डबल चिनमुळे चेहरा दिसत असेल भारी तर दररोज करा चेहऱ्याचे ‘हे’ व्यायाम

सडपातळ असूनही, काही लोकांचा चेहरा जाड दिसतो. त्याचे कारण म्हणजे त्यांच्या चेहऱ्याचा पोत असतो, तर कधी लटकलेली डबल हनुवटीही त्यासाठी कारणीभूत ठरू शकते.

डबल चिनमुळे चेहरा दिसत असेल भारी तर दररोज करा चेहऱ्याचे 'हे' व्यायाम
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 3:26 PM

नवी दिल्ली : डबल चिन म्हणजेच हनुवटीखालच्या अतिरिक्त चरबीमुळे लोक खूप अस्वस्थ असतात. खाण्याच्या अनियंत्रित व अयोग्य सवयी आणि शारीरिक व्यायामाचा अभाव (no exercise) यामुळे पोटावर तसेच त्वचेवर अतिरिक्त चरबी (fats) जमा होते. सहसा ही समस्या शरीरातील वाढत्या चरबीचे प्रतिबिंब असते. अशा परिस्थितीत जबड्याभोवती जमा झालेल्या चरबीमुळे चेहऱ्याचा पोत खराब होतो. यामुळे अनेक वेळा महिलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव जाणवू लागतो. खरं तर, जे लोक त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यात आणि ती आकर्षक बनवण्यात व्यस्त असतात, त्यांच्यासाठी डबल चिन (Double chin) ही एक समस्या आहे.

अशा परिस्थितीत बहुतेक महिला मेकअपने ती लपवण्याचा प्रयत्न करतात. पण हा तात्पुरता उपाय आहे. मेकअप काढल्याबरोबर तुमची डबल चिन दिसू लागते. पण या समस्येपासून मुक्त होणे फार कठीण नाही. योग्य व्यायाम, योग्य खाण्याच्या सवयी आणि काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही डबल चिनची समस्या सहज कमी करू शकता.

डबल चिन कमी करण्यासाठी प्रभावी व्यायाम

हे सुद्धा वाचा

1) स्ट्रेट जॉ (Straight jaw)

तुमचं डोकं मागे वाकवा आणि छताकडे पहा. तुमचा खालचा जबडा आणखी थोडा वर उचलण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून हनुवटीच्या खाली जास्त ताण जाणवेल. आता या स्थितीत सुमारे 15 सेकंद रहा. नंतर मान आणि जबडा शिथिल करून सामान्य स्थितीत परत या. याची किमान 5 वेळा पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे.

2) टंग स्ट्रेच (Tongue stretch)

तुमचा चेहरा सरळ ठेवून सरळ पुढे पहा. आता शक्यतो तितकी जीभ बाहेर काढा. तुमची जीभ वरच्या दिशेने उचला. 10 सेकंद या आसनात राहा, त्यानंतर तुमची जीभ शिथिल करा आणि सामान्यपणे तोंडात परत आत आणा. याच पाच ते सात वेळा सराव करा.

3) बॉल एक्सरसाइज (ball exercise)

स्ट्रेस बॉल घ्या आणि तो तुमच्या हनुवटी आणि मान यांच्यामध्ये ठेवा. तो बॉल तुमची मान आणि हनुवटी दरम्यान सुमारे 1 मिनिट धरून ठेवा. या दरम्यान तुम्हाला मान आणि हनुवटीच्या स्नायूंमध्ये ताण जाणवेल. योग्य परिणामांसाठी याची किमान 8 ते 10 वेळा पुनरावृत्ती करा.

4) E-O एक्सरसाइज

आपले डोके सरळ आणि स्थिर ठेवा. आता तुमचा जबडा ताणताना सतत X-O चा उच्चार करा. प्रत्येक 15 सेकंदांनंतर, 5 ते 7 सेकंदांचा विराम घ्या आणि पुन्हा पुन्हा उच्चार करत रहा. चांगल्या व योग्य परिणामांसाठी हा व्यायाम दररोज किमान 5 मिनिटे नियमितपणे करा.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.