AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात फिट कसे रहाल? होमिओपॅथी डॉक्टरांकडून जाणून घ्या

हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आज तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी तज्ज्ञांकडून जाणून घ्या. हिवाळ्यात काही लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडू शकतात आणि त्यांना सर्दी, ताप, खोकला यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा वेळी होमिओपॅथी हा आपली प्रतिकारशक्ती मजबूत करण्याचा प्रभावी मार्ग ठरू शकतो. चला जाणून घेऊया.

हिवाळ्यात फिट कसे रहाल? होमिओपॅथी डॉक्टरांकडून जाणून घ्या
healthImage Credit source: Witthaya Prasongsin/Moment/Getty Images
| Edited By: | Updated on: Dec 22, 2024 | 1:11 AM
Share

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्याचा आणि फिट म्हणजेच निरोगी राहण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात. हिवाळा जसजसा जवळ येतो तसतशी लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. यामुळे वारंवार सर्दी, घसा खवखवणे आणि ताप यासारख्या समस्या उद्भवतात. यावर आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहोत, याविषयी पुढे वाचा.

तुम्हाला माहिती आहे का की, कमकुवत प्रतिकारशक्ती शरीराला आजारांपासून वाचविण्यात अपयशी ठरते. अशावेळी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणं खूप गरजेचं आहे. होमिओपॅथी ही अशी पद्धत आहे जी कोणत्याही दुष्परिणामांशिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. याविषयी अधिक चला जाणून घेऊया,

होमिओपॅथिक पद्धतींनी रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी, पण त्याआधी होमिओपॅथी म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते हे समजून घेऊया.

होमिओपॅथी ही प्राचीन वैद्यकीय पद्धत आहे. होमिओपॅथीमध्ये वनस्पतींसारख्या नैसर्गिक स्त्रोतांपासून औषधे तयार केली जातात. सर्दी, घसा खवखवणे, त्वचारोग यासह अनेक आजारांवर होमिओपॅथीचा वापर केला जातो. होमिओपॅथी नैसर्गिकरित्या प्रतिकारशक्ती वाढवते आणि रोगांच्या कारणांवर कार्य करते. होमिओपॅथीच्या माध्यमातून रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवावी. चला तर मग जाणून घेऊया

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फॉलो करा ‘या’ पद्धती

दिल्लीतील होमिओपॅथीचे डॉ. अजय कुमार गुप्ता सांगतात की, हिवाळ्यात आजार टाळण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही इचिनासिया मेडिसिन आणि कॅल्केरिया कार्बोनिका औषधासारख्या या होमिओपॅथिक औषधांचा वापर करू शकता. हे औषध सर्दी आणि व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षण करते.

फॉस्फरस औषध घशातील समस्या आणि संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करते. याशिवाय प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि त्वचेच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी सिलिसिया औषध उपयुक्त आहे. होमिओपॅथी आपल्याला केवळ औषधांवर अवलंबून ठेवत नाही. तसेच योग्य आहार आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे.

औषधांच्या सेवनाबरोबरच भरपूर झोप घेणं, पौष्टिक आहार घेणंही गरजेचं आहे. आपल्या झोपेच्या आणि जागे होण्याच्या वेळा निश्चित करा. आहारात जंक फूडचे सेवन करणे टाळावे.

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका. हिवाळ्यात कोमट कपडे घाला, कोमट पाणी प्या आणि थंड पदार्थ टाळा. ताजी फळे, भाज्या, शेंगदाणे आणि व्हिटॅमिन सी युक्त गोष्टींचा आहारात समावेश करा. हलका व्यायाम किंवा योगा केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...