प्लेगनंतर आता कोरोनावरील लसीची निर्मिती करायचीय; वाचा, हाफकिनचं महत्त्व काय?

हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनाच्या लसीची निर्मिती करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. (know importance and history of Haffkine Research institute)

प्लेगनंतर आता कोरोनावरील लसीची निर्मिती करायचीय; वाचा, हाफकिनचं महत्त्व काय?
Haffkine Institute

मुंबई: हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लसीची निर्मिती करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज हाफकिनमध्ये जाऊन पाहणीही केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हाफकिनबाबत चर्चा सुरू झाली आहे. प्लेग सारख्या महाभयंकर आजारावर लस शोधणाऱ्या हाफकिनचं नेमकं काय महत्त्व आहे, त्याचा घेतलेला आढावा. (know importance and history of Haffkine Research institute)

मठ ते संशोधन केंद्र

हाफकिन संस्था परळ येथे आहे. पोर्तुगीजांनी 1673मध्ये हाफकिनची इमारत बांधण्यास सुरुवात केली होती. फ्रान्सिस्कन मठासाठी ही इमारत बांधण्यात येत होती. त्यानंतर गव्हर्नर कून यांनी 1719 मध्ये ही वास्तू ताब्यात घेतली. 1750 नंतर गव्हर्नरचे निवासस्थान म्हणूनही या वास्तूचा वापर केला गेला. 1899मध्ये ही वास्तू हाफकिनच्या ताब्यात दिली. “प्लेग रिसर्च लॅबोरेटरी” नावाच्या बॅक्टेरियोलॉजी रिसर्च सेंटर म्हणून डॉ. वाल्डेमार मोर्डेकाई हाफकिने यांनी 10 ऑगस्ट 1899 रोजी याची स्थापना केली. त्यानंतर या वास्तूत लसींवरील संशोधन सुरू झालं. हाफकिन संस्था जवळपास 120 वर्षे जुनी आहे.

हाफकिनचं उद्दिष्ट्ये

साथीच्या आजारांचा अभ्यास करणे, त्यावर प्रतिबंधात्मक उपाय शोधणे, या आजारांविरोधातील प्रतिबंधात्मक लस निर्मितीची शक्यता तपासणे आदी उद्दिष्ट्ये या संस्थेची आहेत. या संस्थेत जीव रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, रसायनशास्त्र, विषाणुशास्त्र, पेशीय जीवशास्त्र आदी विभाग असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू असतं.

प्लेगची लस

हाफकिन इन्स्टिट्यूटने साथीच्या आजारांवरील अनेक महत्त्वाच्या लसींचा शोध लावला आहे. 1899-1904 या काळात पल्गेची साथ आली होती. तेव्हा या संस्थेने प्लेगच्या लसीवर अभ्यास करून लस शोधून तिचा देशभर पुरवठा केला. या शिवाय 2005 मध्ये उद्भवलेला लेप्टोस्पायरोसीसचा प्रादुर्भाव, त्यानंतर 2009मध्ये निर्माण झालेला स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव तसेच अॅन्थ्रेक्स आदी वेगवेगळ्या विषाणू हल्ल्याच्या वेळी हाफकिनमधील विषाणुशास्त्र विभागाने महत्त्वाचे योगदान दिले आहे.

शोधलेल्या लसी

कॉलरा
प्लेग
सर्पदंश (विष) विरोधी लस
तोंडातून देता येणारी पोलिओची लस
घटसर्प
डांग्या खोकला
धनुर्वात

एड्स प्रतिबंधक लसीवर संशोधन सुरू

2014 पासून हाफकिनमध्ये एड्स प्रतिबंधक लसीवर संशोधन सुरू आहे. एचआयव्ही विरोधात कार्य करू शकणाऱ्या काही जैवकणांवर देखील ही संस्था संशोधन करीत आहे.

प्राण्यांची प्रयोग शाळा

कोणत्याही नव्या लसींची निर्मिती केल्यानंतर तिच्या चाचणीसाठी प्राण्यांची आवश्यकता असते. त्यामुळे या संस्थेत प्राण्यांसाठी मोठी प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत उंदीर, ससे, गिनीपिंग आदी प्राणी असून त्यांच्या प्रजननाची सुविधा देखील यात आहे.

सर्पगृह

प्राण्यांच्या प्रयोगशाळेसह संस्थेत सर्पगृह देखील आहेत. या सर्पगृहात भारतातील सर्व जातीचे विषारी साप या सर्पगृहात आहेत. त्याचप्रमाणे प्रतिरक्तद्रवाच्या उत्पादनासाठी घोड्यांचा उपयोग होत असल्याने घोडेही पाळले आहेत. (know importance and history of Haffkine Research institute)

पोलिओ मुक्त भारतासाठी हाफकिनचं मोठं योगदान

भारतला पोलिओ मुक्त करण्यामध्ये हाफकिनने मोलाची भूमिका बजावली आहे. इथे तयार केलेली पोलिओची लस 45 देशांना पुरविण्यात आली होती. हाफकिनने आतापर्यंत 68 औषधे संशोधन करून बनविली आहे. या संस्थेने सहा महिन्यात 28 कोटी पोलीओ डोस तयार करण्याची किमया केली आहे. (know importance and history of Haffkine Research institute)

 

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांकडून हाफकिन इन्स्टिट्यूटची पाहणी, कोरोना लस निर्मितीबाबत अधिकाऱ्यांशी बैठक

Corona Cases and Lockdown News LIVE: नगरमध्ये कोरोना रुग्ण वाढले, कलेक्टर प्रत्येक तालुका दौऱ्यावर जाणार

Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हाफकीन संस्थेस भेट, अधिकाऱ्यांसमवेत बैठक

(know importance and history of Haffkine Research institute)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI