Junk Food Craving : च्युइंग गममुळे कमी होते जंक फूडचे क्रेव्हिंग, स्ट्रेस आणि टेन्शनही ठेवते दूर, जाणून घ्या कसे ?

च्युइंग गम केवळ जंक फूडचे क्रेव्हिंग कमी करत नाही तर स्ट्रेस आणि टेन्शनही दूर करू शकते. कसे ते जाणून घेऊया.

Junk Food Craving : च्युइंग गममुळे कमी होते जंक फूडचे क्रेव्हिंग, स्ट्रेस आणि टेन्शनही ठेवते दूर, जाणून घ्या कसे ?
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 1:04 PM

नवी दिल्ली : जंक फूड आपल्या शरीराला किती हानी पोहोचवते आणि त्यामुळे अनेक आजार होण्याचा किती धोका असतो, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण असे असूनही, आपल्यापैकी अनेकांना जंक फूड खाण्याचे क्रेव्हिंग (junk food craving) होत असते. ते पदार्थ खरंच खूप चविष्ट असतात यात काहीच शंका नाही, पण चविष्ट असले तरी ते फारच अनहेल्दी (unhealthy food) असतात. याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे लठ्ठपणा आणि वजन (obesity and weight gain) वाढते. बर्‍याच लोकांना जंक फूडचे तोटे (side effects of junk food) माहित आहेत. पण तरीही, क्रेव्हिंगमुळे ते खाण्यास मजबूर होतात. पण जंक फूडचे क्रेव्हिंग दूर करण्यासाठी ‘च्युइंग गम’ (chewing gum) किती उपयुक्त ठरू शकते हे तुम्हाला माहीत आहे का?

च्युइंग गम केवळ जंक फूडचे क्रेव्हिंग कमी करत नाही तर स्ट्रेस आणि टेन्शनही दूर करू शकते. 2009 मध्ये केलेल्या एका अभ्यासात अन्नाचे क्रेव्हिंग कमी करण्यासाठी ‘च्युइंग गम’ चे फायदे स्पष्ट केले होते. ॲपेटाइट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, ज्या सहभागी व्यक्तींनी सकाळी आणि दुपारी 45 मिनिटे च्युईंग गम चघळले त्यांना अनहेल्दी पदार्थ खाण्याचे क्रेव्हिंग आणि भूक लक्षणीय प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले.

हे सुद्धा वाचा

च्युइंग गम मूड सुधारते

असाच आणखी एक दावा 2011 च्या अभ्यासातही करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, च्युइंग गममुळे लोकांची भूक आणि जास्त साखर असलेले स्नॅक्स खाण्याची इच्छा लक्षणीयरीत्या कमी होते. 2016 मध्ये जर्नल इटिंग बिहेविअर्समध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासात असे आढळून आले की च्युइंग गम हे आपली गोड आणि खारट स्नॅक्स खायचे क्रेव्हिंग अथवा लालसा कमी करते. एवढेच नाही तर ते खाल्ल्याने सहभागी झालेल्यांचा मूडही सुधारला.

च्युइंग गम आणि क्रेव्हिंग यांचा काय संबंध आहे ?

जंक फूड खाण्याची तल्लफ आलेली असताना च्युइंग गम खाल्ल्याने टेस्ट बड्सची दिशाभूल होण्यास मदत होते. च्युइंगम तुमचे तोंड व्यस्त ठेवते. हेच कारण आहे की या काळात तुम्हाला अनहेल्दी किंवा अस्वास्थ्यकर अन्न खाण्याची तल्लफ येत नाही. च्युइंग गमची प्रक्रिया लाळ आणि पाचक एंजाइम सोडण्यास उत्तेजित करू शकते, ज्यामुळे तुम्हाला तुमचे क्रेव्हिंग कमी होण्यास आणि तुमची भूक कमी करण्यास मदत होते.

जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.