AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World TB Day 2023 : मधुमेहाच्या रुग्णांना टीबी इन्फेक्शनचा चौपट धोका

दरवर्षी 24 मार्च रोजी जागतिक टीबी दिवस साजरा केला जातो. या आजाराबद्दल लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करणे तसेच हा आजार रोखणे, हेही हा दिवस साजरा करण्याचे उद्दिष्ट आहे.

World TB Day 2023 : मधुमेहाच्या रुग्णांना टीबी इन्फेक्शनचा चौपट धोका
Image Credit source: freepik
| Updated on: Mar 24, 2023 | 11:59 AM
Share

नवी दिल्ली : दरवर्षी 24 मार्च रोजी जागतिक क्षय दिन (World TB Day 2023) जगभरात साजरा केला जातो. यानिमित्ताने जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization) या दिवशी जगात विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. ज्याद्वारे जगभरातील लोकांमध्ये या प्राणघातक आजाराबाबत जनजागृती केली जाते. टीबीशी संबंधित अनेक मिथके आहेत, ज्यावर लोक अजूनही विश्वास ठेवतात.

टीबी हा एक गंभीर आजार आहे, जो इतर आजारांसोबतच तुमचे शरीर कमकुवत करू शकतो. उदाहरणार्थ, मधुमेह असलेल्या लोकांना टीबी होण्याचा धोका वाढतो. टीबी आणि मधुमेहाचा काय संबंध आहे ते जाणून घेऊया.

मधुमेहामुळे वाढू शकतो टीबीचा धोका

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, मधुमेह हा एक जुनाट आजार आहे, याचा अर्थ तो (सहज)बरा होऊ शकत नाही. आपले शरीर अन्नाचे ऊर्जेत रूपांतर कसे करते या प्रक्रियेवर मधुमेहाचा परिणाम होतो. त्याच वेळी, क्षयरोग (TB) आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतो, विशेषत: ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी तो घातक ठरू शकतो. टीबी हा जगातील लोकांच्या आरोग्यासाठी विशेषत: गरीब आणि असुरक्षित लोकांसाठी धोकादायक आहे. असा अंदाज आहे की सरासरी 9 ते 10 दशलक्ष लोक क्षयरोगाने ग्रस्त आहेत आणि सुमारे 1 ते 2 दशलक्ष लोकांचा यामुळे दरवर्षी मृत्यू होतो.

ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांना टीबी होण्याचा धोका दोन ते चार पटीने वाढतो. त्याच वेळी, क्षयरोगाने ग्रस्त असलेल्या 30% लोकांना मधुमेह होण्याची शक्यता असते.

मधुमेह व टीबी दरम्यान संबंध

कमकुवत प्रतिकारशक्तीच्या सामान्य कारणांपैकी आता मधुमेह हे सर्वात मोठे कारण बनले आहे, ज्यामुळे टीबीचा धोकाही वाढतो. त्याची लक्षणे अशी असू शकतात :

– सामान्य लोकांपेक्षा मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ताप आणि खोकल्यामुळे रक्त येण्याचे प्रमाण अधिक आहे.

– इतर अवयवांपेक्षा सामान्यतः, फुफ्फुसाचा सहभाग मधुमेहासह टीबीमध्ये दिसून येतो.

दोन प्रकारचा असतो टीबीचा आजार

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, जागतिक आरोग्य संघटनेने हे मान्य केले आहे की मधुमेहामुळे टीबीचा धोका वाढतो. गेल्या काही दशकांमध्ये जगभरात मधुमेहाचे रुग्ण वाढले आहेत, त्यामागे जीवनशैलीतील बदल आहे. याशिवाय अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, मधुमेहामुळे टीबीचा धोका वाढतो. क्षयरोगाने ग्रस्त लोकांमध्ये मधुमेहाचा धोकाही दोन ते चार पटीने वाढतो.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.