पाइल्सची पहिली स्टेज कोणती ? वेळीच उपाय केल्यास त्रास होऊ शकतो कमी

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार जर पहिल्या स्टेजलाच पाइल्ससाठी काही घरगुती उपचार केले तर या त्रासापासून सुटका होऊ शकते.

पाइल्सची पहिली स्टेज कोणती ? वेळीच उपाय केल्यास त्रास होऊ शकतो कमी
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 4:24 PM

नवी दिल्ली : पाइल्स म्हणजे मूळव्याधाचा त्रास आजकाल खूप कॉमन आहे. बऱ्याच लोकांना ही समस्या सतावत असते. हा आजार चार वेगवेगळ्या कॅटॅगरीमध्ये विभागला गेला आहे. बाहेरील मूळव्याध (External Haemorrhoids), आंतरिक मूळव्याध (Internal Haemorrhoids), प्रोलॅप्स्ड मूळव्याध (Prolapsed Haemorrhoids) आणि थ्रोम्बोस्ड मूळव्याध (Thrombosed Haemorrhoids). डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, पहिल्या स्टेजमध्येच पाइल्सवर योग्य उपचार करण्यात आले तर या आजारापासून कायमची मुक्तता होऊ शकते.

मूळव्याध होण्याचे कारण काय ?

मूळव्याध होण्याचे सर्वात मोठे आणि महत्वाचे कारण म्हणजे आपली बदललेली आणि खराब जीवनशैली हेच आहे. सध्याच्या जीवनशैलीमध्ये आपण व्यायामाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. आपण धकाधकीच्या जीवनामध्ये बाहेरील खाद्यपदार्थ चायनीज वगैरे खाण्यावर विशेष भर देतो. यामुळे आपल्या आहारामधून आपल्या शरीराला हवे असलेले फायबर आणि विविध जीवनसत्वे अजिबात मिळत नाहीत. यामुळेच भारतामध्ये मूळव्याधाचे लाखो रुग्ण आहेत. विशेष म्हणजे मूळव्याधाच्या रूग्णांची सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मूळव्याधाची समस्या कमी करण्यासाठी पौष्टिक पदार्थांचा आहारामध्ये समावेश करायला हवा. शिवाय पाणी जास्त पिले पाहिजे.

हे सुद्धा वाचा

काय आहेत मूळव्याधाची सुरुवातीची लक्षणे ?

एका अहवालानुसार, Grade-1 मूळव्याध म्हणजेच पहिल्या स्टेजमध्ये रुग्णाला मलत्याग करताना खूप त्रास जाणवू लागतो. असं वाटतं की गुदद्वारातील नसा सुजल्या आहेत. तसेच मलत्याग करताना खाजही सुटू लागते. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, मूळव्याध होण्याची दोन मोठी कारणे आहेत – पहिले म्हणजे शरीरात फायबरची कमतरता आणि दुसरं म्हणजे पाणी कमी प्रमाणात पिणे.

पाइल्सच्या फर्स्ट स्टेजमध्ये काय करावे ?

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, जर पहिल्या स्टेजलाच रुग्ण सावध झाला आणि काही घरगुती उपाय केले तर आराम मिळू शकतो. जर तुम्हाला फर्स्ट स्टेज पाइल्सची लक्षणे दिसत असतील तर तुमच्या आहारात फायबर युक्त पदार्थांचे सेवन लगेच वाढवावे. तसेच दिवसभरात पाणी पिण्याचे प्रमाणही वाढवा. पाइल्सच्या पहिल्या स्टेजवर असणाऱ्या रुग्णांनी दररोज कमीत कमी 4 लिटर पाणी प्यायले पाहिजे. तसेच ते नारळपाणी अथवा शहाळ्याच्या पाण्याचेही सेवन करू शकतात.

मात्र एवढेच करून उपयोग नाही, तुम्हाला जर पाइल्सचा त्रास असेल व त्यापासून मुक्तता हवी असेल चहा-कॉफी अशा कॅफेनयुक्त पदार्थांपासून पूर्णपणे दूर रहावे लागेल.

पाइल्सच्या पहिल्या स्टेजमध्ये रुग्णांनी भरपूर हिरव्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत. दिवसभरात कमीत कमी एक तरी हिरवी भाजी खाल्लीच पाहिजे, असे डॉक्टरांनी नमूद केले. तसेच नियमितपणे फळेही खाल्ली पाहिजेत. कारण त्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. पण फळांचा ज्यूस पिऊ नये कारण त्यातील फायबर नष्ट होते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.