Cough, cold and Fever : पावसाळ्याच्या दिवसात वाढतोय सर्दी-तापाचा कहर, डॉक्टरांकडून उपाय जाणून घ्या….

पावसाळ्याच्या दिवसात अनेक आजार पसरतात. सर्दी, खोकला, ताप हे आजार होतच असतात. मात्र हे आजार नेमके कशामुळे होतात आणि त्यापासून वाचण्याचा उपाय तरी काय ? याविषयी जाणून घ्या...

Cough, cold and Fever : पावसाळ्याच्या दिवसात वाढतोय सर्दी-तापाचा कहर, डॉक्टरांकडून उपाय जाणून घ्या....
सर्दी-तापाचा कहरImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 10:32 AM

मुंबई : How to Prevent Cold and Fever : पावसाळ्याच्या (Monsoon Season) दिवसात अनेक आजार पसरतात. सर्दी, खोकला आणि तापाच्या (Cough, cold and Fever) रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुख्य म्हणजे, जर कोणाला सर्दी- खोकला झाला, तर त्याच्या आसपासच्या लोकांनाही त्याची लागण होऊ शकते. हे आजार संसर्गजन्य आहेत. पावसाळ्यात आपली पचनशक्ती मंदावलेली असते. रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) कमी झालेली असते. अशा वेळी आपण पटकन आजारी पडण्याचा धोका अधिक असतो:. त्यामुळे आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीला सर्दी , खोकला वा ताप आल्यास, आपल्यालाही त्याची लागण होण्याचा धोका असतो. वेळेवर उपचार न करता, दुखणं अंगावर काढत राहिल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. मात्र मुळातच हे आजार का होतात, आणि त्यापासून वाचण्यासाठी नेमके काय उपाय करावेत, हे डॉक्टरांकडूनच जाणून घेऊया.

काय सांगतात तज्ज्ञ ?

सर गंगाराम हॉस्पिटलमधील फिजीशियन डॉ. सोनिया रावत यांच्या सांगण्यानुसार, पावसाळ्याच्या दिवसात वातावरण सतत बदलत असते. आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, असे लोक पटकन आजारी पडतात. सामान्यत: हे आजार जीवाणूंच्या संसर्गामुळे (बॅक्टेरिअल इन्फेक्शन) होतात. इन्फेक्शनमुळे लोकांना सर्दी, खोकला, गळ्यात खवखव आणि ताप यासारख्या आजारांचा सामना करावा लागतो. जर तुम्ही व्हायरल इन्फेक्शनमुळे आजारी असाल तर तुम्ही 3 ते 10 दिवसांत बरे व्हाल. मात्र जीवाणूंचा संसर्ग झाला असेल तर तापाचे प्रमाण वाढते, तसेच गळ्यात जास्त खवखव होणे, खूप थकायला होणे, अशी लक्षणे दिसू शकतात. अशा वेळी दुखणे अंगावर न काढता, त्वरित डॉक्टरांना दाखवावे. योग्य औषधे- उपचार घेऊन जीवाणूंमुळे झालेला संसर्ग बरा होऊ शकतो.

सर्दी- खोकल्यापासून कसे वाचावे?

डॉ. सोनिया रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल आणि बॅक्चेरिअर इन्फेक्शनपासून वाचायचे असेल तर सर्वप्रथम जीवनशैली सुधारणे गरजेचे आहे. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्या. कोट पाण्यात मीठ घालून त्याने गुळण्या कराव्यात आणि गरम पाणी पित रहावे. तसेच खाण्या-पिण्याकडेही नीट लक्ष द्यावे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, पावसाळ्याच्या दिवसात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘आलं’ वापरावे. रोजच्या आहारात आल्याचा समावेश करावा. तसेच घरचा. पौष्टिक आहार घ्यावा. बाहेरचे , उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळावे. रोज किमान थोडा वेळ तरी व्यायाम करावा आणि शरीराची पुरेशी हालचाल ठेवण्यासाठी, चालायला जावे. शरीराचे संतुलन कायम राखण्यासाठी चांगला आहार घ्यावा, फळे खावीत. जे लोक आजारी असतील, त्यांच्यापासून थोडा काळ लांब रहावे. तसेच वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे. त्यामुळे सर्दी-खोकलाच नव्हे तर कोरोनापासूनही तुमचा बचाव होईल.

हे सुद्धा वाचा

डासांना पळवून लावा

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, पावसाळ्याच्या दिवसात माश्या- डास यांच्याद्वारे पसरणारे आजार, उदाहरणार्थ – मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया, यांचा धोका वाढतो. त्यापासून वाचणे, अत्यंत महत्वाचे आहे. या दिवसांत डासांपासून वाचण्यासाठी शरीर पूर्णपणे झाकले जाईल, असे कपडे घालावेत. मॉस्किटो रिपेलंट क्रीम अथवा लोशन लावावे. रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. घरात अथवा आसपास, कुठेही पाणी साचू देऊ नका. तब्येतीबाबत कोणताही त्रास जाणवू लागल्यास, त्वरित डॉक्टरांना संपर्क करावा.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.