AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

88 किलो ते 59 किलोचा प्रवास: मॅगी, चॉकलेट खाऊन सुद्धा होऊ शकते तुमचे वजन कमी..या महिलेने घडवून आणले अद्भुत बदल!!

या महिलेने फक्त डायट आणि व्यायामाच्या आधारावर आपले 29 किलो वजन कमी केले आहे. वजन कमी करण्यासाठी कोणतेही निर्बंध यांनी आपल्या शरीरावर लावले नाही. सगळे पदार्थ सेवन करून आपले वजन कमी केले फक्त आपल्या शरीरातील कॅलरीकडे विशेष लक्ष दिले आधी त्यांचे वजन 88 किलो होते परंतु आता त्यांचे वजन 59 किलो आहे. सगळ्यांना थक्क करणारा आहे हा अद्भुत प्रवास चला तर मग जाणून घेऊया

88 किलो ते 59 किलोचा प्रवास: मॅगी, चॉकलेट खाऊन सुद्धा होऊ शकते तुमचे वजन कमी..या महिलेने घडवून आणले अद्भुत बदल!!
| Edited By: | Updated on: Jan 16, 2022 | 7:05 AM
Share

वजन कमी (Weight loss) करण्यासाठीं सध्याच्या काळामध्ये खूप सारे वेगवेगळे प्रयोग केले जातात. काही लोकांचे वजन कमी होऊन जाते, काही लोकांचे वजन कमी होत नाही जेव्हा अनेकांचे वजन कमी होत नाही तेव्हा या लोकांच्या मनामध्ये निराशा(Demotivate) निर्माण होते आणि म्हणूनच लोकांचा व्यायामाकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होऊन जातो तुम्ही सुद्धा त्यांच्या पैकी एक असाल तर आम्ही तुम्हाला विश्वास देवू इच्छितो की या लेखातील माहिती वाचल्यानंतर तुम्ही तुमचा बंद केलेला व्यायाम पुन्हा नव्याने सुरू करायला आणि नव्या जिद्दीने तुम्ही तुमचे वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अश्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल (Weight loss journey) सांगणार आहोत ज्यात या महिलेने आपले 29 किलो वजन कमी केले आहे.

या महिलेने असे काहीच वेगळे केले नाही जे तुम्ही करू शकणार नाही. या महिलेने फक्त काही मूलभूत गोष्टींवर नियंत्रण ठेवले आणि बेसिक नियम पाळून आपले वजन कमी केले आहे आणि म्हणून फॅट टू फिट असा अद्भुत प्रवास त्यांनी कमी कालावधीमध्ये गाठला आहे.

88 किलो ते 59 किलो पर्यंत केले वजन कमी

आजच्या लेखामध्ये आपण ज्या महिलेबद्दल जाणून घेत आहोत त्या महिलाचे नाव आहे अंकिता जैन. अंकिता हरियाणा येथील फरिदाबाद येथे राहणाऱ्या आहेत, ते गेले आठ वर्षापासून दुबई येथे स्थायिक आहेत. अंकिता जैन यांनी “आज तक”(Aajtak.in) सोबत बातचित करताना सांगितले की,सुरुवातीला त्यांचे वजन खूप जास्त होते परंतु काही वर्षांपूर्वी प्रेग्नेंसीनंतर त्यांचे वजन अजून वाढले त्यात त्यांचे वजन 88 किलो एवढे झाले होते.

त्यानंतर त्यांना असे वाटले की आपले वजन खूपच वाढलेले आहे तर अशावेळी वजन कमी करण्यासाठी त्यांनी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी कमी केल्या, आहारावर अनेक प्रतिबंध लावले आणि आपल्या आहारातून जंक फूड (Junk foods) आणि ज्यादा (Extra calorie food) कॅलरी निर्माण करणारे पदार्थ सुद्धा काढून टाकले असे केल्यानंतर एका वर्षातच त्यांचे वजन 74 किलोपर्यंत पोहचले म्हणजे त्यांनी एका वर्षात 14 किलो वजन कमी केले होते.

त्यानंतर त्यांनी काही काळ आराम केला आणि त्यानंतर विचार केला की पुन्हा आपले वजन खूप वाढलेले आहे यासाठी त्यांनी एका कंपनीची मदत घेतली त्या कंपनीच्या मदतीने पुन्हा आपल्या शरीराच्या आवश्यकतेनुसार डायट प्लॅन (Diet plan) आणि वर्कआऊट प्लॅन (Workout plan) तयार केला.

त्यानंतर अंकिता यांनी डायटला फॉलो केले आणि जिम मध्ये जाऊन व्यवस्थित रित्या एक्ससाइज करण्यास सुद्धा सुरुवात केली. हळूहळू त्यांचे वजन कमी होत गेले आणि फक्त नऊ महिन्यांमध्ये 74 किलो ते 59 किलोवर अंकिता पोहोचल्या म्हणजेच त्यांनी पुन्हा 15 किलो वजन कमी केले होते एकंदरीत त्यांच्या वजनाबद्दल बोलायचे झाल्यास आतापर्यंत 31 किलो वजन अंकिता यांनी कमी केले.

असा होता अंकितांचा डायट

अंकिता यांनी सांगितले की जेव्हा त्यांचे वजन 80 किलो होते तेव्हा त्यांनी 74 किलो पर्यंत आणण्यासाठी क्रॅश डायट (Crash Diet ) चा आधार घेतला. क्रॅश डायट म्हणजे या प्रकारचे डायटमध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरी असतात ज्यामुळे आपले वजन तेजीने कमी होते सोबतच शरीरातील चरबी यांच्या बरोबरच मांसपेशी यांचे वजन देखील कमी होते.

यानंतर अंकिता यांनी एक व्यवस्थित डायट तयार केला ज्यामध्ये त्यांनी साधारणतः 1500 कॅलरी सेवन करायचे. या डायटमध्ये कोणत्याही प्रकारचा आहात अश्या विशिष्ट पद्धतीने ठरवला गेला होता त्या कोणत्याही वेळी काही पदार्थ खात असत परंतु त्यांनी आपल्या शरीरातील कॅलरीज आकडा 1500 वर अजिबात जाऊ दिला नाही याची काळजी ते नेहमी घेत असत

यासाठी त्या दिवसभर बेसनचा चीला (Besan Cheela), प्रोटीन पावडर (Protein Powder), चपाती (Roti), डाळ (Dal), सलाड (Salad), स्प्राउट्स  (Sprouts), ड्राय फ्रूट (Dry Fruits), दूध (Milk), दही (Curd), पनीर (Paneer) इत्यादी पदार्थ सेवन करत होत्या.

या पदार्थांना त्या कॅलरी नुसार विभागून घेत असे जसे की 100 ग्रॅम पनीर मध्ये अंदाजे 260 कॅलरी 1 कप म्हणजे 100 ग्रॅम दही मध्ये 70 कॅलरी असते.त्या पदार्थ आणि कॅलरी नुसार फक्त 1500 कॅलरी सेवन करत होत्या.

पुन्हा अशी एक वेळ आली की,जेव्हा त्यांनी आपल्या आहारात 1900 कॅलरीचा समावेश केला. या सगळ्या प्रक्रियात मॅगी ,चॉकलेट, आइस्क्रीम सर्व पदार्थ खाल्ले होते परंतु त्यांच्या शरीरातील कॅलरी 1900 पेक्षा अधिक जात नव्हती त्यानंतर त्यांनी पुन्हा 1500 कॅलरी सुरू करण्याचे ठरवले मग जसे वजन कमी होत गेले तसे तसे त्यांनी आहारातील कॅलरी असणारे पदार्थ कमी केले आणि त्यानंतर अंकिता यांनी 1200कॅलरी सेवन करण्यास सुरुवात केली परंतु त्यानंतर त्या कॅलरी कमी करू शकत नव्हत्या अशा वेळी त्यांनी व्यायाम वाढवला.

असा करायच्या अंकिता वर्कआउट

अंकिता यांनी सांगितले की सुरुवातीच्या काळामध्ये खूपच हलका व्यायाम त्यांनी केला होता त्यामुळे हळूहळू फरक जाणवत होता. जिममध्ये गेल्यावर खूप कमी व्यायाम व्हायचा म्हणजेच 2.5 किलो आणि 5 किलोचे डंबेल्स घेऊन अंकिता व्यायाम करत असेल.

अंकिता नेहमी वेट ट्रेनिंग ला महत्त्व दिले. कार्डियो खूपच कमी करत असे, जसे जसे त्यांनी एक्ससाइज करण्यास सुरुवात केली तसे तसे वजन वाढत गेले त्या नेहमी 10 हजार पावले चालले जातील याकडे त्या अगदी बारकाईने लक्ष द्यायच्या.

जिम ला गेल्यावर 2 बॉडी पार्ट करत म्हणजेच अंकिता जसे की लेग्स सोबत एब्स, चेस्ट सोबत ट्राइसेप्स, बॅक सोबत बायसेप्स, शोल्डर सोबत एब्स. या सगळ्या व्यायामाचे आधारावर आणि डायटच्या आधारावर त्यांनी आपले वजन कमी केले.

वजन कमी करण्यासाठी या आहेत टिप्स

अंकिता म्हणतात की,फिट आणि तंदुरुस्त राहणे हे आपल्या जीवनशैलीचा एक भाग आहे म्हणूनच वजन कमी करण्याचे टेन्शन अजिबात घेऊ नका. जर तुमचे वजन वाढले आहे तर अशावेळी सकारात्मक विचार करा आणि योग्य ती सुरुवात करा.जेव्हा तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार नव्याने येऊ लागतील अशा वेळी तुमचे मन सुद्धा नेहमी आनंदी राहील आणि मन जेव्हा आनंदी राहते तेव्हा परिणामी आपले शरीर सुद्धा निरोगी राहण्याचा प्रयत्न करत असते. या सगळ्या सकारात्मक परिणामामुळे तुम्हाला स्वतःला प्रोत्साहन मिळत जाईल आणि हेच प्रोत्साहन तुम्हाला तुमचे वजन कमी करण्यासाठी भविष्यात फायदेशीर ठरेल.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.