AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Heart Attack : वायू प्रदूषणामुळे वाढतोय ह्वदय रोगाचा धोका, जाणवतात ही लक्षणे

WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) नुसार, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग (CVD) मुळे अंदाजे 17.9 दशलक्ष लोक मरण पावले, जे जगभरातील सर्व मृत्यूंपैकी 31 टक्के आहे. यापैकी 85 टक्के मृत्यू हार्ट अटॅक आणि स्ट्रोकमुळे झाले आहेत.

Heart Attack :  वायू प्रदूषणामुळे वाढतोय ह्वदय रोगाचा धोका, जाणवतात ही लक्षणे
हार्ट अटॅकImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 05, 2023 | 1:10 PM
Share

मुंबई : बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी यामुळे आजकाल लोकं अनेक समस्यांना बळी पडत आहेत. हृदयविकार ही यापैकी एक समस्या आहे, ज्यामुळे आजकाल बरेच लोकं त्रस्त आहेत. अलीकडच्या काळात हृदयविकाराच्या (Heart Attack) घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हृदयविकाराचा झटका ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे ज्यामध्ये रक्ताची गुठळी हृदयात रक्त प्रवाहासाठी बाधा ठरते हृदयाला ऑक्सिजनपासून वंचित ठेवते.

WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) नुसार, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग (CVD) मुळे अंदाजे 17.9 दशलक्ष लोक मरण पावले, जे जगभरातील सर्व मृत्यूंपैकी 31 टक्के आहे. यापैकी 85 टक्के मृत्यू हार्ट अटॅक आणि स्ट्रोकमुळे झाले आहेत. हृदयविकाराच्या झटक्याला अनेक घटक कारणीभूत आहेत, त्यातील एक हवा प्रदूषण आहे. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की वायू प्रदूषणामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदयाच्या कार्यात अनियमतता होऊ शकते. वायू प्रदूषणामुळे हृदयविकाराचा झटका कसा येतो आणि तो कसा टाळता येईल हे जाणून घेऊया.

वायू प्रदूषण धोकादायक का आहे?

दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणाचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. हृदयाच्या विफलतेच्या बाबतीत म्हणजेच ज्याला आपण हार्ट फेल्युअर म्हणतो, वायू प्रदूषणामुळे रक्त पंप करण्याची हृदयाची क्षमता आणखी कमी होऊ शकते. या प्रभावांना चालना देण्यासाठी अधिक चिंतेची बाब म्हणजे प्रदूषणाचे अत्यंत लहान कण, जे धुके, धूर आणि धूळ म्हणून दृश्यमान हवेत आढळतात.

जास्त धोका कोणाला आहे?

वायू प्रदूषणामुळे अनेकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. वृद्ध लोकं आणि हृदयरोग किंवा स्ट्रोकसाठी जोखीम घटक असलेल्या लोकांना जास्त धोका असू शकतो. याशिवाय हृदयविकाराचा झटका, एनजाइना, बायपास शस्त्रक्रिया, स्टेंटसह किंवा त्याशिवाय अँजिओप्लास्टी, स्ट्रोक, मान किंवा पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा, हृदय अपयश, मधुमेह किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज अशा लोकांना जास्त धोका असतो. याशिवाय खालील लोकांनाही जास्त धोका असतो.

  • तुम्ही 45 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा पुरुष किंवा 55 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची स्त्री असल्यास, तुम्हाला जास्त धोका आहे.
  • तुमचा कौटुंबिक इतिहास स्ट्रोक किंवा लवकर हृदयविकाराचा आहे. याशिवाय, जर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा उच्च कोलेस्टेरॉलची समस्या असेल, तर तुम्हाला उच्च धोका आहे.
  • तुमचे वजन जास्त असल्यास किंवा शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसल्यास आणि तुम्ही सिगारेट ओढत असल्यास.

सुरक्षित राहण्यासाठी या टिप्स फॉलो करा

  • तुम्हाला हृदयविकार असेल किंवा पक्षाघाताचा झटका आला असेल तर वायू प्रदूषण टाळण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • तुम्हाला हृदयविकाराचा किंवा पक्षाघाताचा धोका असल्यास आणि व्यायाम करण्याची योजना आखत असल्यास, प्रथम तुमच्या डॉक्टरांशी बोला.
  • तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आणि योग्य आहार घ्या.
  • आपल्या जीवनशैलीत योग्य ते बदल करून हृदयविकाराचा झटकाही टाळता येऊ शकतो.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.