोक 100 वर्षांपेक्षा जास्त जगतात…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें