Child Care : लहान मुलांच्या डोळ्यांना काजळ लावणे किती सुरक्षित?, वाचा तज्ज्ञांचा खास सल्ला!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Oct 22, 2021 | 11:41 AM

आपण आपल्या घरी किंवा इतरत्र बघितले असेल की, लहान मुलांच्या डोळ्यांना दररोज काजळ लावले जाते. बऱ्याच लोकांचा असा समज आहे की, मुलांच्या डोळ्यांना काजळ लावल्यामुळे त्यांचे डोळे सुंदर आणि मोठे होतात. यासोबतच डोळ्यांच्या सर्व समस्याही दूर होतात.

Child Care : लहान मुलांच्या डोळ्यांना काजळ लावणे किती सुरक्षित?, वाचा तज्ज्ञांचा खास सल्ला!
काजळ

मुंबई : आपण आपल्या घरी किंवा इतरत्र बघितले असेल की, लहान मुलांच्या डोळ्यांना दररोज काजळ लावले जाते. बऱ्याच लोकांचा असा समज आहे की, मुलांच्या डोळ्यांना काजळ लावल्यामुळे त्यांचे डोळे सुंदर आणि मोठे होतात. यासोबतच डोळ्यांच्या सर्व समस्याही दूर होतात. मात्र, या उलट डॉक्टरांचे मत आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, लहान मुलांच्या डोळ्यांना काजळ लावणे हानिकारक आहे.

बऱ्याच लोकांना असे वाटते की, घरगुती काजळ नैसर्गिक घटकांपासून बनवले जाते. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि मुलांच्या डोळ्यांना ते लावणे फायदेशीर आहे. मात्र, तज्ज्ञांचे मत आहे की घरगुती काजळ कमर्शियल काजळपेक्षा चांगली असू शकते, पण त्यात कार्बन देखील असते. जे मुलांसाठी हानिकारक आहे आणि त्यांच्यासाठी अनेक समस्या निर्माण करू शकते.

दृष्टी वाढते याचा पुरावा नाही

आपण ऐकले असेल की, डोळ्यांना काजळ लावल्याने दृष्टी वाढते. पण तसे काही पुरावे नाहीत. तज्ञ हे एक संपूर्ण मिथक मानतात. त्यांचा असा विश्वास आहे की, जर काजळ दृष्टी वाढवते, तर ज्या प्रत्येक व्यक्तीची दृष्टी कमी आहे त्याला काजळ लावण्याचा सल्ला का दिला जात नाही.

संक्रमणाचा धोका

तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, मुलांचे डोळे मऊ असतात. अशा स्थितीत जेव्हा त्यांना हाताच्या बोटाने काजळ लावले जाते. त्यावेळी संक्रमणाचा धोका वाढतो. याशिवाय अनेक वेळा आंघोळ करताना काजळ मुलांच्या डोळ्यामध्ये आणि नाकामध्ये जाते. यामुळे, डोळ्यांमध्ये जळजळ होते आणि कधीकधी नाकातील लहान छिद्र बंद होण्याचा धोका असतो.

खाज सुटण्याची शक्यता 

रोज काजळ लावल्याने ते डोळ्यांवर बऱ्याच वेळा राहते. यामुळे खाज सुटण्याची शक्यता असते. याशिवाय जर तुम्ही मार्केटमधील काजळ वापरत असाल तर ते आणखी धोकादायक आहे. कारण त्यात लेड आढळतात. यामुळे मुलांच्या मेंदूच्या विकासावरही विपरित परिणाम होऊ शकतो.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(In the eyes of children Harmful to apply kajal)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI