कोरोनापासून बचावासाठी श्रीमंतांचा नवा फंडा, घरातच मिनी हॉस्पिटलचा सेटअप, खर्च किती?

एखाद्या घरात आयसीयूचा सेटअप बसवण्यासाठी जवळपास अडीच ते तीन लाख रुपये खर्च करत आहेत. (People setup Mini ICU Hospital at Home)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:28 PM, 3 May 2021
कोरोनापासून बचावासाठी श्रीमंतांचा नवा फंडा, घरातच मिनी हॉस्पिटलचा सेटअप, खर्च किती?
mini hospital

मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे कोरोना संकटात अनेक जण त्यांचे प्राण वाचवण्यासाठी धडपडत आहे. तर काहींचा ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे अनेक श्रीमंत लोक स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी नानाविविध उपाय करत आहे. तर काही श्रीमंत लोक स्वत:चे राहते घर मिनी हॉस्पिटलमध्ये रुपातंरित करत आहे. अनेक जण व्हेंटिलेटरपासून इतर सर्व वैद्यकीय उपकरणांचा सेटअप घरातच करताना पाहायला मिळत आहे. (Rich People setup Mini ICU Hospital at Home)

एखाद्या घरात आयसीयूचा सेटअप बसवण्यासाठी जवळपास अडीच ते तीन लाख रुपये खर्च करत आहेत. कोरोना काळात वैद्यकीय उपकरणांची मागणी फार वाढली आहे. त्यामुळे श्रीमंतांकडून घरातच मिनी हॉस्पिटल सेटअप बसवण्यासाठीची मागणी वाढत आहे. काही जण दुप्पट -तिप्पट पैसा देऊन ही उपकरण खरेदी करत आहेत.

साधारण खर्च किती? 

एखाद्या घरात ICU चा सेटअप करण्यासाठी तुम्हाला व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय उपकरणे ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी वेगवेगळ्या कंपनींच्या वस्तूनुसार त्याचा खर्च निश्चित केला जातो. यात सरासरी Non-invasive ventilator साठी कमीत कमी 50 हजारांपासून अडीच लाखांपर्यंत खर्च येतो. तसेच जर तुम्ही घरात आयसीयूचा सेटअप करत असाल, तर त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 15 से 25 हजारपर्यंत खर्च येऊ शकतो.

होम हेल्थ केअर सर्व्हिसेसच्या मागणीत वाढ 

कोरोना काळात होम हेल्थ केअर सर्व्हिसेसची (HealthCare at Home) मागणी जवळपास 20 पट वाढली आहे. या सुविधेची सर्वाधिक मागणी ही दिल्ली-एनसीआरमध्ये आहे. या ठिकाणी अनेक जण आप्तकालीन परिस्थितीत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी घरातच आयसीयू सेटअप करत आहे. यासाठी ते कितीही किंमत मोजण्यासाठी तयार आहे. आयसीयूसाठी लागणारे व्हेंटिलेटर (Ventilator), ऑक्सिजन कॉन्सेन्टर (Oxygen Concentrator), ऑक्सिमीटर यासारख्या कोरोना काळात उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा साठा ठेवत आहे.

घराच्या घरी योग्य उपचार

विशेष म्हणजे घरात आयसीयू सेटअप केल्यानंतर त्यासाठी आवश्यक असलेले अनेक वैद्यकीय डॉक्टर किंवा प्रोफेशन्ल्सला कामावर ठेवत आहे. यामुळे त्यांना घराच्या घरी योग्य उपचार मिळत आहेत. तसेच ती उपकरणही व्यवस्थित चालवता येतील. तर काही लोक आपत्कालीन सेवांसाठी आगाऊ पैसे देऊन त्यांच्याशी बुकिंग करत आहे. (Rich People setup Mini ICU Hospital at Home)

संबंधित बातम्या : 

Covishield vs Covaxin vaccine : कोविशिल्ड विरुद्ध को-व्हॅक्सिन, जाणून घ्या कोणती लस सर्वात उत्तम

धक्कादायक, भारतात श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांकडून धमक्या, अदर पुनावालांकडून भारताबाहेर लस उत्पादनाचा विचार