AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alcohol : दारूने फक्त लिव्हरच का खराब होतो इतर अवयव का नाही? समोर आलं मुख्य कारण!

तुम्ही कधी विचार केलाय का की शरीरातील बाकीचे अवयव सोडून दारूमुळे लिव्हरच का खराब होते? बहुतेक लोकांना याबाबत माहिती नसेल.

Alcohol : दारूने फक्त लिव्हरच का खराब होतो इतर अवयव का नाही? समोर आलं मुख्य कारण!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 13, 2023 | 11:57 PM
Share

health : लिव्हर हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. आपलं पूर्ण शरीर त्यावर अवलंबून असतं. त्यामुळे आपलं लिव्हर हेल्थी असणं खूप गरजेचं असतं. पण बहुतेक लोकांना दारूचे व्यसन असते त्यामुळे त्यांना लिव्हरशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसंच जास्त दारू पिल्यामुळे लिव्हर खराबही होते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की शरीरातील बाकीचे अवयव सोडून दारूमुळे लिव्हरच का खराब होते? बहुतेक लोकांना याबाबत माहिती नसेल. तर आज आपण याबाबत जाणून घेणार आहोत.

आपण जेही अन्न खातो मग ते हेल्थी असो किंवा अनहेल्थी असो ते अन्न आपल्या लिव्हर पर्यंत जाऊन पोहोचतं. तिथेच विटॅमिन आणि हार्मोनच्या रिसायकलिंगचं काम होतं. तसंच लिव्हर आपल्या शरीरातील हानिकारक तत्त्वांना पूर्णपणे साफ करत असतो. लिव्हरची एक खासियत असते ती म्हणजे आपण जेवण केल्यानंतर एक्स्ट्रा शुगरला ते स्वतः जवळ ठेवते आणि जेव्हाही शरीरात अशक्तपणा जाणवतो तेव्हा ते ग्लुकोज देते.

दारूचा दुष्‍परिणाम लिव्हरवर का होतो?

दारूचा एक घोटही तुमच्या शरीराला नुकसान पोहचवू शकतो. दारू पोटात गेल्यानंतर ती गॅस्ट्रीक एसिडला त्रास देते. तसंच जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त दारू पिलात तर तुमच्या पोटावर गंभीर दुष्‍परिणाम होऊ शकतो. लिव्हर तुमच्या शरीराला डिटॉक्सीफाई करते. त्याचबरोबर जर तुम्ही सारखी दारू प्यायलात तर तुमचे लिव्हर फॅट समजून दारूच साठवून ठेवते. त्यामुळे दारूमुळे तुमचे लिव्हर खराब होते. लिव्हर सोबतच दारू शरीरातील अन्य अवयांवरही परिणाम करते. रोज दारू पितात त्या लोकांना अनेक आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे जर दारूचे व्यसन सोडले तर या आजारांपासून स्वतःचं संरक्षणही करता येतं.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा