पुरुषांनी जास्त लोणचं खाऊच नये, थेट लैंगिक इच्छा, शुक्राणूंच्या संख्येवर होतो परिणाम

लोणच्याचे दुष्परिणाम: भारतीय लोक खाण्यापिण्याचे खूप शौकीन आहेत. विशेषतः उत्तर भारतातील लोकांची सकाळ ही तुपाने भरलेले पराठे, लोणच्याने सुरू होते. या नाश्ताने त्यांचे पोट आणि मन भरते. परंतु, त्याच्या शरीरावर यांचा विपरीत परिणाम होत असतो.

पुरुषांनी जास्त लोणचं खाऊच नये, थेट लैंगिक इच्छा, शुक्राणूंच्या संख्येवर होतो परिणाम
pickle
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 7:40 PM

भारतीय लोकांमध्ये लोणचे हा एक आवडता पदार्थ आहे. जेवणाचे ताट लोणच्याशिवाय (Without pickles) पूर्णच होत नाही. जोपर्यंत मसूर, भाजी, चटण्या, लोणची, रायता अशा सर्व गोष्टींनी संपूर्ण ताट भरत नाही, तोपर्यंत भारतीयांचे जेवणाबाबत अजिबात समाधान होत नाही. जर तुम्हीही अशा प्रकारच्या जेवणाचे शौकीन असेल आणि दररोज नाश्ता आणि जेवणात लोणचे नक्कीच खात असाल तर, आता सावध व्हा आणि ही सवय बदला. अन्यथा, तुमच्यासाठी आरोग्याशी संबंधित (Related to health) अनेक समस्या (Many problems) उद्भवू शकतात. जर तुम्हाला लोणचे खूप आवडत असेल तर, तुम्ही आठवड्यातून एकदा लोणचे घेऊ शकता. पण तुम्हाला कोणताही आजार असेल तर लोणचे खाणे टाळावे. कधीतरी लोणचे खाण्याची खुप इच्छा झाली तर, फक्त नावापुरतं लोणचं तुम्ही खाऊ शकता.

सोडियम समस्या वाढवते

आहारतज्ञ अनामिका सिंह यांच्या मते, लोणचे जास्त काळ टिकवण्यासाठी त्यात भरपूर मीठ टाकले जाते. मीठामध्ये सोडियम असते. सामान्यतः लोक घरांमध्ये शुद्ध मीठ वापरतात आणि त्यात 97 ते 99 टक्के सोडियम क्लोराईड असते. जे पोषणाच्या दृष्टीने शरीरासाठी चांगले मानले जात नाही. डब्ल्यूएचओच्या मते, एखाद्या व्यक्तीने दिवसात पाच ग्रॅमपेक्षा कमी मीठ खावे, म्हणजे सुमारे एक चमचे मीठ. यामुळे त्याच्या शरीराला पुरेसे सोडियम मिळते. शरीरातील सोडियमची गरज आपल्या अन्नानेच पूर्ण होते. पण आपण अन्नाव्यतिरिक्त इतर गोष्टींमधून जास्त मीठ खातो. त्यामुळे आपल्या शरीरात सोडियमचे प्रमाण अधिक पोहोचते. लोणच्यामध्ये भरपूर मीठ असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही रोज लोणचे खात असाल तर, तुमचे किती नुकसान होऊ शकते याचा अंदाज तुम्ही लावू शकता. तज्ज्ञांच्या मते, सोडियमची कमतरता आणि वाढ दोन्हीमुळे तुमच्यासाठी अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे सोडियम संतुलित प्रमाणात घेणे अत्यंत आवश्यक आहे.

उच्च बीपी समस्या

बर्‍याच अभ्यासातून असे दिसून आले आहे की, अन्नामध्ये जास्त प्रमाणात सोडियमचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका अधिक वाढतो. सोडियममुळे हाय बीपीच्या रुग्णांना मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यांच्यासाठी ते विष मानले जाते. ज्या लोकांना कोणताही त्रास होत नाही, त्यांनी सोडियम जास्त प्रमाणात घेतल्यास ते उच्च रक्तदाबाचे रुग्णही होऊ शकतात. बर्याच अभ्यासातून असे दिसून आले आहे की जास्त मीठ कधीकधी अकाली मृत्यूचे कारण असू शकते.

लिव्हर आणि किडनीला इजा होऊ शकते

अतिरिक्त सोडियम तुमच्या मूत्रपिंड आणि लिव्हरला देखील नुकसान पोहोचवू शकते आणि लोणच्यामध्ये भरपूर सोडियम असते. वास्तविक, सोडियमच्या अतिसेवनाने रक्तदाब वाढतो आणि त्यामुळे इतर अवयवांवर दबाव येतो. या प्रकरणात, लिव्हर आणि मूत्रपिंडावर अधिक नुकसान होऊ शकते. ज्यांना आधीच लिव्हर किंवा किडनीशी संबंधित समस्या आहेत त्यांनी लोणचे जास्त प्रमाणात खाऊ नये.

शरीरात अल्सर आणि जळजळ होण्याचा धोका

सहसा, लोणच्यामध्ये मजबूत मसाले देखील वापरले जातात, ज्यामुळे तुमच्या तोंडाची खराब चव चांगली होते. अशा परिस्थितीत, अधिक मीठ आणि चमचमीत मसाले तुमच्यासाठी अल्सरचा धोका वाढवतात. याशिवाय लोणचे शरीरात मीठ टिकवून ठेवते, त्यामुळे तुमच्या शरीरात सूज येऊ शकते.

गरोदरपणातही लोणचे मर्यादित प्रमाणात खावे

गरोदरपणात महिलांना लोणच्याची तल्लफ असते. शरीरात होत असलेल्या हार्मोनल बदलांमुळे हे घडते. लोणच्याच्या माध्यमातून स्त्रीच्या तोंडाची चव सुधारते, तसेच तिच्या शरीराला सोडियम आणि पोटॅशियमसारखे इलेक्ट्रोलाइट्स मिळतात, जे त्यावेळी गर्भासाठी आवश्यक मानले जातात. पण लोणचे जास्त प्रमाणात खाल्ल्याने महिलांमध्ये उच्च रक्तदाब आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. या प्रकरणात, गर्भपात इत्यादी देखील होऊ शकतात. त्यामुळे गरोदर महिलांनीही लोणची मर्यादित प्रमाणातच खावी.

पुरुषांनीही लोणचे जास्त खाऊ नये

पुरुषांनीही रोज लोणचे खाऊ नये. जास्त प्रमाणात मीठ लैंगिक इच्छा आणि शुक्राणूंच्या संख्येवर वाईट परिणाम करते. अशा परिस्थितीत वंध्यत्वाची समस्या वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे पुरुषांनीही लोणचे मर्यादित प्रमाणात खावे.

Non Stop LIVE Update
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.