तुम्हाला माहितीय का, कोणत्या 5 सवयींनी किडनी होते फेल…!

शरीरातील अशुद्ध पदार्थ एका अर्थाने फिल्टर करण्याचे काम आपली किडनी (kidney) म्हणजेच मूत्रपिंड करीत असते. किडनीव्दारे आपले रक्त शुद्ध राहण्यास मदत होऊन विषारी वा अनावश्यक घटक हे मुत्राव्दारे विसर्जित होत असतात. परंतु आपल्या या पाच सवयी आपल्या किडनीस हानी पोहचवू शकतात.

तुम्हाला माहितीय का, कोणत्या 5 सवयींनी किडनी होते फेल...!
KIDNEY

मानवी शरीरातील प्रत्येक अवयवाला काही ना काही कारणांनी महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येकाची आपआपली कामे असतात ज्यांच्या माध्यमातून आपले शरीर पूर्णतः: तंदुरुस्त राहते. यातील एखादीही अवयव हा निकामी झाल्यास त्याची मोठी किंमत शरीराला चुकवावी लागत असते. असाच एक महत्त्वाचा घटक म्हणजे आपली किडनी. शरीरातील अशुद्ध पदार्थ एका अर्थाने फिल्टर करण्याचे काम आपली किडनी (kidney) म्हणजेच मूत्रपिंड करीत असते. किडनीव्दारे आपले रक्त शुद्ध राहण्यास मदत होऊन विषारी वा अनावश्यक घटक हे मुत्राव्दारे विसर्जित होत असतात. परंतु आपल्या या पाच सवयी आपल्या किडनीस हानी पोहचवू शकतात.

1) शरीरात पाण्याचा अभाव

आपले संपूर्ण शरीर साधारणतः 60 टक्के पाण्याने (water) बनलेले आहे. त्यामुळे आपल्याला नेहमी हायड्रेड (hydrated) राहणे गरजेचे आहे. दिवसभरातील शरीराला लागणाऱ्या पाण्याची गरज पूर्ण करणे आवश्‍यक असते. पाण्याची गरज पूर्ण झाल्यावर किडनीची (kidney) कार्यक्षमताही सुधारण्यास मदत होत असते.

2) मिठाचा अतिरिक्त वापर टाळा

मीठ हा आपल्या रोजच्या अन्नपदार्थातील एक महत्त्वाचा घटक म्हणून समोर येतो. परंतु त्याचा अतिरेक झाल्यास याची मोठी किंमत शरीराला चुकवावी लागत असते. मिठाच्या रोजच्या जेवणात प्रमाणात वापर झाल्यास फायद्याचे ठरू शकते. अन्यथा ते उच्च रक्तदाबासही कारण ठरते. उच्च रक्तदाबामुळे त्याचा विपरीत परिणाम हा किडनीवर होत असतो. त्यामुळे वेळप्रसंगी किडनी निकामी होण्याचा धोकाही नाकारता येत नाही. याशिवाय तळलेले पदार्थ, बाहेरील फास्ट फूड याचाही मर्यादित वापर हवा.

3) मद्यपान ठरेल धोकादायक

मद्यपान लिव्हर म्हणजेच यकृताला घातक आहे हे सर्वांना माहिती आहे. परंतु यामुळे तुम्हाला किडनीच्याही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. मद्यपानामुळे तुमच्या शरीराची अगणित हानी होत असते. मद्यपानामुळे ह्रदय तसेच रक्तवाहिन्यांसंबधित विविध आजार निर्माण होऊ शकतात. तसेच अतिरिक्त तणावातून याचा प्रतिकूल परिणाम हा तुमच्या किडनीवर होत असतो.

4) पेनकिलरचा अतिरेक नको

कुठल्याही व्याधीवर आपण सर्रासपणे पेनकिलर गोळ्यांचा वापर करीत असतो. त्यामुळे शरीराला तात्पुरता आराम तर मिळतो, परंतु याच्या वारंवार सेवनाने आपल्या शरीरावर दीर्घकाळासाठी प्रतिकूल परिणाम पडत असतो. पेनकिलरच्या अतिरेकाने याचा थेट परिणाम आपल्या किडनीवर होत असतो. पेनकिलर, नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्सचा वापर केल्याने किडनी फेल होण्याची शक्यता अधिक संभवते.

5) धूम्रपानाची सवय

आपण नियमित धूम्रपान वा कधी- कधी केलेले धूम्रपान अशी विभागणी करु शकत नाही. हे दोन्ही शरीराला तेवढेच घातक ठरत असतात. त्यामुळे धूम्रपान न केलेलेच शरीरासाठी केव्हाही चांगले असते. धूम्रपानामुळे यकृतासह किडनीवर वाईट परिणाम होत असतो. धूम्रपानामुळे किडनीची कार्यक्षमता कमी होऊन कालांतराने ती खराब होण्याची शक्यता अधिक असते.

(टीप : संबंधित मजकूर उपलब्ध माहितीच्या आधारे लिहिला आहे, यातील माहितीचा वापर करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा)

इतर बातम्याः

Devyani Farande| 2 टर्म आमदारकी, महापालिकेतही छाप; परखड नेतृत्व देवयानी फरांदेंच्या वाटचालीवर वाढदिवसानिमित्त नजर …

Nashik Corona|नाशिकमध्ये आदिवासी महिलांचे लसीकरण कौतुकास्पद, राज्यभर अंमलबजावणी व्हावी, उपसभापतींची थाप…!

Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI