Cholesterol: कोलेस्टेरॉलची समस्या आहे? दररोज या पेयांचा एक घोट घ्या आणि निरोगी राहा!

कोलेस्टेरॉलची (Cholesterol) समस्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. कोलेस्टेरॉल टाळण्यासाठी आपल्याला आरोग्याची विशेष काळजी ही घ्यावी लागते. यासाठी विशेष: आहाराकडे (Diet) जास्त लक्ष द्यावे लागते. बाहेरील खाणे-पिणे, धूम्रपान करणे, दारू पिण्याची सवय कोलेस्टेरॉलमध्ये अत्यंत धोकायदाक आहे.

Cholesterol: कोलेस्टेरॉलची समस्या आहे? दररोज या पेयांचा एक घोट घ्या आणि निरोगी राहा!
कोलेस्टेरॉलची समस्या दूर करण्यासाठी जीवनशैलीमध्ये करा हे बदल.Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 11:23 AM

मुंबई : कोलेस्टेरॉलची (Cholesterol) समस्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. कोलेस्टेरॉल टाळण्यासाठी आपल्याला आरोग्याची विशेष काळजी ही घ्यावी लागते. यासाठी विशेष: आहाराकडे (Diet) जास्त लक्ष द्यावे लागते. बाहेरील खाणे-पिणे, धूम्रपान करणे, दारू पिण्याची सवय कोलेस्टेरॉलमध्ये अत्यंत धोकायदाक (Dangerous) आहे. त्यासोबतच तुम्हाला दररोज भरपूर पाणी प्यावे लागेल. कारण पाणी आपल्याला नैसर्गिक मार्गाने विषमुक्त करण्यास मदत करते. तसेच पाणी प्यायल्याने शरीरातील अनेक समस्या दूर होतात. तसेच खालील काही पेयांचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न करा.

ओट्सचे दूध

ओट्स आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात. ओट्समध्ये कॅलरीज नसतात. फायबर भरपूर असते. बीटा ग्लुकन देखील असते. जे आपल्या शरीराला कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करते. हे हानिकारक विषारी पदार्थ देखील बाहेर काढते. ओट्सचे दूध हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. ओट्सचे नियमित सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने कमी होण्यास मदत होते.

रेड वाईन

कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी रेड वाईन फायदेशीर आहे. मात्र, अतिरेक नकोच. रेड वाईन आपल्या हृदयाला हानिकारक कोलेस्टेरॉलपासून वाचवते. त्याचबरोबर शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते. मात्र, रेड वाईनवर अवलंबून राहणे नेहमीच योग्य नाही. हे पेय अधूनमधून घेतले जाऊ शकते.

ग्रीन टी

दररोज किमान एक कप ग्रीन टी पिण्याचा प्रयत्न करा. तसेच तीन ते चार कप शुगर फ्री लिकर चहा, ओलोंग चहा प्या. चहामध्ये फ्लेव्होनॉल असतात जे आपले कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. हे रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठण्यापासून देखील प्रतिबंधित करते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी दिवसातून किमान एक वेळा तरी आहारामध्ये ग्रीन टी घ्या आणि निरोगी राहा.

(टीप : ही माहिती फक्त सामान्य ज्ञानाच्या उद्देशाने देण्यात आली आहे. तुम्ही कोणत्याही आजारतात औषधोपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आजारवर उपचार सुरू करा.)

संबंधित बातम्या : 

World TB Day 2022 : टीबी हा सर्वात घातक संसर्गजन्य आजार, जाणून घ्या या आजाराशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची माहिती एका क्लिकवर

लहान मुले सतत आजारी पडतायेत? मग मुलांपासून आजार दूर ठेवण्यासाठी डाॅक्टरांच्या या खास टिप्स फाॅलो आणि मुलांना निरोगी ठेवा!

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.