बनावट रेमडेसिव्हीर कसं ओळखणार? बॉक्सवर काय लिहिलेलं असतं?

कोरोना विषाणू संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत नफेखोरी प्रवृत्तीचे लोक काळाबाजार करत आहेत. fake remdesivir injection

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:34 PM, 3 May 2021
बनावट रेमडेसिव्हीर कसं ओळखणार? बॉक्सवर काय लिहिलेलं असतं?
Fake Remdesivir

नवी दिल्ली: भारतात कोरोन विषाणू संसर्गाची दुसरी लाट आली आहे. दुसऱ्या लाटेमध्ये आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. कोरोनाबाधित असणाऱ्या अत्यावश्यक रुग्णांसाठी लागणारा ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर याची व्यवस्था करणं राज्य आणि केंद्र सरकारसाठी आव्हानात्मक आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत नफेखोरी प्रवृत्तीचे लोक काळाबाजार करत आहेत. बोगस रेमडेसिव्हीर इंजेक्शन बनवणारं आणि विकणार रॅकेट सक्रिय झाल्याची प्रकरण समोर आली आहेत. त्यामुळे खरं आणि बनाववट रेमडेसिव्हीर इंजेक्शन ओळखता येणं गरजेचे आहे. ( How to check fake and real remdesivir injection Delhi Police alert know details)

दिल्ली पोलिसांनी काय सांगितलं?

दिल्ली पोलिसांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शनबाबत जनजागृती अभियानांअतर्गत एक ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे त्यांनी फेक रेमडेसिव्हीर चालवणाऱ्या विषयी माहिती दिली आहे. दिल्ली पोलिसांनी एक फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शन कसं असंत याविषयी सांगण्यात आलं आहे. दिल्ली पोलीस दलातील अधिकारी मोनिका भारद्वाज यांनी बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शन बनवणाऱ्यांविषयी काही माहिती दिली आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या बॉक्स वर COVIPRI हे नाव लिहिलेलं असे तर ते बनावट इंजेक्शन असतं. त्यामुळं असा उल्लेख असणारं इंजेक्शन खरेदी करु नका, असं सांगण्यात आलं आहे.

covipri नावानं बनावट इंजेक्शनची विक्री

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार covipri नावानं कोणत्याही रेमडेसिव्हीर औषधाची विक्री केली जात नाही. बनावट रेमडेसिव्हीर बनवणाऱ्या गँगचा पर्दाफाश करण्यात आला आहे. बाजारपेठेत या औषधाची विक्री सुरु आहे. काही व्यक्ती नफाखोरी करण्यासाठी नागरिकांच्या आयुष्याशी खेळत आहेत. बनावट रेमडेसिव्हीर प्रकरणी आंतरराज्यीय टोळीला अटक करण्या आली आहे.

बनावट रेमडेसिव्हीर कसं ओळखणार?

बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शन विकणाऱ्यांनी मूळ इंग्रजीमध्ये काही फेरबदल करुन बॉक्सवर छापले आहेत. For used in india. Not for export इंग्रजी व्याकरणाच्या नियमांनुसार हे चूक आहे. ‘caution’ म्हणून “It is a dangerous to take this preparation Except under medical supervision” हे लिहिलं आहे. व्याकरणाच्या दृष्टीनं हे देखील चूक आहे. बॉक्सवर छापण्यात आलेला पत्ता देखील चुकीचा आहे. मेट्टूपलायम सिंगटममध्ये औषध बनवल्याचा दावा करण्यात आलाय. मेट्टूपलायम तामिळनाडूमध्ये तर सिंगटम सिक्कीममध्ये आहे.

संबंधित बातम्या:

SBI कडून अलर्ट! नोकरीच्या शोधात एक चूक पडेल महागात, फसवणुकीपासून ‘असे’ राहा सावध

…तर बँक खाते रिकामं झालेच म्हणून समजा; SBI चा पुन्हा एकदा ग्राहकांना अलर्ट

( How to check fake and real remdesivir injection Delhi Police alert know details)