AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramdev Baba : सर्दी, खोकल्याचा त्रास का होतो? रामदेव बाबांनी सांगितला उपाय!

बाबा रामदेव यांच्या मते खोकला आणि सर्दी प्रामुख्याने शरीरातील वात आणि कफ दोषामुळे होते. ज्या लोकांना वात दोष आहे त्यांनी आपल्या आहारात थोडा बदल करायला हवा. अशा लोकांनी तेलकट, थंड किंवा आंबट पदार्थ खाणे कमी करावे.

Ramdev Baba : सर्दी, खोकल्याचा त्रास का होतो? रामदेव बाबांनी सांगितला उपाय!
ramdev baba
| Updated on: Nov 06, 2025 | 9:13 PM
Share

Ramdev Baba Remedy : योगगुरू रामदेवबाबा नेहमी योगा, प्राणायाम यांच्या मदतीने अनेक आजार दूर होऊ शकतात, असे सांगतात. प्रत्येकाने रोज योगासने, प्राणायाम करायला हवे. यामुळे निरोगी राहण्यास मदत होते, असे ते नेहमीच सांगतात. आता त्यांनी सर्दी, खोकला या कधीही आजारावर नेमके उपाय सांगितले आहेत. विशेष म्हणजे सर्दी, खोकला नेमका का होतो? याचेही कारण त्यांनी सांगितले आहे.

बाबा रामदेव यांच्या मते खोकला आणि सर्दी प्रामुख्याने शरीरातील वात आणि कफ दोषामुळे होते. ज्या लोकांना वात दोष आहे त्यांनी आपल्या आहारात थोडा बदल करायला हवा. अशा लोकांनी तेलकट, थंड किंवा आंबट पदार्थ खाणे कमी करावे. या गोष्टींमुळे वातदोष वाढतो. म्हणूनच सर्दी, खोकला वाढतो. वातदोष असणाऱ्यांचे शरीरा फारच संवेदनशील असते. त्यामुळेच छोट-छोट्या गोष्टींचा त्यांच्या शरीरावर परिणामहोतो. शरीरात वात वाढलेला असेल तर म्युकसचाही त्रास होतो.

कोणकोणत्या गोष्टी सर्दी, खोकल्याला थांबवू शकतात

शरीरात कफदोष असेल तर अनेक अडचणी येतात. कफ वाढतो. त्याचा परिणाम पूर्ण शरीरावर पडतो. कफदोषामुळे शरीर लठ्ठ होते. झोप जास्त येते. सुस्ती वाढते. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असे रामदेवबाबांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे लहान मुलांना सर्दी, खोकला झाला असेल त्यांना थेट औषध देण्याऐवजी त्यांच्यावर नैसर्गिक पद्धतीने उपचार कसा करता येईल, यावर विचार करावा, असेही रामदेव बाबांनी सांगितले आहे. लहान मुलांवरील उपचारासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा. खोकला, सर्दी घालवण्यासाठी हळद, आलं, तुळस, लवंग, मिरे, इलायची, जायफळ यासारख्या वस्तूचां फार उपयोग होऊ शकतो. यातील बऱ्याच वस्तू या घरातच मिळतात. त्यामुळे यांचा वापर करावा, असा सल्ला रामदेवबाबा यांनी दिला आहे.

मिरे भाजून चावल्यास होतो फायदा

उदाहरणादखल लहान मुलांना सर्दी, खोकल्याचा त्रास होत असेल तर लवंग, जायफळ यांना दगडावर घासून ते पिता येते. काळे मिरे यांना भाजून ते चावल्यामुळे सर्दी, खोकला कमी होतो, असे रामदेवबाबा यांचे मत आहे. जायफळ, अदरक, लवंग यांना पाण्यात उकळून त्याचा काढा पिला तरीही सर्दी, खोकला दूर होतो, असे रामदेवबाबा यांचे मत आहे.

प्राणायाम, योगासनेही फार महत्त्वाचे

दरम्यान, प्राणायामदेखील तुम्हाला अनेक अडचणींपासून दूर ठेवू शकतात. सिद्धासन, भस्त्रिका, कपालभाती यासारखे प्राणायाम रोज केले पाहिजेत. यामुळे वातदोष, पित्तदोष, कफ यासारख्या अडचणी दूर होण्यास मदत होते. आजारी पडण्याची शक्यता कमी होते, असे रामदेवबाबा यांचे मत आहे.

हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.