AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घे भरारी: ‘डिप्रेशनचं’ चक्रव्यूव्ह यशस्वी भेदले, अवघं आकाश मोकळे जाहले!

डिप्रेशनचा पराभव करण्यासाठी पौष्टिक आहार (Healthy Diet) आणि निरोगी जीवनशैलीची (Lifestyle) आवश्यकता असते. सकारात्मकतेची भावना जोपासण्यामुळे निराशेतून बाहेर पडता येते.

घे भरारी: 'डिप्रेशनचं' चक्रव्यूव्ह यशस्वी भेदले, अवघं आकाश मोकळे जाहले!
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 15, 2022 | 9:51 PM
Share

नवी दिल्ली- डिप्रेशन किंवा नैराश्यानं शारीरिक किंवा मानसिक पातळीवर पोखरलं जातं. नैराश्याच्या काळात व्यक्तीची स्थिती चक्रव्यूव्ह्यात सापडलेल्या अभिमन्यू सारखी होते. इच्छाशक्तीसोबत मार्गही खुंटतो. हजारोंच्या गर्दीत एकटेपणं मनाला पोखरतं. एकाग्रतेच्या अभावी मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम होतो. मानसिक तज्ज्ञांच्या मते, ड्रिपेशनच्या (Depression) अनेक पातळ्या आहेत. प्राथमिक टप्प्यावरच नैराश्याला ‘ब्रेक’ लावता येतो. मात्र, नैराश्याने पातळी ओलांडल्यास डॉक्टरांच्या उपचाराची गरज भासू शकते. डिप्रेशनचा पराभव करण्यासाठी पौष्टिक आहार (Healthy Diet) आणि निरोगी जीवनशैलीची (Lifestyle) आवश्यकता असते. सकारात्मकतेची भावना जोपासण्यामुळे निराशेतून बाहेर पडता येते. नैराश्यातून बाहेर पडण्याचे काही संकेतही मिळतात. ज्याद्वारे नैराश्याची मिठी सैल झाल्याची जाणीव आपल्याला मिळते. जाणून घेऊया नैराश्यातून बाहेर पडण्याचे संकेत देणारी काही लक्षणे-

रागावर नियंत्रण

डिप्रेशनग्रस्त व्यक्तींना रागावर नियंत्रण ठेवणे अशक्य ठरते. त्यामुळे स्वत:ला हानी पोहचविण्याची शक्यता असते. डिप्रेशनमुळे भावना बदलतात. कधी आनंदाचे क्षण अनुभवतो तर कधी रागामुळे भावना अनियंत्रित होतात. डिप्रेशनची शिकार झालेल्या व्यक्तीला छोट्या-छोट्या गोष्टींवरुन राग येतो. नैराश्याचा अनुभव घेणारी व्यक्ती रागावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम ठरल्यास नैराश्याची मिठी घट्ट झाल्याचे समजावे.

आनंद क्षणांत सहभागी

डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीचे मन कशातही गुंतत नाही. मन क्षणाक्षणाला विचलित होतं. डिप्रेशनमधून बाहेर पडताना मन पुन्हा उभारी घ्यायला लागतं. आनंदाच्या क्षणात सहभागी होते. खेळाच्या कृतीत सहभागी होता येते. गाणं गुणगुणनं किंवा पेटिंग यासारख्या गोष्टीत मन रमविल्यामुळे डिप्रेशनमधून बाहेर पडण्याचे संकेत मिळतात. व्यक्ती सकारात्मक असल्याचे लक्षणे यावरुन ठरतात.

चिडचिड कमी होणे!

डिप्रेशनचा सामना करणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा होतो. नेहमी चिडचिडा स्वभाव असणाऱ्या व्यक्तीला खुश करणे अशक्य ठरते. व्यक्तीमध्ये सकारात्मकतेची भावना वाढीस लागल्यास चिडचिडेपणा आपोआपच कमी होतो. छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडणारी व्यक्ती अनेक गोष्टींकडे कानाडोळा करायला सुरुवात करते.

चर्चेत सहभाग

डिप्रेशनच्या आहारी गेलेली व्यक्ती इतरांसोबत कनेक्ट होत नाही. अबोलपणा वाढीस लागतो. कुटुंबातील सदस्य किंवा मित्र त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. मात्र, डिप्रेशनग्रस्त व्यक्ती बोलणे टाळते. त्यामुळे डिप्रेशनग्रस्त व्यक्ती बोलण्याचा प्रयत्न करू लागल्यास किंवा फोनद्वारे संवाद साधू लागल्यास समजावे डिप्रेशनमधून पुन्हा बाहेर पडत आहे.

संबंधित बातम्या :

Health | तुम्हाला ही झोपताना छातीशी उशी घेण्याची सवय? जाणून घ्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट!

PHOTO | मासे खाल्ल्यानेही होऊ शकते नुकसान, बळावतात हे आजार; जाणून घ्या याबाबत अधिक माहिती

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.