AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care Tips : हृदय निरोगी ठेवण्यासाठी उन्हाळ्यात ‘या’ खास फळांचा आहारात समावेश करा!

बाराही महिने ताजी फळे (Fruits) खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. उन्हाळ्यात ताजी फळे खाल्ल्याने उन्हापासून आराम मिळतो. ते तुम्हाला निरोगी (Health Care)  देखील ठेवतात. या फळांमध्ये भरपूर पोषक असतात. ते आपले हृदय निरोगी ठेवण्याचे काम करतात.

Health Care Tips : हृदय निरोगी ठेवण्यासाठी उन्हाळ्यात 'या' खास फळांचा आहारात समावेश करा!
उन्हाळ्याच्या हंगामात या फळांचे सेवन कराImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 19, 2022 | 11:20 AM
Share

मुंबई : बाराही महिने ताजी फळे (Fruits) खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. उन्हाळ्यात ताजी फळे खाल्ल्याने उन्हापासून आराम मिळतो. ते तुम्हाला निरोगी (Health Care)  देखील ठेवतात. या फळांमध्ये भरपूर पोषक असतात. ते आपले हृदय निरोगी ठेवण्याचे काम करतात. ही फळे तुम्हाला हायड्रेट (Hydrate) ठेवतातच पण इतर आरोग्यदायी फायदे देखील आहेत. फळांमध्ये भरपूर पाणी आणि फायबर असते. ते तुमचे हृदय निरोगी ठेवण्याचे काम करतात. हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कलिंगड, आंबा, बेरी आणि पपई इत्यादी फळांचा आहारात समावेश करू शकता.

आंबा आंबा हे उन्हाळ्यातील एक प्रसिध्द फळ आहे. आंबा हे बहुतेक लोकांच्या उन्हाळ्यातील सर्वात आवडत्या फळांपैकी एक आहे. आंबा हृदय निरोगी ठेवतो. त्यात फायबर, पोटॅशियम आणि अनेक जीवनसत्त्वे असतात. पोटॅशियम वाढवणे आणि सोडियमचे सेवन कमी करणे हे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्तदाब पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.

पपई पपईमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात. हे हृदय आणि त्वचा निरोगी ठेवण्याचे काम करते. यामुळे जळजळ कमी होते. याशिवाय हे अनेक आरोग्यदायी फायदेही देते. यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये पपईचा समावेश करा. विशेष म्हणजे जवळपास प्रत्येक हंगामामध्ये पपई बाजारामध्ये उपलब्ध असते. रात्रीच्या वेळी पपईचे सेवन करणे टाळा.

कलिंगड कलिंगडामध्ये 90 टक्के पाणी असते. यामध्ये पोटॅशियम, लायकोपीन असे विविध पोषक घटक असतात. ते हृदय निरोगी ठेवतात. कलिंगडामुळे रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहते. कलिंगडचे रोज सेवन केल्याने हृदय निरोगी राहते. यासोबतच कलिंगड आपल्या शरीरातील पाण्याची पातळी वाढवण्यासही मदत करते. यामुळे कलिंगड खाणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

बेरी बेरीमध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. हे हृदयविकाराशी संबंधित ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात. फायबर समृद्ध बेरी हृदय निरोगी ठेवतात. हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही बेरीचे सेवन अनेक प्रकारे करू शकता.

संबंधित बातम्या : 

होळीमध्ये गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे वाढलेली साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी ‘या’ खास पदार्थांचा आहारात समावेश करा!

Skin Care : होळी खेळल्यानंतर त्वचेवर अ‍ॅलर्जी होते? मग हे 5 उपाय नक्कीच कामी येतील!

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?