काय सांगता ? बिअर मुळे कमी होते कोलेस्ट्रॉल ? दररोज पिणाऱ्यांनी इकडे द्या लक्ष..
बिअर हे असं पेय आहे, ज्याबद्दल नेहमी चर्चा होत असते. अनेक रिपोर्ट्समधून अशी माहिती समोर आली आहे की बिअरचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहू शकते. हे खरं आहे का ते जाणून घेऊया.

नवी दिल्ली – आजकाल एखादी पार्टी असो किंवा वीकेंडला चिल करण्याचा प्लान, बहुतांश लोक मद्यपान (alcohol) करताना दिसतात. बरेच जण बिअर पिण्यास पसंती देतात, त्याबद्दल बरेच वेळा चर्चाही होते. बिअर पिण्याचे (drinking beer) फायदे आणि त्यामुळे होणारे नुकसान याबद्दल अनेक दावेही केले जातात. एवढंच नव्हे तर अनेक संशोधनातून हे समोर आलं आहे की ठराविक प्रमाणात बिअर प्यायल्याने शरीराला फायदे मिळू शकतात. पण याचा अर्थ हा नव्हे की आम्ही तुम्हाला बिअर पिण्यास उद्युक्त करत आहोत किंवा प्रोत्साहन देत आहोत. काही रिपोर्ट्सनुसार, बिअर प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी (cholesterol level) कमी होऊ शकते. हे खरं आहे का, त्यात काय तथ्य आहे, हे जाणून घेऊया.
बिअरच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल खरंच कमी होतं का ?
बिअर पिण्याबद्दल वेगवेगळे दावे केले जाते. काही अभ्यासानुसार, बिअरमध्ये अल्कोहोलची पातळी 5 ते 7 टक्के इतकी असते. या पेयामध्ये अँटी-ऑक्सीडेंट, मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. अशा परिस्थितीत काही रिपोर्ट्सनुसार, बिअर ही कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. मात्र असे असले तरी तुम्ही ते पिण्याचे प्रमाण मर्यादेतच ठेवले पाहिजे.
मधुमेहात बिअरचे सेवन
कोणत्याही प्रकारचे अल्कोहोलिक पेय प्यायल्याने शरीरातील इन्सुलिनची पातळी बिघडू शकते. रिपोर्ट्सनुसार, कधी-कधी बिअर पिणाऱ्यांच्या तुलनेत ती न पिणाऱ्यांना ग्लूकोज सेन्सिटिव्हिटी होण्याचा धोका असतो. अभ्यासानुसार, कमी प्रमाणात बिअर प्यायल्याने पुरुषांमध्ये मधुमेहाविरोधात सुरक्षात्मक परिणाम होऊ शकतो.
हेल्दी राहण्याचे इतर पर्याय
अतिशय कमी प्रमाणात बिअर प्यायल्याने आपल्या शरीराल सकारात्मक पद्धतीने फायदा होऊ शकतो, पण हा काही हेल्दी आणि फिट किंवा तंदुरुस्त राहण्याचा एकमेव मार्ग नाहीये. जर तुम्हाला चांगले आरोग्य हवे असेल तर संतुलित आहार घेणे महत्वाचे ठरते. त्याशिवाय तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार महिलांसाठी एक ड्रिंक तर पुरुषांसाठी जास्तीत जास्त दोन ड्रिंक्सचे सेवन योग्य ठरू शकते, त्यापेक्षा अधिक प्रमाणात मद्यपान करू नये.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
