Telemedicine | टेलीमेडिसिन पद्धतीला उच्च स्तरावर अंमलबजावणी करण्याची वेळ, जाणून घ्या काय आहे ही संकल्पना

जे रोग संसर्गजन्य नाहीत अशा रोगांवर टेक प्लॅटफॉर्मच सामर्थ्य लक्षात घेऊन, टेलीमेडिसिनच्या (telemedicine) माध्यमातून या संकटाला सामोरे जाण्याची भारतासाठी ही सर्वात योग्य वेळ आहे.

Telemedicine | टेलीमेडिसिन पद्धतीला उच्च स्तरावर अंमलबजावणी करण्याची वेळ, जाणून घ्या काय आहे ही संकल्पना
टेलीमेडिसिन
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 6:44 PM

मुंबई : सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर (Corona Pandemic) सुरु आहे. जे रोग संसर्गजन्य नाहीत अशा रोगांवर टेक प्लॅटफॉर्मच सामर्थ्य लक्षात घेऊन, टेलीमेडिसिनच्या (telemedicine) माध्यमातून या संकटाला सामोरे जाण्याची भारतासाठी ही सर्वात योग्य वेळ आहे. सध्या भारत हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरा जात आहे, ज्यामुळे आरोग्य यंत्रणेवर खूप ताण येत आहे (Know about telemedicine method and how it will help to patients by Ashvini Danigond).

श्रीमती अश्विनी दानिगोंड (Ashvini Danigond) या मनोरामा इन्फोसोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (एमआयपीएल) संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्या म्हणतात की, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) डॉक्टरांच्या तुलनेत जे प्रति 1000 लोकांसाठी सरासरी 2.5 आहे, देशातील डॉक्टरांचे हे प्रमाण अत्यंत कमी आहे. देशातील प्रमाण हे एक हजार लोकांसाठी सरासरी 0.7 डॉक्टर इतकेच आहे. तसेच, मुख्य आव्हानांपैकी एक म्हणजे ग्रामीण भागात लोकसंख्या वाढत असताना चांगल्या आरोग्य सुविधा या फक्त शहरी भागातच आहेत.

Ashvini Danigond

अश्विनी दानिगोंड

कोरोना काळात वाढली टेलीमेडीसिनची व्याप्ती!

अश्विनी दानिगोंड म्हणाल्या, शहरी आणि ग्रामीण भारत यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी हेल्थकेअर लँडस्केपमध्ये अत्यंत आवश्यक बदल घडवून आणण्याची गरज असून टेलीमेडीसिन यासाठी खूप उपयुक्त ठरेल. तसेच, टेलीमेडीसिनमध्ये हा बदल घडवून आणण्याची ताकद आहे. मार्च 2020मध्ये कोरोना या आजाराचा उद्रेक झाल्यानंतर हेल्थकेअर क्षेत्रात आवश्यक त्याप्रमाणात बदल झाले आहेत. देशभरात लॉकडाऊन लागल्याने एकमेकांशी सल्लामसलत करण्यासाठी टेलीमेडीसिनचाही अनेक ठिकाणी उपयोग झाला आहे. टेलीमेडीसिन अर्थात नवीन तंत्रज्ञानचा वापर करून, आरोग्य सुविधांचा तत्काळ वापर करणे.

टेलीमेडिसिन काही सूचनांमध्ये ‘या’ गोष्टी समाविष्ट आहे:

टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये प्रादेशिक 24×7 टेलीमेडिसिन क्लिनिक सेट अप

टियर -2 आणि टीयर -3 शहरांमध्ये प्रादेशिक 24×7 टेलिमेडिसिन क्लिनिक सक्रिय आणि सेटअप करण्याची तातडीची आवश्यकता आहे, म्हणजे ज्या रुग्णांकडे गंभीर लक्ष देण्याची आवश्यकता नाही, अशा रूग्णाच्या तपासणी करता हे वैकल्पिक मार्ग असू शकतात. यामुळे आरोग्य सुविधांवरील ओझे कमी होण्यास मदत होईल (Know about telemedicine method and how it will help to patients by Ashvini Danigond).

रुग्णावर रीअल-टाईम डेटा आणि विश्लेषण सक्षम करण्याची आवश्यकता

पुरवठा-साखळीच्या कार्यक्षमतेकडे लक्ष वेधण्यासाठी भविष्यात कोरोनाच्या रुग्णाला रिअल-टाईम डेटा आणि विश्लेषणे सक्षम करण्यासाठी डिजिटल हेल्थ सोल्यूशन्स वापरण्याची आवश्यकता आहे.

डिजिटल हेल्थकेअर टूल्सचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन

पँडेमिक मॅनजेमेंट सोलुशन, टेलिमेडिसिन आणि इतर क्लिनिकल सोल्यूशन्स सारख्या हेल्थकेअर टूल्सचा अवलंब करण्यासाठी रुग्णालये आणि आरोग्य सेवा पुरवठादारांकडे अशा सुविधांना प्रोत्साहन देण्याकरिता उपयुक्त साधन असावेत. यामुळे आरोग्य सुविधा देणाऱ्या संस्था आणि रूग्ण यांना मदत होईल.

वेगवान आणि स्केलेबल डिजिटल हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चरच्या दिशेने वाटचाल

वेगवान आणि स्केलेबल डिजिटल हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश असलेल्या सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) प्रकल्प तयार करण्याची ही योग्य वेळ आहे.

कोव्हिड 19 आजाराच्या प्रकोपादरम्यान टेलिमेडिसिन चर्चेत होते. व्यावहारिकतेचा पैलू लक्षात घेता हे खूप उपयुक्तही ठरले आहेत. परंतु, नव्या मार्गदर्शक सूचनांसह आता नवीन धोरणांबाबत बरेच आवश्यक स्पष्टीकरण आणि बदल सुचवण्यात आले आहे. शेवटी, खऱ्या अर्थाने या क्षेत्राचे यश आणि या क्षेत्रात पुढील स्थान गाठण्यासाठी तंत्रज्ञान जागरूकता वाढवणे अतिशय गरजेचे आहे.

(Know about telemedicine method and how it will help to patients by Ashvini Danigond)

हेही वाचा :

लस रातोरात बनत नाही, ती एक प्रक्रिया, वेगवान लस कशी देऊ? : अदर पुनावाला

कोरोनापासून बचावासाठी श्रीमंतांचा नवा फंडा, घरातच मिनी हॉस्पिटलचा सेटअप, खर्च किती?

Non Stop LIVE Update
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.