AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Protein Deficiency : जखमा न भरणे, मूड स्विंग्ज अन बरंच काही…. प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीरात दिसतात ‘ही’ लक्षणे

संतुलित प्रमाणात प्रथिने न घेतल्यास शरीरात ऊर्जेची कमतरता निर्माण होते. त्यामुळे थकवा येण्याची समस्या जाणवू शकते. तुम्हालाही काम करताना लवकर थकवा येत असेल तर ही प्रथिनांच्या कमतरतेची लक्षणे आहेत.

Protein Deficiency : जखमा न भरणे, मूड स्विंग्ज अन बरंच काही.... प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीरात दिसतात 'ही' लक्षणे
Image Credit source: Freepik
| Updated on: Feb 27, 2023 | 7:42 AM
Share

नवी दिल्ली : आधुनिक काळात निरोगी राहणे खूप कठीण काम आहे. यासाठी संतुलित आहार घेऊन नियमित व्यायाम (exercise) केला पाहिजे. समतोल आहारात सर्व आवश्यक पोषक तत्वे आढळतात. यापैकी कोणत्याही एका पोषक तत्वाची कमतरता आरोग्यावर वाईट परिणाम (effect on health) करू शकते. त्याची चिन्हे किंवा लक्षणे शरीरात दिसू लागतात. विशेषतः प्रथिनांच्या कमतरतेचा (protein deficiency) शरीरावर विपरीत परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, पुरुषांनी दररोज 2 ते 3 हजार कॅलरीज वापरल्या पाहिजेत. तर, महिलांनी दररोज 1600 ते 2400 कॅलरीज घेतल्या पाहिजेत. त्यात 20 ते 30 टक्के प्रथिने असावीत. प्रथिनांचे कमी सेवन केल्याने शरीरात अनेक बदल दिसून येतात. ते कोणते हे जाणून घेऊया.

जखम न भरणे

जर तुमच्या शरीरातील जखमा वेळेवर भरल्या जात नसतील तर हे प्रथिनांच्या कमतरतेचे लक्षण आहे. अशी लक्षणे दिसू लागल्यावर आहारात प्रथिनेयुक्त अन्नाचा ताबडतोब समावेश करा.

मूड बदलणे

प्रथिनांच्या कमतरतेमुळे सतत मूड बदलणे किंवा मूड स्विंग्सची समस्या देखील उद्भवू शकते. या स्थितीत व्यक्ती एका क्षणी आनंदी आणि दुसऱ्या क्षणी दुःखी होते. ही लक्षणे दिसल्यास सावध व्हा.

थकवा जाणवणे

संतुलित प्रमाणात प्रथिने न घेतल्यास शरीरात ऊर्जेची कमतरता निर्माण होते. त्यामुळे थकवा येण्याची समस्या जाणवू शकते. तुम्हालाही काम करताना लवकर थकवा येत असेल तर ही प्रथिनांच्या कमतरतेची लक्षणे आहेत. थकवा टाळण्यासाठी बीन्स, क्विनोआ, अंडी, केळी इत्यादी गोष्टी खा. जर तुम्ही मांसाहार घेत असाल तर तुम्ही तुमच्या आहारात चिकन लिव्हर आणि रेड मीट समाविष्ट करू शकता. यामुळे केवळ प्रोटीनच नाही तर लोहाची कमतरता देखील दूर होते.

त्वचा कोरडी होणे

प्रथिने शरीराच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रथिनांच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होते. यासोबतच केसही कोरडे होऊ लागतात. जर ही लक्षणे दिसत असतील तर तुमच्या आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा नक्कीच समावेश करा.

वारंवार भूक न लागणे

प्रथिनांच्या कमतरतेमुळे वारंवार भूक लागते. या स्थितीत व्यक्तीला सारखी भूक लागते. यासाठी दररोज संतुलित आहार घ्यावा. यासाठी तुमच्या रोजच्या आहारात 40 टक्के प्रथिने, 30 टक्के फॅट आणि 30 टक्के कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचा समावेश करा. यासाठी आहारात सत्तू, अंडी, सोयाबीन, सोयाबीन, किवी इत्यादी खावे.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.